किमान तापमान : 23.35° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.35° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलअकोला, २ फेब्रुवारी – करीअर म्हणजे प्राप्ती नाही. मनुष्य विकसित झाल्यावर त्याला प्राप्त गोष्टींचे वितरण त्याने केले पाहिजे. समर्पित होणे हे जीवन आहे. असे निःस्वार्थ समर्पण हेच स्वयंसेवकत्व आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे व्यक्त केले. मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या हस्ते शंकरलाल उर्फ काकाजी खंडेलवाल यांच्या जन्मशताब्दी समारोहानिमित्त ‘संघसमर्पित काकाजी’ या ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी हे विचार व्यक्त केले.
यावेळी मोहनजी म्हणाले की, स्वयंसेवकत्व म्हणजे दुसर्यापासून अपेक्षा न करणे होय. काकाजी खंडेलवाल यांच्या कार्यातून समाजाला सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळणार आहे. राजकीय जीवनात असताना काकाजी यांना संघाने दिलेली जबाबदारी एक स्वयंसेवक या नात्याने त्यांनी पूर्ण केली. त्यांनी राजकीय जीवन सोडून संघकार्यात स्वतःला झोकून दिल्याची आठवण मोहनजींनी यावेळी सांगितली. विविध क्षेत्रात दिलेली भूमिका करताना काकाजींनी स्वयंसेवक ही भूमिका कायम ठेवल्याचे मोहनजी म्हणाले.
‘लाभावीण करी प्रीती, अशी कळवळ्याची जाती’ असे म्हणत काकाजींच्या समाजकार्याची आठवण त्यांनी सांगितली. काकाजी हे मनुष्यप्रिय होते, त्यांनी कुणाची उपेक्षा केली नाही. सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना त्यांनी जवळ केले. तसेच, शेकडो लोकांना जोडले. प्रचारक म्हणून गेलेल्या व्यक्तींच्या परिवारांशी संवाद व पालकत्व काकाजींनी ठेवले होते, अशी आठवण मोहनजींनी यावेळी सांगितली.
काकाजींच्या जीवनावरील स्मृतिग्रंथ उत्कृष्टपणे तयार केला गेल्याचे प्रशस्तिपत्र देत मोहनजींनी सर्वांचे अभिनंदन केले. लघुपट निर्माता स्वप्नील बोरकर यांचेदेखील कौतुक केले. तसेच, समारंभस्थळी उपस्थित प्रकाशक अमोल पेडणेकर, लेखिका आरती देवगावकर यांचा संजय महाराज पाचपोर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पल्लवी अनवेकर व स्वप्नील बोरकर यांचा सत्कार नरेंद्र देशपांडे यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष गोपाल खंडेलवाल यांनी केले. काकाजी यांच्याकडे संघचालकपदाचे दायित्व मोहनजी यांनीच दिल्याची आठवण गोपाल खंडेलवाल यांनी सांगितली. १९८२ ते १९९३ या काळात तत्कालीन प्रचारक रवी भुसारी यांनी काकाजी यांच्यासोबत केलेले कार्य ग्रंथात रूपांतरित करण्याची कल्पना व्यक्त केली होती. ती प्रत्यक्षात साकार झाल्याचे गोपाल खंडेलवाल म्हणाले.
स्वागत समितीचे अध्यक्ष अतुल गणात्रा, गोपाल खंडेलवाल, महेंद्र कवीश्वर यांनी डॉ. मोहनजी यांचे स्वागत केले. काकाजींच्या जीवनावरील लघुपटाचा काही अंश यावेळी दाखविण्यात आला. काकाजींच्या स्मृतीतील पहिला सेवा पुरस्कार उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालकाश्रमला देण्यात आला. या संस्थेचे विजय जानी व दादा पंत यांनी हा पुरस्कार मोहनजींच्या हस्ते स्वीकारला.
कार्यक्रमाचे संचालनप्रा. विवेक बिडवई यांनी, तर वैयक्तिक गीत कविता वरघट यांनी सादर केले. अतुल गणात्रा यांनी आभार मानले. जुने शहरातील गोडबोले प्लॉटस्थित खंडेलवाल महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा झाला. कोरोना संकट पाहता आभासी पद्धतीने शेकडो प्रेक्षकांनी हा कार्यक्रम युट्यूब लिंकवर पाहिला.