किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.64°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– १२ ते १४ मार्चला पानिपत येथे संघाची अ. भा. प्रतिनिधी सभा,
पानिपत, (१० मार्च) – अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ही संघाची सर्वांत महत्त्वपूर्ण सभा आहे. या बैठकीत मागील वर्षातील कामांचा आढावा घेऊन आगामी वर्षात संघामार्फत करावयाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात येत असतो. यावर्षी ही प्रतिनिधी सभा १२ ते १४ मार्चदरम्यान पानिपत जिल्ह्यातील समालखा येथील पट्टीकल्याणाच्या सेवा साधना आणि ग्राम विकास केंद्रात होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी आज येथे एका पत्रपरिषदेत दिली. पानिपतच्या ऐतिहासिक भूमीवर होणार्या या बैठकीत संघाच्या शताब्दी वर्षाची योजना आखली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
या प्रतिनिधी सभेमध्ये देशभरातून संघाचे १४०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये ३४ विविध संघटनांचे कार्यकर्तेही सहभागी होतील. त्याआधी ११ मार्चला अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक होईल. या बैठकीमध्ये प्रतिनिधी सभेत मांडल्या जाणार्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात येईल. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे हे १४ मार्च रोजी प्रतिनिधी सभेच्या शेवटच्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधत मंजूर झालेल्या ठरावांची माहिती देणार आहेत, असेही आंबेकर यांनी सांगितले.
सुनील आंबेकर म्हणाले की, १२ मार्च रोजी प्रतिनिधी सभेचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सर्व सह सरकार्यवाह, अखिल भारतीय कार्यकारिणी, विविध संघटनांचे पदाधिकारी, सर्व प्रदेश व प्रांतातील संघचालक व कार्यवाह उपस्थित राहणार आहेत. आंबेकर म्हणाले की, २०२५ साली संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. प्रतिनिधी सभेत शताब्दी वर्ष कार्य विस्तार योजना २०२२-२३ चा आढावा आणि अनुभवाच्या आधारे २०२३-२४ चा कृती आराखडा तयार केला जाईल.
या वर्षाचा आढावा घेण्याबरोबरच २०२५ पर्यंत संघात नवीन स्वयंसेवकांना जोडणे, २०२३-२४ या वर्षाचा कृती आराखडा तयार करणे यावर चर्चा करण्यात येणार आहे. शाखा हा संघाचा कणा असून शाखा सामाजिक परिवर्तनाचे केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले. शाखेचे स्वयंसेवक सामाजिक परिस्थितीच्या अभ्यासावर आधारित विषय निवडतात आणि सामाजिक बदलासाठी काम करतात. समाजाला स्वावलंबी बनवणे, सेवा कार्याचा विस्तार करणे, समाजात सामाजिक सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे, पर्यावरण रक्षण, अमृतकाळअंतर्गत देशात कोणती कामे झाली पाहिजेत, या सर्व विषयांवर स्वयंसेवक शाखांच्या माध्यमातून समाजात कार्यरत असतात.
महर्षी दयानंद यांच्या जन्माला २०२४ मध्ये २०० वर्षे पूर्ण होत आहेत आणि भगवान महावीर स्वामींच्या २५५० व्या निर्वाण वर्षाच्या संदर्भात एक विशेष निवेदनही जारी करण्यात येणार असल्याची माहितीही आंबेकर यांनी यावेळी दिली.