|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

आमिर खान याचा दुसरा ‘तलाक’

आमिर खान याचा दुसरा ‘तलाक’मुंबई, ३ जुलै – बॉलीवूड क्षेत्रातील ख्यातनाम जोडी आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आपल्या १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून, त्यामुळे चाहत्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी होती. या दोघांनी अनेक चित्रपटांच्या प्रकल्पांवर आणि पाणी फाऊंडेशन तसेच इतरही अनेक प्रकल्पांवर एकत्रित काम केले आहे. आम्ही दोघे विभक्त होत असलो तरी एक पालक आणि परिवार म्हणून आम्ही...3 Jul 2021 / No Comment / Read More »

मुंबईत इमारत दुर्घटनेत ११ ठार; १७ जण गंभीर

मुंबईत इमारत दुर्घटनेत ११ ठार; १७ जण गंभीरसदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, मुंबई, १० जून – मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमधील मालवणी परिसरात असलेल्या न्यू कलेक्टर कंपाउंडमधील एका तीन मजली चाळीचा काही भाग बुधवारी रात्री उशिरा कोसळला. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून, १७ जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत तीव्र शोक व्यक्त केला. इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी...10 Jun 2021 / No Comment / Read More »

पहिल्याच पावसात मुंबई तुंबली

पहिल्याच पावसात मुंबई तुंबलीठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ, तीन तासांत झाला विक्रमी पाऊस, मुंबई, ९ जून – मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कोसळलेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले. अवघ्या तीन तासांमध्ये झालेल्या विक्रमी पावसामुळे मुंबई पूणर्पर्ण तुंबली होती. सांताक्रूझमध्ये १६४.८ मिमी आणि कुलाबामध्ये ३२.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चुनाभट्टी रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. यामुळे मुंबईची जीवनवाहिनी हार्बर लोकल ठप्प झाली होती. नोकरी आणि अन्य कामांसाठी बाहेर निघालेल्या लोकांची घराकडे...9 Jun 2021 / No Comment / Read More »

ड्रीम मॉलमधील आगीत १० जणांचा मृत्यू

ड्रीम मॉलमधील आगीत १० जणांचा मृत्यू७० कोरोनाबाधितांना सुरक्षित बाहेर काढले, मुंबई, २६ मार्च – मुंबईच्या भांडूप परिसरातील ड्रीम मॉलच्या इमारतीत असलेल्या सनराईस रुग्णालयाला गुरुवारी उशिरा रात्री लागलेल्या भीषण आगीत दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, ७० बाधितांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या मॉलमध्ये सुमारे ६०० दुकाने आहेत. मुंबई महापालिकेने आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, या आगीत केवळ कोरोनाबाधितांचाच मृत्यू झाला की मॉलमध्ये काम करणार्‍या इतरांचाही त्यात समावेश आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ...26 Mar 2021 / No Comment / Read More »

सचिन वाझे यांना नाकारला अंतरिम जामीन

सचिन वाझे यांना नाकारला अंतरिम जामीनमुंबई, १३ मार्च – मनसुख हिरेन यांच्या मृत्युप्रकरणी संभाव्य अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेणारे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अंतरिम जामीन देण्यास सत्र न्यायालयाने आज शनिवारी नकार दिला. हिरेन मृत्युप्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक आहे. यासाठी प्रसंगी तुम्हाला कोठडीत घ्यावे लागणार आहे. आमच्याकडे जे पुरावे आहेत, ते पाहू जाता, तुम्हाला दिलासा देता येणार नाही, असे निरीक्षण न्या. शैलेंद्र तांबे यांनी आपला निकाल देताना नोंदविले. वाझे यांनी शुक्रवारी सायंकाळी अटक टाळण्यासाठी न्यायालयात...13 Mar 2021 / No Comment / Read More »

सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली

सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदलीविरोधकांच्या दबावानंतर निर्णय, मुंबई, १२ मार्च – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादात सापडलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली झाली आहे. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अडचणीत सापडलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) बदली करण्यात आली होती. यासंदर्भात पोलिस मुख्यालयातून गुरुवारी रात्री अधिकृत पत्रक निघाले होते. मात्र, आता पुन्हा त्यांची एसबी-१ म्हणजेच विशेष शाखेत त्यांची कागदोपत्री बदली...13 Mar 2021 / No Comment / Read More »

रहस्यमय कार; गूढ मृत्यू

रहस्यमय कार; गूढ मृत्यूकारमालक मनसुख हिरेन यांचे शव आढळल्याने संशय वाढला, प्रकरणाचा तपास एटीएस करणार, मुंबई, ५ मार्च – रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडल्यानंतर, आता या कारचा मालक मनसुख हिरेन यांचे शव मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडले आहे. हिरेन गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी आज दुपारी नौपाडा पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती. त्यांचा मृतदेह अशा प्रकारे आढळून आल्याने या प्रकरणातील संशय अधिकच वाढला. या प्रकरणाचा...5 Mar 2021 / No Comment / Read More »

उच्च न्यायालयाने फेटाळला नवलखाचा जामीन

उच्च न्यायालयाने फेटाळला नवलखाचा जामीनमुंबई, ८ फेब्रुवारी – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गौतम नवलखाचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने आज सोमवारी फेटाळून लावला. विशेष एनआयए न्यायालयाने जामीन नाकारला असल्याने, आम्ही त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ३१ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित एल्गार परिषदेत काही लोकांनी प्रक्षोभक भाषणबाजी करून, हिंसाचाराला प्रोत्साहन दिले होते. या परिषदेला काही शहरी माओवादी नेत्यांचाही पाठिंबा होता, असे पोलिसांच्या तपासात उघड झाल्यानंतर, अनेकांना...9 Feb 2021 / No Comment / Read More »

डबेवाल्यांचे प्रमुख तळेकर यांना अटक

डबेवाल्यांचे प्रमुख तळेकर यांना अटकमुंबई, ५ जानेवारी – मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी सोमवारी रात्री फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करून, त्याची तुरुंगात रवानगी केली. त्यांनी डबेवाल्यांच्या नावावर कर्ज घेतले मात्र पैसे त्यांना दिलेच नाही. त्यांच्याविरोधात याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्या अटकेबाबत डबेवाला वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सुभाष तळेकर यांना अटक करून, विक्रोळी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यांनी ५ वर्षांपूर्वी डबेवाल्यांची फसवणूक केली होती. त्यांच्या...5 Jan 2021 / No Comment / Read More »

मुंबई महापालिका निवडणूक कॉंग्रेस स्वबळावर लढणार

मुंबई महापालिका निवडणूक कॉंग्रेस स्वबळावर लढणारमुंबई, २० डिसेंबर – महाविकास आघाडीतील घटक असूनही, एकाकी पडलेल्या कॉंगे्रसने आता शिवसेनेविरोधात कंबर कसताना, मुंबई महानगर पालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आघाडीत वादाची नवी ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कॉंगे्रसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नसीम खान यांनी याबाबतची माहिती एका मराठी वृत्तवाहिनीला दिली. आघाडी सरकारचे कामकाज किमान समान कार्यक्रमावर आधारित आहे. आम्ही स्वबळाचा नारा दिला असला, तरी त्याचा सरकारवर परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले....20 Dec 2020 / No Comment / Read More »

अर्णवच्या जामिनावर आज सुनावणी; प्रकरण उच्च न्यायालयात

अर्णवच्या जामिनावर आज सुनावणी; प्रकरण उच्च न्यायालयातमुंबई, ५ नोव्हेंबर – २०१८ च्या आत्महत्या प्रकरणात १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेले रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अंतरिम जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. तक्रारदार आणि सरकारचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय अंतरिम आदेश देता येत नाही, असे गोस्वामी यांनी अटकेला आव्हान देणार्‍या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एस. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने सांगितले. या प्रकरणातील तक्रारदार...5 Nov 2020 / No Comment / Read More »

अमली पदार्थप्रकरणी क्षितिज प्रसादला अटक

अमली पदार्थप्रकरणी क्षितिज प्रसादला अटकमुंबई, ५ नोव्हेंबर – सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज खटलाप्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आलेले धर्माटिक एंटरटेन्मेंटचे माजी कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसाद यांना आणखी एका ड्रग्ज खटल्यात अटक करण्यात आली आहे. नायजेरियन नागरिकाकडून कोकेन घेतल्याचे हे प्रकरण आहे. विशेष एनडीपीएस कोर्टाने बुधवारी एनसीबीला प्रसाद यांची कोठडी दिली. नायजेरियन नागरिक उका एमेका याच्याकडून अंधेरी उपनगर परिसरात चार ग्रॅम कोकेन जप्त केले होते. प्रसाद यांच्यासह डिमीट्रीयस या आफ्रिकन नागरिकास देखील या केसप्रकरणी अटक करण्यात...5 Nov 2020 / No Comment / Read More »