Posted by वृत्तभारती
Wednesday, February 8th, 2023
भोपाळ, (८ फेब्रुवारी ) – रेवा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा पुन्हा एकदा शिवरात्रीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर खिचडी तयार करून विश्वविक्रम करण्याची तयारी आयोजन समितीकडून करण्यात येत आहे. ज्यामध्ये पाच हजार शंभर किलोची खिचडी बनवली जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिराची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. साफसफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर यंदा जिल्हाभरातून सुमारे ५१ हजार भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे....
8 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 8th, 2023
सागर, (८ फेब्रुवारी ) – संतांचा अपमान करण्याचे पाप कमलनाथ यांनी केले आहे. १५ महिन्यांच्या सरकारमध्ये त्यांनी अनुसूचित जाती आणि गरीबांसाठी कोणतेही काम केले नाही. केवळ राज्य लुटण्याचे काम केले. प्रदेश प्रमुख शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी सागर येथे ही माहिती दिली. संत रविदास महाकुंभ संत समागमात बोलत होते. सागर येथील बारतुमा येथे १०० कोटी रुपये खर्चून संत रविदासांचे भव्य मंदिर उभारण्याची घोषणा करताना ते म्हणाले की, मी आणि माझे...
8 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 8th, 2023
इंदूर, (८ फेब्रुवारी ) – इंदूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या योजनेला रेल्वे मंत्रालयाने प्रदीर्घ प्रयत्नानंतर अंतिम रूप दिले आहे. संपूर्ण योजनेवर १००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात ३४० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर इंदूर स्थानकाला नवे आधुनिक रूप देण्यासाठी रेल्वेने कंपन्यांकडून प्रस्ताव मागवण्याची तयारी सुरू केली आहे. शहरातील मुख्य स्थानकाची रचना राजवाड्यापासून प्रेरित असेल. त्याचे नियोजन पुढील ५० वर्षांच्या गरजांनुसार तयार करण्यात आले आहे. यापूर्वी...
8 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 7th, 2023
भोपाळ, (७ फेब्रुवारी ) – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली आहे. शासकीय योजनेंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मार्चपासून विमानाने तीर्थयात्रेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी रविवारी सांगितले.भिंड येथे संत रविदास यांच्या जयंती व चंबळ विभागाच्या विकास यात्रेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, या सरकारी तीर्थक्षेत्र योजनेत संत रविदासांच्या जन्मस्थानाचाही समावेश करण्यात येणार आहे. ती मुख्यमंत्री तीर्थ-दर्शन योजना म्हणून ओळखली जाते. आम्ही ज्येष्ठ नागरिकांनाही तीर्थयात्रेसाठी विमानप्रवास करू....
7 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 7th, 2023
३ आरोपींना अटक, आदिवासी महिला टार्गेटवर, भोपाळ, (७ फेब्रुवारी ) – राजधानी भोपाळमध्ये पुन्हा एकदा पैसे आणि नोकरी देऊन धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. रतीबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत, पोलिसांनी सोमवारी रात्री केकदियान गावात धर्मांतर करणार्या हिरालाल जामोद या ख्रिश्चन धर्मगुरूसह तिघांना अटक केली आहे. घरातील त्रास, भुताटकीच्या रुग्णांवर उपचारासाठी पैसे व नोकरीचे लालूच दाखवून आरोपी जवळपास ५ वर्षांपासून गावात धर्मांतर करत होता. या प्रकरणी त्यांच्याकडे हे काम करण्यासाठी निधी कुठून...
7 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, February 6th, 2023
रायगढ़, (६ फेब्रुवारी ) – छत्तीसगडमधील रायगढ़ जिल्ह्यात २ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक उघडकीस आली होती, त्यात सुमारे १७ हजार अपात्र शेतकर्यांनी ऑनलाइन नोंदणी करून सुमारे २५ कोटींची फसवणूक केली होती. या फसवणुकीत शेतकर्यांची संख्या आता ५३ हजार झाली असून, त्यांच्याकडून सुमारे ४३ कोटी रुपये वसूल करायचे आहेत. अशा स्थितीत कृषी विभाग आता अपात्र शेतकर्यांची यादी महसूल विभागाकडून जमा करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारच्या...
6 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 4th, 2023
– सरकारच्या विरोधात कट रचल्याचा आरोप, भोपाळ, (४ फेब्रुवारी ) – सरकारविरोधात कट रचल्याच्या आणि बेकायदेशीर कारवायांत सहभागी असल्याच्या आरोपाखाली मध्यप्रदेश पोलिसांनी प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात् पीएफआयच्या पदाधिकार्याला भोपाळ येथे अटक केली. राज्य पोलिसांच्या विशेष कृती दलाने मागील वर्षी दाखल केलेल्या प्रकरणात शुक‘वारी ही अटक करण्यात आली. वासिद खान असे अटक केलेल्या पीएफआयच्या सदस्याचे नाव आहे. भादंवितील कलम १२१ ए (सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट, १५३ बी (राष्ट्रीय एकात्मच्या...
4 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 31st, 2023
छतरपूर, (३१ जानेवारी) – छतरपूरच्या बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या देशभरात प्रसिद्धीच्या झोतात आहेत. बागेश्वर धाम येथे लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बागेश्वर धाम येथे सामूहिक विवाह होणार आहे. ज्याची तयारी जोरात सुरू आहे. पुढील महिन्यात १८ फेब्रुवारीला येणार्या शिवरात्रीनिमित्त बागेश्वर धाम येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १२१ गरीब मुलींचे लग्न लावण्यात येणार आहे. वधूसोबतच वराच्या निवडीसाठीही सर्वेक्षण केले जात आहे. महाशिवरात्रीला...
31 Jan 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, January 29th, 2023
भोपाळ, (२९ जानेवारी) – पश्चिम मध्य रेल्वेने मध्यप्रदेशातील होशंगाबाद रेल्वेस्थानकाचे नाव बदलून ते आता नर्मदापुरम् असे केले असल्याची माहिती अधिकार्याने आज रविवारी दिली. पश्चिम मध्य रेल्वेने शनिवारी एक निवेदन जारी करीत रेल्वेस्थानकाचे नाव नर्मदापुरम् असे करण्यात आले असून, त्याला एनडीपीएम असे लघुनाव देण्यात आल्याची घोषणा केली होती. भोपाळपासून ७५ किमीन अंतरावर असलेल्या होशंगाबादचे नाव बदलून ते नर्मदापुरम् करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात मान्यता दिली होती. या आठवड्याच्या...
29 Jan 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 8th, 2021
छत्तीसगडमधील घटना, सुकमा, ८ नोव्हेंबर – छत्तीसगडमधून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. सुकमा येथे एका केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने आपल्याच सहकार्यांवर अचानक गोळीबार केला. या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला तर, तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. बस्तरचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. गोळीबार करणारा जवान भावनिक तणावात होता, अशी सीआरपीफच्या अधिकार्यांनी दिली. सुकमा येथील मराईहगुडा स्टेशनअंतर्गत येणार्या लिंगमपल्ली सीआरपीएफ शिबिरात हा गोळीबार झाला....
8 Nov 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, October 3rd, 2021
कॉंगे्रसचे २५ आमदार दिल्लीत मुक्कामी, नवी दिल्ली, २ ऑक्टोबर – छत्तीसगडमध्ये नेतृत्वबदल करावा, या मागणीसाठी छत्तीसगडमधील २५ आमदार राजधानी दिल्लीत तळ ठोकून आहेत. मात्र, त्यांचे ऐकून घेण्यासाठी वेळ न देताना पक्ष नेतृत्वाने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून आज शनिवारी नियुक्ती केली. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अनुमतीने भूपेश बघेल यांची उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे कॉंग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी...
3 Oct 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, September 6th, 2021
ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन भोवले, रायपूर, ५ सप्टेंबर – पोलिसांनी ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केल्याने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे वडील नंदकुमार बघेल यांनी नुकतेच उत्तरप्रदेशात हे वक्तव्य केले होते. मी भारतातील सर्व गावकर्यांना आवाहन करतो की, ब्राह्मणांना तुमच्या गावात येऊ देऊ नका. त्यांना परकियांसारखी वागणूक दिली पाहिजे. मी इतर सर्व समुदायाशी देखील यासंदर्भात बोलेन, जेणेकरून आपण त्यांच्यावर बहिष्कार टाकू शकू. ब्राम्हणांना व्होल्गा...
6 Sep 2021 / No Comment / Read More »