किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०७ फेब्रुवारी) – निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. शरद पवार गटाने कोणतीही याचिका दाखल केल्यास त्यांचीही बाजू ऐकून घ्यावी, असे अजित पवार गटाने म्हटले आहे. अजित गटाने वकील अभिकल्प प्रताप सिंग यांच्यामार्फत कॅव्हेट दाखल केले आहे. त्यांनी या कॅव्हेटमध्ये म्हटले आहे की, जर अन्य पक्षाने याचिका दाखल केली असेल तर त्यांची बाजूही ऐकून घेतली जावी. न्यायालयाने एकतर्फी स्थगितीचा आदेश देऊ नये.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची पोस्टर्स लावण्यात आली आहेत. या पोस्टरमध्ये आजही विजय आमचाच, चिन्ह तुमचे आणि बाप आमचा असे लिहले आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादीच्या दाव्याबाबत निर्णय दिला आहे. आयोगाने अजित पवार गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असे म्हटले आहे.