किमान तापमान : 24.02° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.02° से.
23.64°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलवरोरा, ३० नोव्हेंबर – ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या डॉ. शितल आमटे-करजगी यांनी सोमवार, 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.45 वाजताच्या सुमारास आनंदवनातील त्यांच्या निवासस्थानी आत्महत्याने केल्याचे उघडकीस आले. डॉ. शितल यांच्या आत्महत्येने परिसरातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. शितल आमटे-करजगी या येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होत्या. त्यामुळे त्या आनंदवनाची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. सोमवारी त्यांनी आपल्या निवासस्थानी कसली तरी लस घेवून आपली जीवनयात्रा संपवली. लसीमधून त्यांनी विषारी द्रव्य घेतले की, हवा शरिरात टोचून घेतली, हे स्पष्ट होवू शकले नाही.
डॉ. शितल आमटे-करजगी यांची सासू पडल्यामुळे त्यांच्या पाठीत दुखणे भरले होते. त्या त्यांच्या पतीसह येथील डॉ. सागर वझे यांना दाखविण्यासाठी दवाखान्यात गेल्या होत्या. डॉक्टर समोर बसले असताना तेथेच त्यांना या घटनेचे वृत्त फोनव्दारे कळले असता सासू, सासरे हे दोघेही डॉ. वझे यांना घेवून आनंदवनात पोहोचले असता, डॉ. शितल या आपल्या खोलीत निपचित पडल्याचे आढळून आले. तेव्हा डॉ. वझे यांनी तातडीने त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या. डॉ. शितल यांचे पती गौतम करजगी, डॉ. वझे यांनी तातडीने डॉ. शितल यांना उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
डॉ. शितल आमटे यांच्या मृत्यूचे वृत्त सर्वत्र वार्यासारखे पसरले. त्यांना बघण्यासाठी नागरिकांनी धाव घेतल्याने दवाखान्यात गर्दी जमली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पांडे, पोलिस निरीक्षक खोब्रागडे हेही तेथे दाखल झाले.
डॉ. शितल आमटे यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूरला रवाना करण्यात आला असून, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्यांकडून त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी ऊशिरा मृतदेह आनंदवनात पोहोचेल आणि तेव्हा तेथे अंत्यसंस्कार केले जाईल, असे सुत्रांनी सांगितले.
डॉ. शितल आमटे यांनी आत्महत्या का व कशा स्थितीत केली यासंबंधी चौकशी करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पांडे यांनी आनंदवनातील डॉ. शितल आमटे यांच्या निवासस्थानाला भेट देवून, ज्या खोलीत त्यांनी आत्महत्या केली, त्या खोलीची पाहणी केली आणि ती खोली बंद करून ठेवली.
डॉ. वझे यांच्या म्हणण्यानुसार, ते तेव्हा डॉ. शितल आमटे यांच्या खोलीत गेले तेव्हा ती निपचित पडली होती व खाली इंजेक्शनची एक रिकामी सिरींज पडली होती. त्या ठिकाणी सिरिंजशिवाय दुसरे काहीही नसल्याने तिने विषारी द्रव्य टोचून घेतले की शरिरात केवळ हवा टोचून घेतली हे सांगणे कठीण असून, पार्थिवाच्या उत्तरीय तपासणीतूनच ते स्पष्ट होईल.
बाबा आमटे यांच्या तिसर्या पिढीचे नेतृत्व करणार्या 39 वर्षीय डॉ. शितल आमटे यांना 6 वर्षीय शर्वील नामक मुलगा असून, कौटुंबिक वाद व माजी सरपंच यांच्या कारणामुळे त्या कमालीच्या नैराश्यात असल्याची चर्चा होती. काही दिवसापूर्वी डॉ. शितल आमटे यांनी ‘सोशल मिडिया’वर एक चित्रफीत जारी केली होती. त्यात त्यांनी कौटुंबीक वादासंबंधी वाच्यता करण्यात आली होती. परंतु, काही वेळानंतर ही चित्रफीत काढून टाकण्यात आली. यात कुटुंबातील काही सदस्य व आनंदवनातील काही सदस्यांवर आरोप केले होते. मात्र, शितल आमटे यांनी केलेल्या आरोपाशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटूंबातर्फे जारी करण्यात आले होते. डॉ. शितल आमटे या सध्या आनंदवनाची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या.
डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने कुष्ठरोग्याच्या जीवनात आनंद निर्माण करणार्या आनंदवनातच ही धक्कादायक घटना घडली. यामुळे राज्यातील सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. डॉ. शितल आमटे यांनी ज्यावेळी आत्महत्या केली, त्यावेळी त्यांचे आई, वडील डॉ. विकास आमटे, भारती आमटे व कुटूंब हे हेमलकसा येथे होते.
‘फॉरेन्सिक’ चमू लवकरच होणार आनंदवनात दाखल; डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरण
डॉ. शीतल आमटे यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूरला आणले आहे. त्यांनी आत्महत्या का आणि कशी केली यासंबंधी काही मृत्यूपूर्व चिट्टी किंवा अन्य पुरावे शोधण्याकरता चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, वरोराचे उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे हे आनंदवनात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात नागपूर येथून एक ‘फॉरेन्सिक ‘ चमू आनंदवनात दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
डॉ. शीतल आमटे यांचा अल्पपरिचय
प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांची नात, महारोगी सेवा समिती व आनंदवनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शीतल आमटे-करजगि यांनी सोमवारला आनंदवनातील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. त्या 39 वर्षाच्या होत्या.
दुपारी सुमारे एक वाजताच्या दरम्यान त्या आपल्या राहत्या खोलीत निपचित पडल्या असल्याचे त्यांचे पती गौतम करजगी यांच्या लक्षात आले. त्यांनी डॉ. शीतल यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
डॉ. शीतल आमटे या विकास व भारती आमटे यांच्या कन्या व बाबा आमटे यांच्या नातं होत्या. २००३ मध्ये नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं त्यांनी शिक्षण घेतले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आनंदवनातच काम करण्याचा निर्णय घेतला. शीतल आमटे या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्यांनी आनंदवन येथे विविध उपक्रम राबविले होते, यात सोलर पॉवर लावले होते.