किमान तापमान : 30.33° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.01 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशरत्नागिरी, [२९ एप्रिल] – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना भाजपाने जिल्ह्यातील आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे जाहीर केले आहे. भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या शिबिरात खुद्द जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी या धोरणाचे सूतोवाच केल्याने युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणुकीत आतापर्यंत दोन्ही पक्षांनी युती करून विरोधकांशी लढा दिला आहे. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढल्यानंतर स्थानिक पातळीवरील वाद वाढले आहेत. त्यातच केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारचा टीआरपी वाढत गेल्याने भाजपाच्या वाढीसाठी जिल्ह्यात आता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ वर्षांपूर्वी शिवसेनेशी युती केल्याने रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाची वाढ थांबून त्याचे बोन्सायमध्ये रूपांतर झाल्याचे खुद्द माने यांनी स्पष्ट केले आहे, पक्षाचे पुन्हा वृक्षामध्ये रूपांतर होण्याच्या दृष्टीने आता स्वत:ची ताकद सिद्ध करणे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांचा प्रभाव वाढवणे हे उद्दिष्ट बाळगायचे असून, जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी या शिबिरात स्पष्ट केले. दापोली येथे भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे दोन दिवसीय शिबीर नुकतेच पार पडले. वर्षअखेरीस होणार्या नगरपंचायत निवडणुका आणि त्यानंतर येणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या शिबिरात भाजपा काय भूमिका घेणार, याकडे सर्वाचे लक्ष होते. जिल्ह्यातील भाजपाचे मातब्बर नेते बाळ माने यांची पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ही पहिलीच जिल्हास्तरीय बठक होती. त्यामुळेदेखील या बैठकीला महत्त्व निर्माण झाले होते.