किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, (०३ नोव्हेंबर) – आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पार पडली. पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे. अध्यक्षांनी १६ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचा आदेश शिवसेनेला दिला आहे. शिवसेना आमदारांच्या एकूण ३४ याचिकांचे सहा गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीला ठाकरे गटाचे अनिल देसाई, सुनील प्रभू आणि अजय चौधरी उपस्थित होते.
शिवसेनेेचे कुणीही उपस्थित नव्हते. त्यावेळी दोन्ही गटांमध्ये ई-मेलवरच्या व्हीपवरून जोरदार युक्तिवाद झाला. शिवसेना आणि ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाली. तब्बल दीड तास व्हीपच्या मुद्यावरून दोन्ही गटांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. आमदारांना जारी करण्यात आलेला व्हीप हा ई-मेलच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाच्या वकिलांनी केला; तर तो व्हीप आपल्याला मिळालाच नसल्याने व्हीपचे उल्लंघन केले नसल्याचे शिवसेनेच्या वकिलांनी सांगितले.
आम्ही व्हीप पाठवलेला ई-मेल चुकीचा आहे तर, बरोबर कुठला आहे, ते त्यांनी सांगावे. तुम्ही म्हणता ई-मेल दिला आहे, पण ते म्हणतात तसश चुकीचा ई-मेल दिला असेल तर, त्याला उत्तर काय, असा सवाल राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या वकिलांना केला. त्यावर ठाकरे गटाने सांगितले की, आम्ही व्हीप पाठवलेला ई-मेल चुकीचा आहे तर, बरोबर कुठला आहे, ते त्यांनी सांगावे. या प्रकरणात नव्याने पुरावे सादर करण्याची गरज नाही. गेल्या सुनावणीत आपण अर्ज दाखल केला होता. जे पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहेत, त्याला माझा विरोध नाही. न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे सुनावणी घ्यावी, असे नार्वेकर म्हणाले.
मला मर्यादित वेळेत ही सुनावणी घ्यायची आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होत आहे. २५ सप्टेंबरच्या निर्णयानुसार पुरावे सादर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर २८ ऑक्टोबरला अर्ज दाखल केले. मात्र, अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर व्हीपसंदर्भात प्रश्न निर्माण केला. शिवसेनेने मेल मिळालाच नसल्याचे सांगितले. मी दोन्ही गटाच्या सहमतीने पुरावे सादर करण्यास परवानगी देत आहेत तसेच फेरसाक्ष घेण्याचा निर्णयही घेत आहे. दोन्ही गटाच्या वकिलांची यास सहमती आहे, असे नार्वेकर म्हणाले.