किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 27.58° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.58° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी छितरे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलअबू धाबी, (०६ फेब्रुवारी) – बीएपीएस हिंदू मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अध्यात्मिक नेते महंत स्वामी महाराज यांचे सोमवारी अबुधाबीत आगमन झाले. १४ फेब्रुवारी रोजी अबू धाबी येथे पहिल्या हिंदू मंदिराच्या ऐतिहासिक उद्घाटनाच्या अध्यक्षतेसाठी अध्यात्मिक नेते आखाती देशात राज्य अतिथी म्हणून पोहचले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएपीएस हिंदू मंदिराचे उद्घाटन होणार आहे. विमानतळावर आगमन झाल्यावर महंत स्वामी महाराज यांचे संयुक्त अरब अमिरातीचे सहिष्णुता मंत्री शेख नाह्यान मबारक अल नाह्यान यांनी जोरदार स्वागत केले. बीएपीएसच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. यूएई भेटीदरम्यान, पीएम मोदी मंदिराच्या उद्घाटनाच्या एक दिवस आधी १३ फेब्रुवारी रोजी ’अहलान मोदी’ येथे भारतीय प्रवासींना संबोधित करतील. जानेवारीच्या सुरुवातीला, यूएई मधील भारताचे राजदूत संजय सुधीर यांनी अबू धाबी येथील बीएपीएस हिंदू मंदिराच्या बांधकामाची प्रगती पाहण्यासाठी त्याला भेट दिली. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेल्या या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
महंत स्वामी महाराज बीएपीएस हे स्वामीनारायण संस्थेचे गुरु आहेत, जे संयुक्त राष्ट्राशी संलग्न आंतरराष्ट्रीय समुदाय-आधारित हिंदू फेलोशिप आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, महंत स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर प्रकल्पाची देखरेख करणारे ब्रह्मविहारीदास स्वामी यांनी स्पष्ट केले की बीएपीएस हिंदू मंदिर जागतिक सौहार्दासाठी आध्यात्मिक मरुभूमी म्हणून काम करते.