Posted by वृत्तभारती
Wednesday, March 1st, 2023
मध्यप्रदेश सरकारचा अर्थसंकल्प आज सादर, भोपाळ, (१ मार्च) – मध्य प्रदेश विधानसभेमध्ये आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री जगदीश देोरा यांनी अर्थसंकल्पाच्या घोषणेत शिक्षण व नोकरी या क्षेत्रात अनेक घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पात सरकारने राज्यात १ लाख सरकारी नोकर्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री म्हणाले की, लाडली बहन योजना अंतर्गत लाभार्थ्यांना एक महिना १०००/- रुपये देण्यात येईल आणि राज्यातील तरुणांना १ लाख रोजगार देण्यात येतील. ते म्हणाले की मुख्यमंत्री कौशल...
1 Mar 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, February 27th, 2023
जगदलपूर, (२७ फेब्रुवारी ) – केंद्रीय राखीव पोलीस दल छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील करणपूर येथे प्रथमच आपला ८४ वा स्थापना दिवस साजरा करणार आहे. त्यासाठीची तयारीही येथे जोरात सुरू आहे. १९ मार्च रोजी बस्तर जिल्ह्यात आयोजित या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. यादरम्यान अमित शाह भाजप नेत्यांच्या भेटीनंतर निवडणुकीचा मंत्रही देणार आहेत, अमित शाह यांचा हा मुक्काम छत्तीसगडच्या निवडणुकीच्या वर्षात अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे....
27 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, February 26th, 2023
जगदलपूर, (२६ फेब्रुवारी ) – फेब्रुवारी महिन्यात बस्तर विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी त्यांच्या टीसीओसी मोहिमेत एकापाठोपाठ एक नक्षलवादी घटना घडवत आहेत. फेब्रुवारी महिन्यात भाजपच्या तीन नेत्यांची हत्या केल्यानंतर नक्षलवादी सातत्याने आपली उपस्थिती दाखवून बस्तर विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी घटना घडवत आहेत. गेल्या दोन दिवसांत विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी घटनांमध्ये पाच जवान शहीद झाले आहेत. सुकमा जिल्ह्यात शनिवारी झालेल्या चकमकीत ०३ जवान शहीद झाल्यानंतर, शनिवारी सायंकाळी उशिरा कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी रजेवर...
26 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 23rd, 2023
भोपाळ, (२२ फेब्रुवारी ) – ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन (एआयएसएचई)च्या माध्यमातून मध्य प्रदेशातील उच्च शिक्षण संस्थांच्या डेटा एंट्रीच्या कामात मध्य प्रदेशने चांगली कामगिरी केली आहे. मध्य प्रदेश २२ व्या स्थानावरून १७ व्या स्थानावर पोहोचला आहे. या संदर्भात बोलताना उपमहासंचालक राजेश म्हणाले की, पोर्टलवर प्रविष्ट केलेला डेटा पूर्णपणे अचूक आहे. याकडे एआयएसएचई विशेष लक्ष देते, कारण हा डेटाबेस भारत सरकारच्या विविध मंत्रालयांद्वारे धोरण तयार करणे, बजेट वाटप आणि संशोधनात...
23 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, February 20th, 2023
– नवीन उत्पादन शुल्क धोरणाला मंजुरी, भोपाळ, (२० फेब्रुवारी ) – मध्यप्रदेश मंत्रिमंडळाने नवीन उत्पादन शुल्क धोरणाला मंजुरी दिली असून, याअंतर्गत ‘आहत’ किंवा मद्यविक्रीच्या दुकानांशी संलग्न असलेले मद्यपानाचे क्षेत्र बंद केले जाणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी याबाबतची घोषणा केली. नवीन उत्पादन शुल्क धोरणात मद्यसेवनापासून परावृत्त करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यात नियंत्रित मद्यधोरण हवे, अशी मागणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी केल्याच्या पृष्ठभूमीवर हे...
20 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, February 19th, 2023
उज्जैन, (१९ फेब्रुवारी ) – मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात शनिवारी संध्याकाळी १८.८२ लाख दीप प्रज्वलित करून नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. एवढ्या मोठ्या संख्येने क्षिप्रा नदीच्या काठावर सुमारे २० हजार स्वयंसेवकांनी दीपप्रज्वलन करण्याचे काम पूर्ण केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड टीमचे स्वप्नील डांगरीकर म्हणाले, उज्जैनपूर्वी तेलाचे दिवे लावण्याचा विश्वविक्रम गेल्या दिवाळीत अयोध्येत करण्यात आला होता, जिथे १५.७६ लाख दिवे लावण्यात आले होते. शनिवारी संध्याकाळी उज्जैनमध्ये १८.८२ लाख दिवे लावून अयोध्येचा विक्रम...
19 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, February 19th, 2023
रायपूर, (१९ फेब्रुवारी ) – छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका महिलेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर फिरत असून, एक महिला ख्रिश्चन धर्मांतरणासाठी खोट्या चमत्काराच्या पत्रिका वाटताना दिसत आहे. या महिलेचा व्हिडीओ तयार करीत एका व्यक्तीने पर्दाफाश केला आहे. व्हिडीओमध्ये एक महिला पत्रक वाटताना दिसत आहे. आपल्या आयुष्यात कोणतीही अडचण असली तर, आपण या नंबरवर कॉल करून प्रार्थना करू शकता किंवा यात दिलेले सर्च करून पाहू शकता. या पत्रिकेवर असलेलेे ईश्वराचे सर्वांत मोठे...
19 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 16th, 2023
जयपूर, (१६ फेब्रुवारी ) – राजस्थान विधानसभा निवडणुकीला थोडा वेळ शिल्लक असला तरी सचिन पायलट विरुद्ध अशोक गेहलोत यांच्यात मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठीचे युद्ध अजूनही सुरूच आहे. राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा चुरस निर्माण झाली आहे. सचिन पायलट यांनी एक दिवसापूर्वी दिलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे अंतर्गत राजकारण पुन्हा तापले आहे. यासोबतच पायलट कॅम्पमधून मुख्यमंत्री पदाबाबतची जोरदार चर्चा रंगली आहे. सचिन पायलट यांनी अलीकडेच काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्याचे प्रकरण आणि गेहलोत गटातील तीन मंत्र्यांवर अनुशासनहीनतेच्या नोटिसा मिळाल्याबद्दल...
16 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 16th, 2023
भोपाळ, (१६ फेब्रुवारी ) – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यानंतर आता बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी देशात सनातन बोर्ड स्थापन करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर ज्याचे रक्त शुद्ध आहे, तो हिंदू राष्ट्राबद्दल बोलेल, असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले. हिंदू राष्ट्राबाबत संसदेत लवकरच काहीतरी घडणार आहे, असा दावा त्यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धाम सातत्याने चर्चेत आहे. इथे धीरेंद्र कृष्ण शास्त्री भारताला...
16 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 15th, 2023
– धीरेंद्र शास्त्री यांनी वेदांसमोर घेतली प्रतिज्ञा, छत्तरपूर, (१५ फेब्रुवारी ) – बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी चारही वेदांसमोर भारताला हिंदू राष्ट्र करण्याची प्रतिज्ञा घेतली. मध्यप्रदेशच्या छत्तरपूर येथील बागेश्वर धाम येथे हिंदू राष्ट्रासाठी सोमवारपासून एका महायज्ञाला सुरुवात झाली आहे. हा महायज्ञ सात दिवस चालणार आहे. या महायज्ञाच्या शुभारंभप्रसंगी धीरेंद्र शास्त्री यांनी हिंदुस्थानाला हिंदू राष्ट्र बनविण्याचा संकल्प घेतला आणि हिंदू राष्ट्रचा जयघोषही केला. या महायज्ञाच्या निमित्ताने का होईना, बागेश्वर धाम येथे...
15 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, February 12th, 2023
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा, भोपाळ, (१२ फेब्रुवारी ) – आगामी महाशिवरात्रोत्सवानिमित्त ‘शिव ज्योती अर्पण’ कार्यक्रमाचा भाग म्हणून उज्जैन शहरात १८ फेब्रुवारी रोजी २१ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. मागील वर्षी उज्जैनमध्ये महाशिवरात्रीनिमित्त ११ लाख ७१ हजार ०७८ दिवे लावण्यात आले होते. आता २१ लाख दिवे लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवायचे आहे, असे चौहान यांनी सांगितले. या भव्य कार्यक्रमाच्या...
12 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, February 10th, 2023
जबलपूर, (१० फेब्रुवारी ) – तंदुरी रोटी बनवल्याने प्रदूषण अधिक पसरते त्यामुळे आता भट्टीवर बनणारी तंदुरी रोटी खायला मिळणार नाही, अशा आशयाचे आदेश मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. या आदेशाने स्थानिक हॉटेल मालकांमध्ये गोंधळ उडाला आहे. आदेशाचे पालन न केल्यास हॉटेल मालकांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात येणार आहे. हॉटेल मालकांना लाकूड आणि कोळशाद्वारे तंदूरी रोटी बनविण्यास बंदी घालण्यासाठी जबलपूर जिल्ह्यातील अन्न सुरक्षा विभागाने शहरातील ५० हॉटेल मालकांना नोटिसा...
10 Feb 2023 / No Comment / Read More »