Posted by वृत्तभारती
Thursday, April 27th, 2023
-केंद्र सरकारची मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही, मुंबई, (२७ एप्रिल) – माहिती-तंत्रज्ञान नियमांतील दुरुस्तीनुसार तयार केलेला विशेष कक्ष ५ जुलैपर्यंत कार्यान्वित होणार नाही, अशी ग्वाही केंद्र सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. न्यायालयाने याची दखल घेत हास्यकलाकार कुणाल कामराकडून या सुधारणेला दिलेल्या आव्हानावरील याचिकेवरील अंतिम सुनावणी ८ जून रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. याचिकाकर्त्यांना याचिकेत नवी सुधारणा करण्यास २ मेपर्यंतची मुभा देत दोन्ही पक्षकारांना आपला अंतिम मसूदा ६ जूनपर्यंत सादर करण्याचा...
27 Apr 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, April 15th, 2023
मुंबई, (१५ एप्रिल) – मुंबई महानगरपालिका म्हणजेच ही देशातील सर्वात जास्त पैसे कमावणारी महापालिका आहे. बीएमसी च्या बजेटचा विचार केला तर तो देशातील इतर महानगरपालिकांपेक्षा जास्त आहे. मात्र आता कॅन्टीनमधून चमचे, प्लेट्स आणि ग्लास गायब झाल्याची बाब समोर येत आहे. मुंबईतील बीएमसी मुख्यालयाच्या कॅन्टीनमधून गेल्या वर्षभरात हजारो प्लेट्स, चमचे आणि ग्लास गायब झाले आहेत. बीएमसी मुख्यालयात दररोज हजारो लोक येतात, तसेच महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्या कार्यालयात जेवण आणि नाश्ता...
15 Apr 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, March 28th, 2023
नवी दिल्ली, (२८ मार्च) – दिल्ली उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. एकनाथ शिंदे गटाचे नेते राहुल रमेश शेवाळे यांनी दाखल केलेल्या दिवाणी मानहानीच्या खटल्यात तिघांनाही समन्स बजावण्यात आले आहे. आता या प्रकरणाची सुनावणी १७ एप्रिलला होणार आहे. शिवसेनेने आपल्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखावरून एकनाथ शिंदे गटाचे नेते राहुल रमेश शेवाळे यांनी उद्धव ठाकरे, त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे आणि सामनाचे...
28 Mar 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, March 23rd, 2023
– एकनाथ शिंदे यांचे लोकसभेच्या सभापतींना पत्र, – गजानन कीर्तीकर यांची नव्याने नियुक्ती, नवी दिल्ली, (२३ मार्च) – शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून खासदार संजय राऊत यांना हटवले आहे. त्यांच्या जागी संसदीय नेतेपदी खासदार गजानन कीर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत मु‘यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून माहिती दिली आहे. या माध्यमातून शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे...
23 Mar 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 12th, 2023
मुंबई, (१२ मार्च) – शिवसेनेच्या आमदाराचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील दहिसर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंवि कलम ३५४, ५०९, ५०० आणि ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींनी शिवसेना आमदार (शिंदे गट) प्रकाश सुर्वे यांचा महिला नेत्यासोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ एडिट करून व्हायरल केल्याचा आरोप आहे. शिवसेनेच्या महिला नेत्या आणि आमदार प्रकाश सुर्वे यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीला हजेरी लावली होती. या रॅलीदरम्यान महिला नेत्या...
12 Mar 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, March 11th, 2023
मुंबई, (११ मार्च) – प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जिल्हा पोलिसांच्या गुन्हे पथकाने दक्षिण पश्चिम दिल्लीतील फार्महाऊसला भेट दिली जेथे पार्टी आयोजित केली होती आणि काही ’ड्रग्ज’ जप्त केली. फार्महाऊसमधून जप्त केलेली औषधे कोठून आली, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका उद्योगपतीच्या फार्म हाऊसवर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. ही तीच पार्टी आहे ज्यामध्ये सतीश कौशिक...
11 Mar 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, March 6th, 2023
मुंबई, (६ मार्च) – निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे नाव आणि चिन्ह हिसकावून एकनाथ शिंदे छावणीला वारसा दिला असला तरी, लढा सुरूच आहे. आम्ही स्वतःला शिवसेना म्हणवत राहू असं उद्धव ठाकरे म्हणतात. एवढेच नाही तर पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्याची घोषणाही करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी रविवारी रत्नागिरीतील खेड येथील सभेला संबोधित करून नेत्यांचे स्वागत केले. गेल्या वर्षी राज्यात बंडखोरी करून त्यांचे सरकार पाडल्यानंतर तळागाळातील कार्यकर्त्यांचे मनोधैर्य...
6 Mar 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 5th, 2023
– उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका, रत्नागिरी, (५ मार्च) – मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळला. यांना देशभर फिरून, गुवाहाटीला जाऊन तो सांभाळता येत नाही. यांचा अर्धा वेळ दिल्लीत मुजरा करायला जातो, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर रविवारी केली. शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर पहिल्यांदाच रत्नागिरीतील खेड येथे आयोजित केलेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. ज्यांना शक्य आहे तितके दिले, पण...
5 Mar 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 5th, 2023
– छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रारंभ, मुंबई, (५ मार्च) – भाजपा आणि शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेला घाटकोपर पश्चिम अमृतनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रविवारी दिमाखात सुरुवात झाली. भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, खासदार मनोज कोटक यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्येतून आणलेला धनुष्यबाण उंचावत यात्रेची सुरुवात झाली. यावेळी हजारोंच्या सं‘येने भाजपा-शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. एकूण सहा लोकसभा मतदार संघातून ही यात्रा निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण...
5 Mar 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, March 3rd, 2023
मुंबई, (२ मार्च) – मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल आता मराठी भाषेतही उपलब्ध होणार आहेत. बुधवारी अनेक निर्णयांचे हिंदीतून मराठीत भाषांतर करून उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले. आता स्थानिक लोकांना उच्च न्यायालयाचा निकाल त्यांच्याच भाषेत वाचता येणार आहे. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या टिप्पणीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यात त्यांनी देशातील न्यायालयांना लोकांसाठी स्थानिक भाषेत निर्णय देण्यास सांगितले होते. न्यायालयाच्या वेबसाइटच्या होमपेजवर स्वतंत्र विभाग (निवादक निर्णय) तयार...
3 Mar 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 25th, 2023
मुंबई, (२५ फेब्रुवारी ) – उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष आणि निवडणूक चिन्ह हिसकावून घेतल्यानंतर आता रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील १९ बंगला घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिसांनी ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच ते ग्रामसभेच्या सदस्यांवर बंगला कर वसुलीत शासनाची जाणीवपूर्वक दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीच्या वह्यांमध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला...
25 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 23rd, 2023
ठाणे, (२३ फेब्रुवारी ) – मला मारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांनी एका हिस्ट्री शीटरला भाडोत्री म्हणून घेतल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात ठाण्यात तीव्र निदर्शने केली. शिवसेनेच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या तक्रारीवरून खा. संजय राऊत यांच्या विरोधात कापूरबावडी पोलिस ठाण्यात एक दिवसापूर्वी, विविध गटांमध्ये तेढ निर्माण करणे, बदनामी करणे आणि इतर गुन्हे दाखल...
23 Feb 2023 / No Comment / Read More »