किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादलबशिरहाट, (११ मार्च) – संदेशखालीत ईडीच्या अधिकार्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणात येथील न्यायालयाने रविवारी तृणमूल काँग्रेसचा माजी नेता शाहजहान शेखची सीबीआय कोठडी चार दिवसांनी वाढवली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास आणि शाहजहानची कोठडी सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश दिल्यानंतर ६ मार्च रोजी सीबीआयने त्याला ताब्यात घेतले होते. शाहजहानच्या ठिकाणावर छापेमारी करण्यास गेलेल्या ईडीच्या अधिकार्यांवर संदेशखाली येथे हल्ला करण्यात आला होता.
सीबीआयने केलेली मागणी मान्य करीत न्यायालयाने त्याला आणखी चार दिवस सीबीआयच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. १४ मार्च रोजी शेखला हजर करा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. शाहजहानला सध्या कोलकाता येथे सीबीआयने कोठडीत ठेवले आहे. कोलकात्यापासून ७० किमी अंतरावर असलेल्या बशिरहाट येथील न्यायालयात त्याला आज कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत हजर करण्यात आले होते. रेशन वितरण घोटाळ्याच्या तपासासंदर्भात ५ जानेवारी रोजी ईडीचे पथक कारवाईसाठी संदेशखाली येथे गेले असता, सुमारे हजार लोकांच्या जमावाने ईडीच्या अधिकार्यांवर हल्ला केला होता. या रेशन वितरण घोटाळ्यात राज्याच्या एका माजी मंत्र्याला अटक करण्यात आली आहे. सीबीआय, ईडी किंवा पश्चिम बंगाल पोलिस कुणीही शाहजहान शेखला अटक करू शकते, असा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर बंगाल पोलिसांनी त्याला अटक केली होती.