किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी घटनास्थळी हजर,
उत्तरकाशी, (२८ नोव्हेंबर) – सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १६ दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. दोन रुग्णवाहीका आणि वैद्यकीय चमू बोगद्याच्या आत दाखल झाल्यानंतर, मजूरांनी ‘जय माता दी’च्या घोषणा दिल्या. दरम्यान, एस्केप टनेलचे काम दुपारी पूर्ण झाले असून मजुरांना एक-एक करून बोगद्यातून बाहेर काढण्यात येत आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी घटनास्थळी दाखल झाले असून सर्वाधिक वयाच्या श्रमिकाला आधी बाहेर काढण्यात आले आहे. यावेळी केंद्रीयमंत्री जनरल व्ही.के. सिंह उपस्थित होते.
’सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मजुराला बाहेर काढण्यासाठी साधारण २ ते ३ मिनिटांचा कालावधी लागतो आहे. मजुरांना थेट बाहेर, मोकळ्या हवेत न आणता काही वेळासाठी आतच सुरक्षित जागी ठेवण्यात आले आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफची चमू बोगद्यात दाखल झाली असून, मजुरांशी संवाद साधून, त्यांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. दरम्यान, मजुरांना घेऊन येणार्या रुग्णवाहीकांसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला असून, स्ट्रेचर आणि दोर घेऊन मजुरांच्या सुटकेसाठी चमू बोगद्याच्या आत दाखल झाली आहे. रॅट होल माइनिंगच्या तंत्रानेच मजुरांची सुटका झाल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासू साधारण ३० किलोमीटर अंतरावर सिलक्यारा बोगद्याचे काम केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चारधाम परियोजना ‘ऑल वेदर सडक’ अर्थात सर्व ऋतूंमध्ये ये-जा करण्यासाठीच्या रस्ते उपक्रमात सुरू आहे. मॅन्युअल ड्रीलिंगसाठी दोन खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आले असून १२ सदस्यांच्या दोन चमू तैनात आहेत. ब्रम्हखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर साडे चार किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे. १२ नोव्हेंबर रोजी या बोगद्यात दरड कोसळली आणि ४१ मजूर आत फसले. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी गेल्या १६ दिवसांपासून युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.