किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.05° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०९ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत, विनाकारण बयाणबाजी न करण्याचा सल्ला आपल्या मंत्र्यांना दिला आहे. भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी आपल्या पक्षाचा आणि केंद्र सरकारची मर्यादा व सन्मान कायम राहील, अशीच विधानं करावीत, अशी सूचना पंतप्रधानांनी केली असल्याचे वृत्त आहे. श्रीराम मंदीरातील रामललाच्या पृष्ठभूमीवर चर्चांना ऊत आलेला असताना, पंतप्रधानांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे.
पंतप्रधानांनी कॅबिनेट बैठकीत, आपल्या मंत्र्यांना कठोर निर्देश दिले आणि कोणतीही बयाणबाजी न करण्याचा सल्ला दिला. त्यासोबतच, आपापल्या क्षेत्रात प्राणप्रतिष्ठेच्या काळात काही गडबड होऊ नये, याची काळजी घेण्यासही त्यांनी सांगितले. आपल्या भागातील लोकांना श्रीरामाच्या दर्शनासाठी २२ जानेवारीनंतर घेऊन जावे, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. २२ जानेवारीला होणार्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात निवडक लोकांना आमंत्रण असले तरीही, मोठ्या संख्येने लोक अयोध्येत दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात १२५ संतपरंपरांमधील संतमहंत उपस्थित राहतील. शिवाय, १३ आखाडे आणि ६ सनातन दर्शनचे धर्माचार्य, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान आणि न्यायक्षेत्रातील अडीच हजार लोकांना आमंत्रित करण्यात आलं असून त्यादृष्टीने विशेष तयारी करण्यात येत आहे. सोबतच, ५० देशांमधील १०० पाहुणेदेखील यावेळी उपस्थित राहतील.
देशविदेशात या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रसारण भारतीय दूतावासांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अमेरिकेच्या न्युयॉर्कमधील टाईम स्क्वेअरमध्येही या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक क्षणी, प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करतील. देशभरातून रामभक्त अयोध्येत दाखल होत असून, कोणी पायी तर कोणी सायकलने अयोध्येत पोहचणार आहेत. देशाच्या इतिहासात २२ जानेवारीचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला जाणार आहे.