Posted by वृत्तभारती
Thursday, February 23rd, 2023
मुंबई, (२२ फेब्रुवारी ) – शिवसेना वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण आले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे या सगळ्यामागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला चढवण्याचा ठेका दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. राज्यात सरकार...
23 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 21st, 2023
मुंबई, (२१ फेब्रुवारी ) – शिवसेना खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातून कॉन्ट्रॅक्ट किलर नेमल्याचा आरोप उद्धव कॅम्पचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ठाण्यातील राजा ठाकूर या गुंडाला ’सुपारी’ दिल्याचे समजल्याचे पत्र संजय राऊत यांनी पोलिसांना लिहिले आहे. उद्धव गटाकडून शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह हिसकावून घेण्यात आल्याने महाराष्ट्रात उलट-सुलट आरोपांची प्रक्रिया सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने...
21 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, February 20th, 2023
मुंबई, (२० फेब्रुवारी ) – महाराष्ट्रात राजकीय संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे गटाला सातत्याने धक्के बसत आहेत. शिंदे यांनी आधी उद्धव ठाकरेंना सत्तेतून बेदखल केले, नंतर शिवसेना पक्ष आणि त्याचे निवडणूक चिन्ह ताब्यात घेतले.आता शिंदे गटाने विधानसभेतील पक्ष कार्यालयही काबीज केले आहे. यानंतर शिंदे गट शिवसेनेची इमारतही काबीज करेल, अशी शक्यता आहे. मात्र शिंदे गटाने तो फेटाळला आहे. एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते सदा सरवणकर यांनी...
20 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, February 20th, 2023
मुंबई, (२० फेब्रुवारी ) – उद्धव ठाकरेंसाठीही आजचा दिवस दुहेरी त्रासदायक ठरला आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. याशिवाय विधानसभेत असलेले शिवसेनेचे कार्यालयही एकनाथ शिंदे गटाच्या ताब्यात देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी सभापती राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन ही मागणी केली. त्यानंतर सभापतींनी हा निर्णय घेतला. अशाप्रकारे विधानसभेचे कार्यालय शिवसेनेच्या हातातून गेले आहे. याशिवाय...
20 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 18th, 2023
– कंगना राणावतचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, मुंबई, (१८ फेब्रुवारी ) – बॉलिवूडची ‘पंगाक्विन’ कंगना राणावत वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. आता एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर कंगनाने ट्विट करीत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. कंगनाने लिहिले आहे, ‘वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात् इंद्रालादेखील शिक्षा मिळाली आहे. हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझे घर तोडले, त्यावेळीच मला वाटले होते की, यांचे वाईट दिवस आता...
18 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 2nd, 2023
मुंबई, (२ फेब्रुवारी ) – अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्यांच्या आंदोलनामुळे सोलापूर आणि कोल्हापूर विद्यापीठानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या उद्यापासून सुरू होणार्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या कर्मचार्यांच्या परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्कारच्या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाने उद्यापासून सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थगित परीक्षांचे लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठे त्यासोबतच महाविद्यार्थी शिक्षकेतर कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये परीक्षेच्या कामकाजावर...
2 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 2nd, 2023
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनपा आयुक्तांना निर्देश, मुंबई, (२ फेब्रुवारी ) – मुंबई महानगरातील प्रदूषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणार्या नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अतंर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांना दिले आहेत. मुंबई महापालिकेचा या वर्षाचा अर्थसंकल्प...
2 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 31st, 2023
भ्रष्टाचाराविरुद्ध मुंबई महापालिकेची धडक मोहीम, मुंबई, (३१ जानेवारी) – मुंबई भाजपाने पोलखोल सभा घेऊन महापालिकेतील भ्रष्टाराविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. त्याचीच परिणीती की काय, शिंदे-फडणवीस सरकार येताच भ्रष्टाचारात लीन असलेल्या पालिका प्रशासनाने भ्रष्ट कर्मचार्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेने भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेले ५५ कर्मचारी सेवेतून काढून टाकले तर, गुन्ह्याची नोंद झालेले ५३ व अन्य फौजदारी प्रकरणी गुन्हा नोंद झालेले ८१ याप्रमाणे एकूण १३४ कर्मचारी निलंबित केले. बृहन्मुंबई महानगरपालिका...
31 Jan 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 31st, 2023
शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय, मुंबई, (३१ जानेवारी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यगीताबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून हे गीत अंगिकारण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मंत्रिमंडळात याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला...
31 Jan 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 30th, 2023
मुंबई, (३० जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १० फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. अंधेरी पूर्वमधील मरोळ बोहरा कॉलनीत बोहरा मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेल्या अल् जमिया तस सैफिया या विद्यापीठाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधानांच्या या दौर्यासाठी पोलिसांनी आतापासूनच सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी रविवारी दुपारी कॉलनीत चार तास सुरक्षेची पाहणी केली होती. आज...
30 Jan 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 18th, 2022
नितीश भारद्वाज यांची व्यथा, मुंबई, १८ जानेवारी – घटस्फोट घेण्यामागे जोडप्यांची कारणे बरीच असू शकतात. मात्र, एक नक्की सांगू शकतो की, घटस्फोट हा कधीकधी मृत्युपेक्षाही जास्त वेदनादायी असू शकतो, अशी व्यथा पत्नीपासून विभक्त झालेले अभिनेता नितीश भारद्वाज यांनी व्यक्त केली. छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘महाभारत’ या पौराणिक मालिकेत कृष्णाची भूमिका अजरामर करणारे अभिनेता नितीश भारद्वाज लग्नाच्या १२ वर्षांनंतर पत्नी स्मिता गाते यांच्यापासून वेगळे झाले आहेत. स्मिता गाते या सनदी अधिकारी आहेत....
18 Jan 2022 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 1st, 2022
नारायण राणेंचा शिवसेनेला दणका, सिंधुदुर्ग, ३१ डिसेंबर – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात भाजपाने १९ पैकी ११ जागा जिंकत निर्विवाद सत्ता मिळवली आहे. नारायण राणे यांनी हे यश संपादन करून एकप्रकारे शिवसेनेला दणका दिला असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला आठ जागांवर समाधान मानावे लागले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या...
1 Jan 2022 / No Comment / Read More »