Posted by वृत्तभारती
Sunday, April 11th, 2021
मुलगी झाल्यावर पत्नीला कळले वास्तव, अलिगड, ११ एप्रिल – उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच असून, आणखी एक नवे व विचित्र प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात विवाहित युवतीला मुलगी झाल्यानंतरच कळले की आपल्या नवर्याचे नाव अशोक नसून अफजल आहे. हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढताना आरोपी युवकाने तिला आपला परिचय अशोक राजपूत असा करून दिला होता. प्रत्यक्षात हा २५ वर्षीय युवक अफजल खान निघाला. या प्रकरणी अलिगड पोलिसांनी २५ वर्षीय...
11 Apr 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 25th, 2021
लखनौ, २५ फेब्रुवारी – भारतात आम्हीच कोरोना पसरवला, ही गोष्ट परदेशातील तबलिगी जमातीच्या आरोपींनी मान्य केली असून, आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. कोरोना महामारी आणि टाळेबंदीसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कोरोना महामारीदरम्यान गेल्या वर्षी केंद्र आणि राज्य सरकारांनी कठोर निर्बंध लागू केले होते. तरीदेखील तबलिगी जमातीचे परदेशातील लोक देशभर फिरले. यानंतरच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे याच लोकांनी देशात कोरोना पसरवला,...
25 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 24th, 2021
लखनौ, २४ फेब्रुवारी – काही महिन्यांच्या विचारविनिमयानंतर उत्तर प्रदेश विधानसभेत बुधवारी लव्ह जिहाद विरोधी विधेयक, २०२० आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आहे. विधान परिषदेत पारित झाल्यानंतर या विधेयकाला कायद्याचे स्वरूप प्राप्त होईल. उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये या विधेयकाबाबत संकेत देणारे वक्तव्य केले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्तींच्या निवड स्वातंत्र्य अधिकाराचे समर्थन केल्यानंतर, २४ नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाने या विधेयकाबाबत अध्यादेश काढला होता. विवाहासाठी करण्यात येणारे धर्मांतरण स्वीकारार्ह...
24 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, February 22nd, 2021
योगी आदित्यनाथ सरकारचा अंतिम अर्थसंकल्प सादर, लखनौ, २२ फेब्रुवारी – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने आज सोमवारी आपल्या कारकीर्दीतील पाचवा व शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. यात अयोध्येतील राममंदिर परिसराच्या विकासासाठी वअन्य सुविधांसाठी सुमारे १४० कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. राजधानी लखनौमध्ये राष्ट्रीय प्रेरणास्थळाच्या निर्मितीसाठी ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आदित्यनाथ सरकारने विधिमंडळात पहिले कागदरहित (पेपरलेस) असलेले एकूण ५ लाख ५० हजार २७० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर...
22 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 17th, 2021
शस्त्र व स्फोटकांचा प्रचंड साठा जप्त, लखनौ, १६ फेब्रुवारी – देशात विविध ठिकाणी मोठा घातपात घडविण्याचा कट रचणार्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) दोन अतिरेक्यांना उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने आज मंगळवारी अटक केली. त्यांच्याजवळून शस्त्र व स्फोटकांचा प्रचंड मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. लखनौच्या गुडंबा परिसरातील एका सहलीच्या ठिकाणी त्यांना अटक करण्यात आली. अनसद बदु्रद्दिन आणि फिरोज खान अशी या अतिरेक्यांची नावे आहे. हे दोघेही केरळचे रहिवासी आहेत....
17 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, February 8th, 2021
उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यातील भीषण घटना, ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचे प्रचंड नुकसान, डेहराडून, ७ फेब्रुवारी – उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यातील जोशीमठाच्या परिसरात आज रविवारी सकाळी दहाच्या सुमारास नंदादेवी नदीजवळील महाकाय हिमकडा कोसळला. त्यामुळे धौलीगंगा नदीला भीषण पूर आला असून, त्याच्या प्रवाहाने पर्वतीय क्षेत्रात प्रचंड नुकसान झाले आहे. तपोवन-रेणी येथील ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचे या घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेवर तीव्र...
8 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, February 7th, 2021
लखनौ, ६ फेब्रुवारी – धार्मिक शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या मदरसांमधील व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय आहे. बहुतांश मदरसे उत्तरप्रदेशातील असून, या मदरशांनी कोट्यवधी रुपयांचा सरकारी निधी मिळवल्याचा आरोप आहे. यापैकी अनेक मदरसे अवैध आहेत. काही ठिकाणी शिक्षकांच्या भरतीमध्ये घोटाळा झाला आहे, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या संख्येत गडबड आहे. माहितीच्या अधिकारात मागण्यात आलेल्या माहितीमुळे हा सर्व गैरव्यवहार उघडकीस आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी केली जाणार आहे....
7 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 5th, 2021
गाझियाबाद, ४ जानेवारी – उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर येथे स्मशानभूमीतील शेडचे छप्पर कोसळून झालेल्या घटनेतील मृतांची संख्या २५ झाली असून आतापयर्र्त ३ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांनी दिली. रविवारी सकाळी ही भीषण दुर्घटना घडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबास दोन...
5 Jan 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 27th, 2020
नोएडा, २७ डिसेंबर – गत काही वर्षांपासून उत्तर प्रदेशात वाहनांच्या नंबर प्लेटवर जातीची ओळख सांगण्याची एक नवीन प्रथा सुरू झाली आहे. यामुळे सामाजिक विषमता पसरण्याची व सामाजिक वातावरण गढूळ होण्याची भीती लक्षात घेऊन उत्तर प्रदेशच्या वाहतूक विभागाने विविध जातींच्या नावाचे स्टिकर्स असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या जातीय वर्चस्व दाखविण्याची लहर सुरू झाली आहे. अनेक कार, मोटारसायकल व इतर वाहनांच्या नंबर प्लेटवर यादव, जाट, गुरजर, ब्राह्मण,...
27 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, December 26th, 2020
वाराणसी, २६ डिसेंबर – रोम, ग्रीस आणि अमेरिकेतील ख्रिस्त पादरी (फादर) मागील १५ वर्षांपासून वाराणसीमध्ये तयार केल्या जाणार्या गाऊनचा वापर करीत असल्याचे दिसून आले आहे. याठिकाणी सिल्कपासून तयार होत असलेल्या कपड्यांनाही देश-विदेशातील ग्राहकांनी पसंती दिली आहे, हे विशेष. माहितीनुसार, वाराणसीतील आदमपूर परिसरातील सय्यद हुसेन हे पादरींसाठी खास गाऊन बनवतात. सोबतच जरदोजी, ब्राकेट, सिल्कपासून तयार केल्या जाणार्या टोप्या, लबेदादेखील तयार करतात. २००५ साली सय्यद हुसेन यांनी ग्रीस आणि रोममध्ये कपड्यांचे प्रदर्शन...
26 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 7th, 2020
लखनौ, ७ नोव्हेंबर – येत्या दिवाळीला अयोध्येतील रामजन्मभूमी परिसरात पाच लाख मातीचे दिवे लावून भव्य दीपोत्सव साजर करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ सरकारने आज शनिवारी घेतला. उत्तरप्रदेशचे पर्यटन मंत्री निलकंठ तिवारी यांनी याबाबतची माहिती दिली. मागील ५०० वर्षांपासून रामजन्मभूमी परिसरात दीपोत्सव साजरा करता आला नाही. आता राममंदिर बांधण्यास सुरुवात झाली असल्याने, यंदाची दिवाळी ऐतिहासिक राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. रामजन्मभूमीत भगवान रामचंद्रांचे भव्य मंदिर उभे राहावे, यासाठी ५०० वर्षांपासून सुरू असलेल्या...
7 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 3rd, 2020
मथुरा, २ नोव्हेंबर – उत्तरप्रदेशच्या मथुरा येथील नंदबाबा मंदिरात दोन मुस्लिमांनी नमाज अदा केल्यानंतर, दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. २९ ऑक्टोबर रोजीची ही घटना असून, त्याची ध्वनिफीत रविवारी समोर आली आहे. या घटनेनंतर मंदिराची स्वच्छता करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. फैझल खान आणि चांद मोहम्मद अशी नमाज अदा करणार्या दोघांची नावे आहेत. ते अलोक रतन आणि नीलेश गुप्ता या आपल्या सहकार्यांसोबत मंदिरता आले होते. या दोघांनीच त्यांचे नमाज पढतानाचे दृश्य...
3 Nov 2020 / No Comment / Read More »