|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.76° C

कमाल तापमान : 34.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 46 %

वायू वेग : 6.14 Mps

स्थळ : Mumbai, IN

34.99° C

Weather Forecast for
Saturday, 18 May

29.44°C - 34.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 19 May

29.2°C - 30.98°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.84°C - 31.52°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

29.09°C - 30.78°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.67°C - 30.85°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.79°C - 30.28°C

light rain

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन द्या

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन द्याआंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आवाहन, वॉशिंग्टन, ३ नोव्हेंबर – कोरोना महामारीमुळे तरलतेच्या सापळ्यात अडकलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणखी प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्री गीता गोपीनाथ यांनी धोरणकर्त्यांना केले आहे. जागतिक पातळीवरील ९७ टक्के प्रगत अर्थव्यवस्थांसह ६० टक्के अर्थव्यवस्थांच्या केंद्रीय बँकांनी धोरणात्मक व्याजदर १ टक्क्यापेक्षा कमी ठेवले आहे. जगातील एकपंचमांश अर्थव्यवस्थांचा दर उणे झाला आहे, असे गोपीनाथ यांनी फायनान्शियल टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. आणखी एक धक्का बसल्यास केंद्रीय बँकांकडे व्याजदर...4 Nov 2020 / No Comment /

फ्रान्सचा हवाईहल्ला, ५० अतिरेकी ठार

फ्रान्सचा हवाईहल्ला, ५० अतिरेकी ठारअल्-कायदाला मोठा दणका, ५ अतिरेक्यांना जिवंत पकडले, बामाको (माली), ३ नोव्हेंबर – माली देशाच्या मध्यवर्ती भागात फ्रेंच वायुदलाने केलेल्या हवाईहल्ल्यात अल्-कायदाचे ५० अतिरेकी ठार झाल्याची माहिती फ्रान्स सरकारने आज सोमवारी दिली. मुस्लिम दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू असलेल्या माली देशात, बुर्किना फासो आणि नायजेरिया या तीन देशांच्या सीमा एकत्र येतात त्या भागाजवळ शुक्रवारी हा हल्ला करण्यात आला, अशी माहिती फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले यांनी दिली. या कारवाईत चार...4 Nov 2020 / No Comment /

पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड

पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोडएका महिन्यातील तिसरी घटना, इस्लामाबाद, २ नोव्हेंबर – पाकिस्तानात अल्पसंख्यक हिंदूंचा छळ करण्याच्या घटना वाढत असतानाच, कराची येथे आज सोमवारी प्राचीन हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली. या मंदिरातील देवतेचा पुतळा आणि प्रतिमेचीही विटंबना करण्यात आली. आज सकाळी काही भाविक दर्शनासाठी मंदिरात गेले असता, त्यांना हा प्रकार दिसून आला. या घटनेचे वृत्त परिसरात पसरताच, शेकडो लोक रस्त्यावर उतरले आणि निषेध करू लागले. यापूर्वी १० आणि २४ ऑक्टोबर रोजी सिंध प्रांतात अशाच...3 Nov 2020 / No Comment /

राष्ट्राध्यक्षपदासाठी अमेरिकेत आज मतदान

राष्ट्राध्यक्षपदासाठी अमेरिकेत आज मतदानकोरोना महामारीचे सावट, वॉशिंग्टन, २ नोव्हेंबर – कोरोना महामारीच्या सावटात जगातील जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत उद्या मंगळवारी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यंदाची निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असल्याचा अंदाज आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसर्‍यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांचे आव्हान आहे. बिडेन हे बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना उपराष्ट्राध्यक्ष होते. निवडणूक प्रचारात कोरोनाचा संसर्ग, वर्णद्वेष, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण आदी मुद्दे ठळकपणे समोर आले होते. अमेरिकेच्या...3 Nov 2020 / No Comment /

अयाझ सादिक यांना देशद्रोही घोषित?

अयाझ सादिक यांना देशद्रोही घोषित?इस्लामाबाद, १ नोव्हेंबर – खासदार अयाझ सादिक यांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेमागील सत्य सांगून पाकिस्तान सरकारला उघडे पाडले आहे. सरकारपुढील अडचणी वाढण्याच्या शक्यतांमुळे सादिक यांना देशद्रोही घोषित करण्याचा निर्णय पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. अयाझ सादिक यांनी देशविरोधी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असे माहिती आणि प्रसारण मंत्री शिबली फराज यांनी सांगितले. शनिवारी गृहमंत्री इजाज शाह यांनीही सादिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा...1 Nov 2020 / No Comment /

तुर्कीत शेकडो लोक ढिगार्‍याखाली दबल्याची भीती

तुर्कीत शेकडो लोक ढिगार्‍याखाली दबल्याची भीती२४ ठार, ८०० जखमी, अंकारा, ३१ ऑक्टोबर – तुर्कीमधील ईझमिर शहरात शुक्रवारी आलेल्या मोठ्या तीव्रतेच्या भूकंपामुळे अनेक इमारती पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या असून, ढिगार्‍यात शेकडो लोक दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला, तर ८०० हून अधिक जखमी झाले आहेत. भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय ग्रीसमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुर्कीचे आरोग्य मंत्री फर्हेटीन कोका यांच्यानुसार, भूकंपात जखमी झालेल्या ४३५ जणांवर...31 Oct 2020 / No Comment /

आशियाई देशांनी फेटाळला चीनचा दावा

आशियाई देशांनी फेटाळला चीनचा दावाचीनने केला दक्षिण चीन सागरावर दावा, मनिला, २८ जून – दक्षिण चीन सागरावर चीनने केलेला दावा आग्नेय आशियातील देशांनी फेटाळला आहे. दक्षिण चीन सागरी प्रदेशात १९८२ चा संयुक्त राष्ट्रांचा महासागरी करार सार्वभौम हक्क व इतर मालकी हक्कांबाबत आधारभूत मानावा, असे आग्नेय आशियातील नेत्यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांनी १९८२ मध्ये केलेला यूएनसीएलओएस करार सार्वभौम हक्क, कार्यक्षेत्र व कायदेशीर हक्क यास प्रमाणभूत मानावा, असे आशियाई देशांच्या वतीने व्हिएतनामने जारी केलेल्या एका निवेदनात...29 Jun 2020 / No Comment /

खोटी माहिती पसरवणार्‍या पोस्टवर फेसबुक करणार कारवाई

खोटी माहिती पसरवणार्‍या पोस्टवर फेसबुक करणार कारवाईऑकलंड, २८ जून – फेसबुकवरील द्वेषयुक्त भाषणे व समाजामध्ये फूट पाडण्यार्‍या पोस्ट वाढत असल्यामुळे अनेक कंपन्यांनी फेसबुकवर बहिष्कार टाकला आहे. या कंपन्यांच्या बहिष्कारामुळे फेसबुकच्या शेअरची किंमत आठ टक्क्यांनी घसरली असून, कंपनीचे बाजारमूल्य तब्बल ५० अब्ज डॉलर्सनी घसरले आहे. दरम्यान, राजकीय नेत्यांच्या पोस्टवर इशारा देणारे झेंड्याचे चिन्ह लावणार असल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टवरून या वादाला सुरुवात झाली होती. अध्यक्षपदाच्या मेल-इन मतदानातून घोटाळा होईल, असे भाकीत...28 Jun 2020 / No Comment /

३७० निष्प्रभ करण्याची दीर्घकाळापासून होती प्रतीक्षा

३७० निष्प्रभ करण्याची दीर्घकाळापासून होती प्रतीक्षाएस. जयशंकर यांचे प्रतिपादन, वॉशिंग्टन, ३ ऑक्टोबर – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० निष्प्रभ करून योग्य उपाययोजना करण्याची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. काश्मीरमधील दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे हा देश कलम ३७० निष्प्रभ करण्याच्या निर्णयाला आव्हान देईल, या निर्णयात अडथळे आणण्याचा प्रयत्न करेल, याची अपेक्षा भारताला होती, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ५ ऑगस्ट रोजी कलम ३७०...4 Oct 2019 / No Comment /

पाकिस्तानने दीड महिन्यानंतर पत्रकारांना नेले बालाकोटला

पाकिस्तानने दीड महिन्यानंतर पत्रकारांना नेले बालाकोटलाइस्लामाबाद, ११ एप्रिल – भारताने बालाकोटमध्ये जैशच्या अड्ड्यावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर तब्बल ४३ दिवसांनी पाकिस्तान बुधवारी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना घटनास्थळी घेऊन गेले होते. भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील ज्या जाबा टेकडीच्या परिसरात हल्ला केला त्या भागातील परिस्थिती दाखवण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. पत्रकार आणि राजनैतिक अधिकार्‍यांना जाबा टेकडीवरील मदरशामध्ये नेण्यात आले त्यावेळी तिथे १०० ते १५० मुले शिक्षण घेत होती. २६ फेब्रुवारीला भारताने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये जणू काही घडलेच नाही हे दाखवण्याचा पाकिस्तानचा...12 Apr 2019 / No Comment /

ब्रेक्झिटच्या सर्वच पर्यायी योजनांविरोधात मतदान

ब्रेक्झिटच्या सर्वच पर्यायी योजनांविरोधात मतदानलंडन, २ एप्रिल – युरोपियन युनियनसोबत केलेला करार तीन वेळा नाकारणार्‍या ब्रिटिश खासदारांनी ब्रेक्झिटच्या चार संभाव्य पर्यायी योजनांच्या विरोधात आज मंगळवारी मतदान केले आहे. युरोपियन युनियनच्या बाहेर पडल्यावर त्यासोबत आर्थिक संबंध कायम ठेवण्यासाठी प्रस्तावित पर्यायानुसार दुसर्‍यांदा सार्वमत घेण्यासाठी किंवा ब्रेक्झिट रोखण्यासाठी बहुमत प्राप्त करण्यास ब्रिटिश संसद अपयशी ठरली आहे. दुसर्‍या सार्वमतादरम्यान प्रस्तावाच्या बाजूने सर्वाधिक २८० मते प्राप्त झाली. मात्र, प्रस्तावाविरोधात २९२ मते पडली आहेत. युरोपियन युनियनसोबत कायम ठेवण्याचा सर्वाधिक मते...3 Apr 2019 / No Comment /

पाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार

पाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार=जमात-उद-दावा लढणार २०० जागा, वृत्तसंस्था लाहोर, ९ जून – मुंबईवरील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिझ सईदची जमात-उद-दावा ही दहशतवादी संघटना पाकिस्तानात पुढील महिन्यात होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा लढवणार आहे. यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात आता अतिरेक्यांचाही प्रवेश होणार आहे. पाकमध्ये येत्या २५ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. जमात-उद-दावाने मिल्ली मुस्लिम लीग हा राजकीय पक्ष स्थापन केला आहे, तथापि, त्याची निवडणूक आयोगात अद्याप नोंद झालेली नाही. आता...10 Jun 2018 / No Comment /