किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, (०६ जुलै) – मुंबईत बुधवारी रात्रभर मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली व शहरात आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सावधगिरी बाळगण्यासाठी ‘ऑरेंज’ इशारा दिला आहे. पहाटे ४.४५ च्या सुमारास पाणी साचल्यामुळे बेस्टच्या काही बसेसचे मार्ग सायन येथे वळवण्यात आले. सकाळी ८ वाजता मार्ग पूर्ववत करण्यात आले असून शहरात बससेवा सुरळीत सुरू आहे, असे बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अॅण्ड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक‘माच्या एका अधिकार्याने सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) पावसाच्या आकडेवारीनुसार, बुधवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला आणि दादर, माहीम, खार, माटुंगा आणि कुर्ला यांसारख्या काही भागांत गेल्या १२ तासांत ४० मिमी ते ७० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने बुधवारी सायंकाळी आपल्या ‘जिल्हा अंदाज आणि इशारे’ मध्ये शहरासाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही मार्गांवर लोकल गाड्या सामान्यपणे धावत होत्या, असे रेल्वे अधिकार्यांनी सांगितले, परंतु काही प्रवाशांनी उपनगरीय सेवांना उशीर झाल्याचा दावा केला आहे.