Posted by वृत्तभारती
Saturday, October 31st, 2020
देवरिया, ३१ ऑक्टोबर – लव्ह जिहादच्या सतत वाढत असलेल्या घटनांवर कायमचा आळा घालण्यासाठी आपले सरकार लवकरच कठोर कायदा करणार असल्याची घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज शनिवारी केली. मुलींना फसवाल तर तुमचा थेट ‘राम नाम सत्य है’ होईल, असा इशाराही त्यांनी दिला. येथे निवडणूक सभेला संबोधित करताना आदित्यनाथ यांनी लव्ह जिहादसारख्या घटनांमध्ये सामील असणार्या आणि त्याला प्रोत्साहन देणार्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. आमच्या भगिणींच्या...
31 Oct 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 7th, 2017
=मुलायमसिंहांचे पुन्हा घूमजाव!, वृत्तसंस्था लखनौ, ६ फेब्रुवारी – समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे तळ्यात आणि मळ्यात अजूनही सुरूच आहे. सपा-कॉंगे्रस आघाडीवर नाराजी व्यक्त करून, आपण केवळ भाऊ शिवपाल यादव यांच्यासाठीच प्रचार करणार असल्याचे ठामपणे सांगणारे नेताजी आता पुन्हा एकदा मुलायम झाले आहेत. मी फक्त माझ्या पुत्रासाठीच प्रचार करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यादव कुटुंबात आणि पक्षात कोणताही वाद नाही. अखिलेश यादव हेच उत्तरप्रदेशचे पुढील मुख्यमंत्री असतील, असे मुलायमसिंह...
7 Feb 2017 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, August 14th, 2016
=पीडित आई, मुलीची सुप्रीम कोर्टात धाव= नवी दिल्ली, [१३ ऑगस्ट] – उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर भागातील राष्ट्रीय महामार्गावर सामूहिक बलात्काराची बळी ठरलेली आई व अल्पवयीन मुलीने समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते व कॅबिनेट मंत्री आझम खान आणि दोषी पोलिसांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सोबतच हे प्रकरण नवी दिल्लीतील न्यायालयात वर्ग करण्यात यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. २९ जुलै रोजी राष्ट्रीय महामार्गावर काही दरोडेखोरांनी कार लुटल्यानंतर पुरुष...
14 Aug 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, May 17th, 2016
वाराणसी, [१७ मे] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन यांना नारी जागरण सन्मान-२०१६ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. नारी जागरण संस्थेद्वारा देण्यात येणारा हा पुरस्कार मे महिन्याच्या शेवटी बीएचयुत आयोजित एका कार्यक्रमात देण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना नारी जागरण मासिकाच्या संपादिका मीना चौबे यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी हीराबेन यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात मासिकातर्फे प्रकाशित करण्यात येणार्या जननी जन्मभूमी या विशेषांकाचे लोकार्पणही हीराबेन यांच्या...
17 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, May 3rd, 2016
नवी दिल्ली, [२ मे] – देशातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या आणि केंद्रातील सत्तेची किल्ली म्हणून ओळख असलेल्या उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. यावेळी कॉंग्रेसने उपाध्यक्ष राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी वढेरा यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणूनही जाहीर करण्याची व्यूहरचना तयार केल्याचे वृत्त आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने तयारीला लागले आहेत. कॉंग्रेस पक्षही याला अपवाद नाही. राज्यात गेल्या काही वर्षांपासून होत असलेली...
3 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, April 4th, 2016
=८ रोजी समारंभ= बरेली, [३ एप्रिल] – येथील दरगाह शाह शराफतच्या शाह सकलेन अकादमीतर्फे १०१ मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक विवाह आयोजित करण्यात आला आहे. ८ एप्रिल रोजी होणार्या या विवाह समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना निमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशप मंडळ कॅम्पसमध्ये होणार्या या मंगलप्रसंगी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनासुद्धा आमंत्रण देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले....
4 Apr 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, March 29th, 2016
=लखनौत दाखवले काळे झेंडे= लखनौ, [२८ मार्च] – पहिल्यांदाच येथे दौर्यावर आलेले एमआयएम प्रमुख खा. असदुद्दिन ओवैसी यांना येथे आयोजित पत्रपरिषदेत सोमवारी काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी तेथे तैनात पोलिसांनी कारवाई करीत या निदर्शकांना तेथून हुसकावून लावले. तथापि, ते विरोधक नेमके कोण होते, याबाबत काही माहिती मिळाली नाही. सोमवारी येथे पोहोचल्यावर ओवैसी पहिले देव शरीफ दर्ग्यात गेले. नंतर त्यांनी नदवाचे मौलाना रबे हसन अली नदवी आणि शिया मौलवी मौलाना कल्बे...
29 Mar 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, March 19th, 2016
=उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक= नवी दिल्ली, [१८ मार्च] – उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीला एक वर्ष असले, तरी राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्व प्रमुख पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सपा आणि बसपाने आपले मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले आहेत, मात्र भाजपाने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अद्याप जाहीर केला नाही. त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूक यावेळी चौरंगी होण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेशात सध्या सपाची राजवट असून,...
19 Mar 2016 / No Comment / Read More »