किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 27.38° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.38° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (३० ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा पुनरुच्चार करताना आरोग्य हीच अंतिम संपत्ती आहे आणि चांगल्या आरोग्याच्या साथीनेच प्रत्येक कार्य पूर्ण करता येते असे केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशियासाठीच्या प्रादेशिक समितीच्या ७६ व्या सत्राला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्ली येथे संबोधित केले. जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसस हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांच्यासमवेत उपस्थित होते. दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक समितीच्या ७६ व्या सत्राच्या अध्यक्षपदी डॉ. मांडविया यांची यावेळी एकमताने निवड करण्यात आली.
केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले, भारतात आम्ही सर्वसमावेशक दृष्टिकोन अवलंबत आहोत. आम्ही आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करत आहोत, पारंपारिक औषध प्रणालींना चालना देत आहोत आणि कोणीही वंचित राहणार नाही या दृढ वचनबद्धतेसह सार्वत्रिक आरोग्य सेवा उपलब्धतेच्या संकल्पनेनुसार सर्वांना परवडणारी आरोग्यसेवा पुरवत आहोत यावर त्यांनी भर दिला.
व्यापक प्रमाणावर प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्या, आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रांच्या (एबी-एचडब्ल्यूसी) प्रगतीचे डॉ. मांडविया यांनी यावेळी कौतुक केले. २४ ऑक्टोबर २०२३ पर्यंत, एबी-एचडब्ल्यूसी ने २,११० दशलक्षहून अधिक लोकांची नोंद केली आहे. याचा लोकांवर लक्षणीय प्रभाव असून १,८३० दशलक्ष पेक्षा जास्त वेळा मोफत औषधे आणि ८७३ दशलक्ष पेक्षा जास्त वेळा निदान सेवांचा लाभ घेतला गेला असे त्यांनी सांगितले. २६ दशलक्ष निरामयता सत्रे आयोजित केली गेली आहेत. यात ३०६ दशलक्षाहून अधिक लोक सहभागी झाले आहेत असेही ते पुढे म्हणाले.
डॉ. मांडविया यांनी नमूद केले की आयुष्मान भारत डिजिटल मिशन आणि पंतप्रधान -आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानासारख्या उपक्रमांनी डिजिटल हेल्थ फ्रेमवर्क आणि भौतिक पायाभूत सुविधांना मोठ्या प्रमाणावर बळकटी दिली आहे, ज्यामुळे देशातील आरोग्य सेवा पुरवण्याच्या कार्यात क्रांतिकारी उत्क्रांती झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अधोरेखित केले की,आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रांच्या माध्यमातून आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लक्ष केंद्रित केले असून त्या माध्यमातून एक समन्वयवादी दृष्टीकोन आत्मसात केला आहे जेणेकरून आरोग्यविषयक सकारात्मक परिणाम साध्य होतील, आरोग्यविषयक खर्चातही कपात होईल आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणांसाठी सतत प्रयत्नशील असलेल्या इतर देशांसाठी ही व्यवस्था एक आदर्श प्रस्थापित करेल.
डॉ. मांडविया यांनी नवी दिल्लीत डब्ल्यूएचओ सेरो बिल्डिंग साइट, आयपी इस्टेट, येथे वृक्षारोपण समारंभात उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, डब्ल्यूएचओ सेरो (डब्लूएचओ एसईएआरओ-जागतिक आरोग्य संघटनेचे दक्षिण पूर्व आशिया प्रादेशिक कार्यालय ) ही जागतिक आरोग्य संघटनेची दक्षिण पूर्व भागातील देशांसाठी असलेली कार्यालयाची ही इमारत जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त प्रयत्नांचे प्रतीक आहे. याचे उद्दिष्ट दक्षिण-पूर्व प्रदेशात आरोग्य सेवांचा समावेशक आणि न्याय्य विकास सुनिश्चित करणे हे आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या भव्य प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेसाठी भारताचे योगदान म्हणून २३९.५ कोटी रुपयांचा निधी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनला प्रदान केला. हा संयुक्त उपक्रम क्षेत्रातल्या आरोग्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी आरोग्य व्यावसायिकांमध्ये सहयोग, संशोधन आणि ज्ञान देवाणघेवाणसाठीचे केंद्र बनेल अशी अपेक्षा आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी उपस्थितांना आभासी माध्यमातून संबोधित केले. त्यांनी नमूद केले की, सेरो (एसईएआरओ) चे ७६ वे सत्र हे अशा महत्त्वाच्या टप्प्यावर होत आहे जे जागतिक आणि स्थानिक या दोन्ही क्षेत्रासाठी फायद्याचे ठरणार आहे. त्यांनी अधोरेखित केले की, दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रात जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या राहते आणि या प्रदेशातल्या आरोग्याच्या समस्यांविषयी असलेल्या महत्त्वपूर्ण विषयावर लक्ष देणे आवश्यक आहे. क्षयरोगाचा मुकाबला करण्यासाठी या प्रदेशातल्या देशांच्या प्रयत्नांची प्रशंसा करताना, डॉ. टेड्रोस यांनी डॉ. मांडविया यांच्या नेतृत्वाची आणि हेल्थ फॉर ऑल म्हणजेच ‘सर्वांसाठी आरोग्य’ या वचनबद्धतेची प्रशंसा केली.