किमान तापमान : 30.95° से.
कमाल तापमान : 32.31° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 42 %
वायू वेग : 1.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
32.31° से.
25.84°से. - 32.99°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 30.86°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.34°से. - 30.77°से.
रविवार, 17 नोव्हेंबर साफ आकाश27.21°से. - 30.89°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.01°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (०२ जानेवारी) – मुर्शिदाबादचे काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी पत्रपरिषदेत बोलताना ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. ममता बॅनर्जींनी इंडि आघाडी बिघडवली आहे, त्यांनाच आघाडी नको. त्यांनी हट्ट केला तर, त्या स्वतःच अडचणीत येतील. बंगालमध्ये कोण येते आणि कोण सोडते, याची आम्हाला काहीच अडचण नाही, बंगालमध्ये निवडणूक लढवण्याची ताकद काँग्रेसकडेच आहे, असे अधीररंजन चौधरी यांनी म्हटले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. इंडि आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्यावरून एकमेकांना दलालासारखे शब्द वापरले जात आहेत.
एकीकडे उबाठा गट महाराष्ट्रात २३ जागांवर दावा केला आहे, तर दुसरीकडे बंगालमध्ये ममता बॅनर्जी एकट्याने निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, काँग्रेस आणि तृणमूल यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बॅनर्जी यांनी एका बैठकीत इंडिया आघाडीच्या जागावाटपावर चर्चा करताना, माकपा आणि काँग्रेसचे वर्णन भाजपाचे दलाल म्हणून केले आहे. ४०० जागांवर जागावाटप झाले तर, भाजपा २०० च्या खाली जाऊ शकते, असे सुदीप बॅनर्जी यांनी म्हटले आहे. काँग्रेसची भूमिका काय असेल, हे पाहावे लागेल, असे ते म्हणाले.
उत्तरप्रदेशात काँग्रेस अखिलेश यांना सोडणार का, बिहारमध्ये लालू आणि नितीश कुमारांना सोडणार का, ते बंगालमध्ये ममतांना सोडणार का आणि अरविंद केजरीवाल यांना पंजाब आणि दिल्ली सोडणार का, असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.