किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– जस्टिन ट्रुडो यांनी पाठराखण केल्यापासून खलिस्तान्यांचा उन्मत्तपणा वाढला,
टोरंटो, (१५ नोव्हेंबर) – कॅनडातील खलिस्तान समर्थकांची एक चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यात दिवाळी साजरी करणार्या हिंदूंवर खलिस्तानी समर्थक हल्ला करीत असल्याचे दिसले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पाठराखण केल्यापासून खलिस्तान्यांचा उन्मत्तपणा या देशात वाढत असल्याचे चित्रफितीवरून स्पष्ट झाले.
कॅनडाचील ब्रॅम्पटन येथील ही चित्रफीत असल्याचे सांगितले जात आहे. हातात खलिस्तानी झेंडे घेऊन काही जण जमिनीवरील दगड उचलून दिवाळी साजरी करणार्या हिंदूंवर फेकत असल्याचे यात दिसले. कॅनडातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही घटना ब्रॅम्पटन येथील आहे. दगडफेकीनंतर पोलिस जमावाला मागे हटण्यास सांगत असल्याचेही दिसून आले. या प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी निवेदन जारी करून दिली.
निज्जरच्या हत्येनंतर वाढला तणाव
खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर तणाव वाढला आहे. जस्टिन ट्रुडो यांनी या हत्येत भारताचा हात असल्याचे सांगितले. सरे येथील गुरुद्वाराया बाहेर दोन अज्ञात हल्लेखोरांना निज्जरची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर भारताने कॅनडातील नागरिकांसाठी व्हिसा सेवा निलंबित केली होती आणि कॅनडाच्या मुत्सद्यांना परत पाठवले होते.