किमान तापमान : 28.76° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 5.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – दहशतवादाबद्दल भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी पाकिस्तानचे नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. सीमेपलीकडील दहशतवादामुळे भारताला झालेल्या मोठ्या नुकसानीचा संदर्भ देताना कंबोज म्हणाल्या की, दहशतवादी गट आपल्या देशाला लक्ष्य करण्यासाठी ड्रोनचा वापर करून अवैध शस्त्रांंची तस्करी करतात.
‘स्मॉल आर्म्स’ या विषयावरील खुल्या चर्चेत कंबोज बोलत होत्या. दहशतवादी गट आमच्या सीमेवरून शस्त्रांची तस्करी करून दहशतवाद आणि हिंसाचाराच्या घटना घडवून आणतात, त्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आहे आणि आता यात ड्रोनचाही समावेश आहे. या दहशतवादी संघटनांकडे असलेल्या शस्त्रास्त्रांचे प्रमाण आणि गुणवत्तेत झालेली वाढ इतर देशांच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाहीत, असे कंबोज म्हणाल्या. भारत वेळोवेळी जगाच्या प्रत्येक लहान-मोठ्या व्यासपीठावरून पाकिस्तानचा खरा चेहरा आणि त्याच्या खोडसाळ कारवायांबद्दल जगाला सतर्क करीत असतो. भारताच्या संपूर्ण नाकेबंदीमुळे पाकिस्तान एफटीएच्या ग्रे लिस्टमध्ये आला. त्यानंतर काळ्या यादीत टाकले जाऊ नये म्हणून त्याला दहशतवाद्यांविरोधात कॉस्मेटिक कारवाई करण्यास भाग पाडले गेले.