किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– गगनयान मिशनसाठी इस्रोचा निर्णय,
पणजी, (१३ डिसेंबर) – इतर देशांकडून आगामी मानवयुक्त अंतराळ मोहीम ’गगनयान’साठी ’पर्यावरण नियंत्रण आणि जीवन समर्थन प्रणाली’ (ईसीएलएसएस) न मिळाल्याने, अवकाश संस्थेने ते स्वतः विकसित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले. गगनयान प्रकल्पांतर्गत, इस्रो पृथ्वीच्या ४०० किलोमीटर वरच्या कक्षेत मानवी क्रू पाठवेल आणि नंतर त्यांना पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणण्यासाठी समुद्रात उतरवेल. सोमनाथ म्हणाले, आम्हाला पर्यावरण नियंत्रण आणि जीवन समर्थन प्रणाली विकसित करण्याचा अनुभव नाही. आम्ही फक्त रॉकेट आणि उपग्रह तयार करतो. आम्हाला अशी माहिती इतर देशांकडून मिळेल असे वाटले होते पण दुर्दैवाने खूप चर्चा होऊनही कोणताही देश आम्हाला तीद्यायला तयार नाही.
गोव्याच्या विज्ञान, पर्यावरण आणि तंत्रज्ञान विभागाने आयोजित केलेल्या ’मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सव २०२३’ च्या ५ व्या आवृत्तीला संबोधित करताना सोमनाथ बोलत होते. गोव्यातील डोना पॉला येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोमनाथ म्हणाले की, इस्रोने आता स्वत: ईसीएलएसएस विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, आम्ही आमच्याकडे असलेले ज्ञान आणि उद्योग वापरून ते भारतात विकसित करणार आहोत. गगनयान कार्यक्रमापुढील आव्हानांबाबत ते म्हणाले की, भारत गेल्या अनेक वर्षांपासून उत्पादन डिझाइन क्षमता विकसित करण्यासाठी ज्ञान संपादन करण्यात गुंतलेला आहे आणि यातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे भारतीय मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम असणार आहे. ते म्हणाले, जेव्हा आम्ही आमच्या गगनयान कार्यक्रमाद्वारे मानवांना अंतराळात पाठवतो, तेव्हा मला वाटते की आमच्याकडे सध्या आहे त्यापेक्षा जास्त कौशल्ये आणि आत्मविश्वास असावा.