किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– हादरलेल्या आई-वडिलांचा एकत्र राहण्याचा निर्णय,
नवी दिल्ली, (०२ फेब्रुवारी) – येथील कडकडडुमा कोर्टात पती-पत्नीत ९ वर्षांपासून वाद सुरू होता. दोघांनी एकमेकांवर अनेक गुन्हे दाखल केले होते. त्यांचे घटस्फोटाचे प्रकरणही अंतिम टप्प्यात होते. हे तुटलेले नाते वाचविण्यासाठी एका ११ वर्षाच्या मुलाने कोर्टात असा पराक्रम केला की, त्याच्या आई-वडिलांनी घटस्फोटाचा निर्णय तर सोडलाच, पण एकत्र राहायलाही होकार दिला. त्याने चक्क आपल्या पालकांनाच घटस्फोट मागितला.
त्याचे असे झाले की, घटस्फोटाच्या प्रकरणात पती-पत्नीची अंतिम सुनावणी न्यायालयाने नियुक्त केलेल्या मध्यस्थी केंद्रात झाली. पती राजन आणि पत्नी गीता (नाव बदलले आहे) दोघेही उपस्थित होते. गीता तिचा ११ वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन आली होती. मध्यस्थीने राजन आणि गीता यांना शेवटच्या वेळी विचारले की, त्यांना एकत्र राहायचे आहे का, तसे न केल्यास घटस्फोटाच्या अंतिम निर्णयासाठी तुमची केस फाईल कौटुंबिक न्यायालयात पाठवली जाईल.
पती-पत्नी दोघांनी एकत्र राहण्यास नकार दिला. यावर उपस्थित रोहनच्या डोळ्यात पाणी आले. तेथे उपस्थित न्यायाधीशांनी विचारले काय झाले बेटा, तुला दोघांपैकी कोणासह राहायचे आहे, रोहनने निरागसपणे प्रश्न विचारला की, न्यायाधीश काका, मला माझ्या आई-वडिलांसोबत राहायचे आहे. हे दोघे एकत्र का राहू शकत नाहीत, मुलाला समजावून सांगताना न्यायाधीश म्हणाले की, बेटा, तुझ्या आई-वडिलांचे एकमेकांसोबत पटत नाही. त्यांना स्वतःला एकत्र राहायचे नाही. त्यामुळेच त्यांचा घटस्फोट होत आहे; जेणेकरून ते वेगळे आणि आनंदी राहू शकतील. रोहन रागाने निरागस स्वरात म्हणाला, न्यायाधीश काका, जर ते एकत्र राहू शकत नसतील तर, मलाही त्या दोघांपासून घटस्फोट द्या. माझ्या आनंदासाठी आई बाबा एकत्र राहू शकत नाहीत का, मी राहीन तर या दोघांसोबत किंवा कुणासोबतही नाही. मला इतरत्र पाठवा.
त्यानंतर रोहन रडायला लागला. त्याच्या पालकांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने आपले दोन्ही हात झटकले आणि मध्यस्थी न्यायाधीशांकडे गेला. मुलाच्या या बोलण्याने आणि वागण्याने पती-पत्नी दोघांचीही मने हादरली. पती-पत्नी वेगवेगळे जाऊन अर्धा तास बोलले. यानंतर दोघेही कोर्टासमोर आले आणि म्हणाले की, दोघेही मुलापासून वेगळे राहू शकत नाहीत. या लढ्यात ते निरागस मुलाचे भविष्य विसरले होते. आता दोघांनीही ठरवले की, ते एकमेकांवर दाखल झालेले सर्व खटले मागे घेतील आणि नव्याने सुरुवात करतील.