किमान तापमान : 30.33° से.
कमाल तापमान : 30.77° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 4.01 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.77° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– तुम्ही रक्ताची चटक लागलेल्या राजकारणी आहात की काय?,
– सुळे यांची कावेबाज ‘माणुसकी’ प्रत्यक्षात हिडीस आणि ओंगळ,
– शांत करण्याऐवजी सुप्रिया सुळे यांची वारंवार चिथावणीखोर वक्तव्य,
– चित्रा वाघ यांचा खा. सुप्रिया सुळेंवर घणाघात,
मुंबई, (०२ नोव्हेंबर) – मराठा आरक्षणावरून आंदोलन सुरू असताना ते शांत करण्याऐवजी सुप्रिया सुळे वारंवार चिथावणीखोर वक्तव्य करीत असून, यातून त्यांचा खोट्या माणुसकीचा बुरखा फाटल्याची घणाघाती टीका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विटद्वारे केली. सुळे यांची कावेबाज ‘माणुसकी’ प्रत्यक्षात हिडीस आणि ओंगळ आहे. तुम्ही रक्ताची चटक लागलेल्या राजकारणी आहात की काय, अशी शंका येत असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे यांना जळी, स्थळी, काष्ठी सर्वत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. ज्याप्रमाणे कावीळ झालेल्या व्यक्तीना सगळे पिवळे दिसते, त्याप्रमाणे सुळे यांना फडणवीसांनी काहीही केले तरी, त्यात वावगेच दिसते. सुप्रियाताई, हा आजार बरा नव्हे; त्यामुळे लवकर उपचार घ्या, असा खोचक सल्लाही वाघ यांनी दिला. वड्याचे तेल वांग्यावर या प्रमाणे सुप्रिया आपल्या भावाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राग देवेंद्रजींवर काढत असून, त्याचा काहीच फायदा होणार नाही. या परिस्थितीत तुमचा चिडचिडेपणा का वाढला, याचे कारण राज्यातील सूज्ञ जनतेला माहिती आहे. सत्ताधारी आमदारांची कदापी तुम्ही चिंता करू नका, त्यांचा ठाम विश्वास सरकारवर आहे. तुम्हीच तुमच्या आमदारांची काळजी करा, कारण तुमच्याच पक्षातील आमदारांचा तुमच्यावर किती भरवसा आहे, हे तुम्हाला कळून चुकले असेलच. ‘अर्श से फर्श’ अशी केविलवाणी स्थिती तुमची झाली असून, याहून अधिक अधोगती ती काय असू शकते, असा टोलाही वाघ यांनी मारला आहे.