किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– वजन जास्त असल्याने प्रदक्षिणाचा निर्णय बदलला,
– १० किलो वजनाची चांदीची मूर्ती पालखीतून फिरवली,
अयोध्या, (१८ जानेवारी) – २२ जानेवारीला अयोध्येत श्रीरामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठेचे विधी १६ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. बुधवारी दुसरा दिवस आहे. २०० किलो वजनाची रामललाची नवीन मूर्ती मंदिर परिसरात आणण्यात आली. वजन जास्त असल्याने मूर्तीची प्रदक्षिणेचा निर्णय बदलण्यात आला. त्याऐवजी रामजन्मभूमी परिसराभोवती रामललाची १० किलो चांदीची मूर्ती नेण्यात आली.
तत्पूर्वी, दुपारी २.३० वाजता निर्मोही आखाड्याचे महंत दिनेंद्र दास आणि पुजारी सुनील दास यांनी अयोध्या राम मंदिराच्या गर्भगृहात पूजा केली. यानंतर महिलांनी कलश यात्रा काढली. रामललाची मूर्ती ट्रकमधून मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होताच, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी त्यांच्याकडून जय श्रीराम, असा जयघोष करण्यात आला. यावेळी अनेकांनी आपल्या आनंदाला पारावार उरला नसल्याची प्रतिकि‘या दिली.
दुसरीकडे, बुधवारी अयोध्येसाठी एअर इंडिया एक्सप्रेस सेवेची दोन उड्डाणे सुरू करण्यात आहेत. हे विमान अयोध्येला कोलकाता आणि बंगळुरूला जोडेल. नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याचे उद्घाटन केले. शिंदे म्हणाले की, १७ दिवसांत अयोध्या देशाच्या चारही कोपर्यांशी जोडली गेली आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच पर्वत, जंगल, किनारपट्टी, बेटे इत्यादी भागातील रहिवासी एकाच ठिकाणी अशा कार्यक‘मात सहभागी होत आहेत. त्या अर्थाने हा सोहळा अद्वितीय असेल.
सोहळ्याच्या तयारीने घेतला वेग
राम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात २२ जानेवारी रोजी रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. याला आता केवळ पाचच दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा प्रमुख सोहळा पार पडणार आहे. यासाठी अनेक मान्यवरांना तसेच रामभक्तांना निमंत्रण देण्यात आली आहेत. पण या मुख्य सोहळ्यापूर्वी तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात पार पाडले जाणार आहेत. यामध्ये गर्भगृहात रामललाची मूर्ती स्थापन केली जाणार आहे. त्यासाठी विविध धार्मिक विधी पार पाडले जाणार आहेत. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठेचा प्रमुख विधी पार पडणार आहे.