किमान तापमान : 24.05° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– संसदेतील सुरक्षा भंग प्रकरण,
नवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – संसदेची सुरक्षा भेदण्याच्या प्रकरणात अटक केलेल्या सहा आरोपींच्या डिलिट केलेल्या खात्यांची तसेच भगतसिंह फॅन क्लब या फेसबुक पेजची माहिती देण्यात यावी, असे पत्र दिल्ली पोलिसांनी मेटाला पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या फेसबुक पेजवरच सर्व आरोपींची ओळख झाली होती.
३१ डिसेंबरला झालेल्या प्रकारासाठी कुणी आर्थिक मदत केली का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी सहाही आरोपींच्या बंँक खात्यांचे तपशील मिळवले आहेत. दिल्ली पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी रविवारी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन चर्चा केली तसेच त्यांच्या बँक खात्यांची माहिती मिळवली. नीलिमा आणि सागर शर्माचे पासबुक त्यांच्या अनुक्रमे हरयाणातील जिंद आणि उत्तरप्रदेशातील लखनौ येथून जप्त करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.
आरोपींच्या समाज माध्यमांवरील खात्याचे तपशील तसेच भगतसिंह फॅन पेजची माहिती दिली जावी, यात या पेजचे किती सदस्य आहे, त्यांचा नेमका आकडा दिला जावा, असे पोलिसांच्या काऊंटर इंटेलिजन्स पथकाने मेटा पोलिसांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. या आरोपींनी हे फेसबुक पेज तयार केले होते, नंतर ते डिलिट करण्यात आले. आरोपींच्या मोबाईल फोनचे नुकसान झाले असल्याने त्यांचे व्हॉट्सअॅप चॅट देण्यात यावे, अशी विनंतीही पोलिसांनी मेटाकडे केली आहे. या प्रकरणाचा सूत्रधार ललित झा याने राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात त्यांचे मोबाईल फोन जाळले होते. झा याने दिलेल्या माहितीच्या आधारे नंतर पोलिसांनी जाळलेल्या मोबाईलचे अवशेष जप्त केले. मोबाईल्सच्या अवशेषांमधून डेटा मिळवता येतो का, हे पाहण्यासाठी ते न्यायवैद्यक परीक्षणासाठी पाठविण्यात आले आहेत.