किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 31.05° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.05° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश‘बिग बॉस’ विजेत्याची अकाली एक्झिट,
मुंबई, २ सप्टेंबर – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या ४० व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अतिशय धक्कादायक एक्झिट घेतलेल्या सिद्धार्थच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. यानंतर सकाळी तो झोपेतून उठलाच नाही. त्याला सकाळी मुंबईतील कुपर रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. झोपेतच हृदय विकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे.
सिद्धार्थ छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता होता. ‘बालिका वधू’ या मालिकेतून त्याने अनेकांची मने जिंकली होती. त्याने रिऍलिटी शो ‘बिग बॉस १३’मध्ये भाग घेतला होता आणि त्या सिझनचा तो विजेताही ठरला होता. त्यानंतर त्याने ‘खतरों के खिलाडी’ या शोचे सातव्या पर्वातील विजेतेपद पटकाविले होते. आपल्या करिअरमध्ये सिद्धार्थने फार कमी वेळात मोठी उंची गाठली होती.
कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा तो मालक होता. २०२० पर्यंत त्याची एकूण संपत्ती १.५ मिलिअन डॉलर्स म्हणजेच १० कोटी ९४ लाख ५५ हजार ७५० रुपये इतकी होती.
१२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ मध्ये त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८ मध्ये त्याने ‘बाबुल का आंगन छूटे’ या मालिकेत काम केले, पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती. घ(वृत्तसंस्था)
‘बालिका वधू’तील तीनही कलाकारांचा अंत
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध मालिका ‘बालिका वधू’ मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केले. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली. ज्या कलाकारांमुळे मालिकेला यश मिळाले आज ते त्यांच्या चाहत्यांमध्ये नाहीत. अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी, ज्येष्ठ अभिनेत्या सुरेखा सिकरी यांच्यानंतर आता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने या जगाचा निरोप घेतला आहे.