किमान तापमान : 30.57° से.
कमाल तापमान : 33.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 36 %
वायू वेग : 1.74 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
33.99° से.
26.35°से. - 33.99°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.69°से. - 30.46°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.81°से. - 30.45°से.
रविवार, 17 नोव्हेंबर साफ आकाश27.66°से. - 31.1°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.51°से. - 30.68°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.84°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– आर.के.षण्मुखम शेट्टी यांनी मांडले स्वतंत्र भारताचे पहिले बजेट?,
नवी दिल्ली, (२३ जुन) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकार ३.०चा अर्थसंकल्प सादर करून, नवा इतिहास रचला आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाचा अर्थसंकल्प संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारा ठरतो. भारतासाठी पहिला अर्थसंकल्प ब्रिटीश सरकारच्या वतीने, ईस्ट इंडिया कंपनीने सादर केला होता. दिनांक १८ फेब्रुवारी १८६० रोजी जेम्स विल्सन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आणि त्यांनाच भारतीय अर्थसंकल्प व्यवस्थेचे जनक म्हटले जाते.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री म्हणून आर.के.षण्मुखम शेट्टी यांनी जबाबदारी स्विकारली. त्यांनी २६ नोव्हेंबर १९४७ रोजी देशाचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. षण्मुखम चेट्टी हे व्यवसायाने वकील, राजकारणी आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी मांडलेला पहिला अर्थसंकल्प जवळपास ७ महिन्यांसाठी होता. देशाचा पहिला अर्थसंकल्प १९७ कोटी रुपयांचा होता.
त्यानंतरचं दुसरं बजेट १ एप्रिल १९४८ रोजी सादर करण्यात आलं. त्यावेळी, अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सायंकाळी ५ वाजताची होती. मात्र, वर्ष १९९९ मध्ये तत्कालिन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेत बदल करून, सकाळी ११ वाजताची वेळ निर्धारीत केली.