Posted by वृत्तभारती
Monday, May 16th, 2016
=किरीट सोमय्यांची शिवसेनेच्या मुखपत्राला नोटीस= मुंबई, [१६ मे] – भारतीय जनता पार्टीचे खासदार किरीट सोमय्या यांच्याविषयी खोटी व बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल दैनिक सामना या वृत्तपत्राने ४८ तासांत विनाअट माफी मागून त्याला वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर बातमीइतकीच प्रसिद्धी द्यावी, अन्यथा या वृत्तपत्राच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू, असा इशारा कायदेशीर नोटिशीद्वारे देण्यात आला आहे. दै. सामना या वृत्तपत्राने रविवार, १५ मे २०१६ रोजीच्या अंकात पहिल्या पानावर ‘बिनबुडाच्या किरीट सोमय्यांचा घोटाळा’ अशा शीर्षकाची...
16 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, May 16th, 2016
मुंबई, [१६ मे] – दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. त्यामुळे उन्हाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना वेध लागले आहे ते पावसाचे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडणार आहे, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. यंदाच्या पावसाळ्यात ६ जून रोजी समुद्राला सर्वात मोठी भरती येणार आहे, अशी माहिती प्रख्यात खगोल अभ्यासक व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. पावसाच्या दिवसात मुंबईत समुद्राच्या भरतीच्या वेळेला पाणी साचण्याची भीती अधिक आहे. अशावेळी नगर पालिकेलाही आपत्कालीन यंत्रणा...
16 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, May 15th, 2016
मुंबई, [१४ मे] – बदलत्या जीवनशैलीत टीव्हीचा मोठा परिणाम बालमनावर होत असून ९७ टक्के मुले टीव्हीच्या जाळ्यात अडकल्याचे वास्तव टर्नस न्यू जनरेशन संस्थेने नुकत्यात केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. मुंबईत ९७ टक्के मुलांचा टीव्ही पाहण्याकडे अधिक कल असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. तर ४४ टक्के मुलांचे लक्ष केवळ अभ्यासाकडेच असल्याचे उघड झाले आहे. तर २९ टक्के मुले सोशल नेटवर्किंग साईट्सवर गुंतली आहेत. मुंबईतील ५ ते १४ वयोगटांतील सात हजारांहून अधिक लहान...
15 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, May 6th, 2016
मुंबई, [६ मे] – परराज्यातून महाराष्ट्रात येणार्या गोवंश मांस (बीफ) विक्रीला मुंबई उच्च न्यायालयाने आज शुक्रवारी परवानगी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्याचबरोबर बाहेर राज्यातून येणारे गोवंश मांस बाळगताही येणार आहे, तसेच ते खाण्यासही कोणतीही बंदी घातलेली नाही. मात्र, त्याचवेळी राज्यात लागू असलेली गोवंश हत्याबंदी कायम राहणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला होता. या कायद्यानुसार गोवंश हत्या, गोमांस...
6 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, May 6th, 2016
मुंबई, [६ मे] – महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटळ्याबाबत सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते छगन भुजबळ यांचे सीए सुनील नाईक हे माफीचा साक्षीदार बनले आहेत. सुनील नाईक यांना गुरूवारी ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना सत्र न्यायालयातील ‘ईडी’ न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. सुनील नाईक हे भुजबळांच्या वांद्रे येथील एज्युकेशन ट्रस्टचे ‘सीए’ होते. त्यामुळे त्यांच्याकडून समीर आणि छगन भुजबळ यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत तपशील...
6 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, April 30th, 2016
रत्नागिरी, [२९ एप्रिल] – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना भाजपाने जिल्ह्यातील आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे जाहीर केले आहे. भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या शिबिरात खुद्द जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी या धोरणाचे सूतोवाच केल्याने युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणुकीत आतापर्यंत दोन्ही पक्षांनी युती करून विरोधकांशी लढा दिला आहे. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढल्यानंतर स्थानिक पातळीवरील वाद वाढले आहेत. त्यातच केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस...
30 Apr 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, April 28th, 2016
=महाराष्ट्र सदन व अन्य प्रकल्पांतील घोटाळा= मुंबई, [२७ एप्रिल] – राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणात आणि अन्य प्रकल्पांच्या अंमलबजावणीत झालेल्या घोटाळ्यांप्रकरणी दाखल असलेल्या बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यातील गुन्ह्यांतर्गत विशेष न्यायालयाने आज बुधवारी राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला आहे. यामुळे पंकज यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घोटाळ्यांतील आरोपी क्रमांक तीनविरुद्ध (पंकज भुजबळ) आपले न्यायालय अजामीनपात्र अटक...
28 Apr 2016 / No Comment / Read More »