किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– शरद पवार गटाने घेतली उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची भेट,
नवी दिल्ली, (२३ नोव्हेंबर) – खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असताना शरद पवार गटाने अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली. शरद पवार, लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे तसेच राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची आज भेट घेत, त्यांच्याकडे ही मागणी केली. प्रफुल्ल पटेल यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी घटनेतील १० व्या अनुसूचीनुसार खा. वंदना चव्हाण यांनी एका पत्रातून काही महिन्यांपूर्वी धनकड यांच्याकडे केली होती, पण त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे शरद पवार आणि अन्य नेत्यांनी आज धनकड यांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल हे कधीकाळी शरद पवारांचे अतिशय विश्वासू होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ते अजित पवार गटासोबत गेले.
विशेष म्हणजे, दिवाळीत पवार कुटुंबाच्या दिवाळीमिलन कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार आदी प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी एकत्र आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार, अशी चर्चा सुरू झाली असताना शरद पवार यांनी उपराष्ट्रपती धनकड यांची भेट घेत प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केल्यामुळे हे दोन गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता मावळली आहे. प्रतापसिंह चौधरी हे शरद पवार गटाचे नेते असून, त्यांच्या नावाचे खोटे प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केले होते. शरद पवार गटाने प्रतापसिंह चौधरी यांनाच निवडणूक आयोगासमोर उभे करीत अजित पवार गटाच्या खोटेपणाचा पर्दाफाश केला.