किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 22.52° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.48 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 25.37°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.3°से. - 27.19°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.18°से. - 26.01°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.95°से. - 25.33°से.
गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश23.73°से. - 25.86°से.
शुक्रवार, 17 जानेवारी छितरे हुए बादल24.32°से. - 26.84°से.
शनिवार, 18 जानेवारी टूटे हुए बादलऔरंगाबाद, (०२ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौर्यावर आहेत. या दरम्यान सर्व प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी औरंगाबादला पोहोचले, जिथे त्यांनी मंचावरून २१ हजार कोटींहून अधिक रकमेच्या विकास योजनांची पायाभरणी, लोकार्पण आणि उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींच्या भाषणापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, बिहारमध्ये विकास योजनांचे काम वेगाने सुरू आहे.
पंतप्रधान मोदींकडे बोट दाखवत नितीश कुमार म्हणाले की, तुम्ही खूप दिवसांनी आला आहात, आम्ही काही दिवस गायब होतो. आता तुम्ही नेहमी येत राहणार. बिहार प्रत्येक क्षेत्रात प्रगती करेल. आता यापुढे आम्ही आता इकडे तिकडे राहणार नाही याची खात्री देतो याशिवाय सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, लाखोंच्या संख्येने लोक आले आहेत, मी सर्वांचे स्वागत करतो. आमस-दरभंगा चौपदरी रस्त्याच्या बांधकामामुळे नागरिकांची सोय होणार आहे. आता पाटणा ते बिहता प्रवास करणे सोपे होणार आहे. गंगा नदीवर सहा पदरी पूल बांधल्याने सर्वसामान्यांना फायदा होणार आहे.
मंचावर पंतप्रधान मोदींनी ओढला नितीश कुमारांचा हाथ
बिहारमधील लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी पंतप्रधान मोदी बिहारमध्ये पोहोचले आहेत. औरंगाबादमध्ये आयोजित जाहीर सभेच्या व्यासपीठावर पंतप्रधान मोदी पोहोचताच सभेला जमलेली गर्दी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. पंतप्रधान मोदींचे समर्थक त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते. जेव्हा पंतप्रधान मोदी मंचावर पोहोचले तेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार, सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा आणि इतर दिग्गजांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
पंतप्रधान मोदींच्या स्वागतादरम्यान पंतप्रधान आणि नितीश कुमार यांच्यात अप्रतिम जुगलबंदी पाहायला मिळाली. नितीश, सम्राट यांच्यासह एनडीएचे सर्व दिग्गज पंतप्रधान मोदींना पुष्पहार अर्पण करत होते. दरम्यान, पंतप्रधान मोदींनाही नितीश कुमार यांना पुष्पहार घालण्याची इच्छा होती. नितीशकुमार मात्र संकोच दाखवत होते. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी बळजबरीने नितीशकुमार यांना हाथ ओढून पुष्पहाराच्या आत आणले. ही घटना पाहून रॅलीत जमलेल्या लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात पाठिंबा व्यक्त केला.