किमान तापमान : 27.71° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.87°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (२२ नोव्हेंबर) – देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र बदलणारा एक महत्त्वाकांक्षी रेल्वे कॉरिडॉरचा प्रकल्प मोदी सरकारने पूर्ण केला असून, या कॉरिडॉरमुळे अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळणार आहे. यामुळे अनेक नव्या शहरांची निर्मिती होईल आणि नवे व्यवसायही विकसित होतील. परिणामी लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल.
देशात अनेक नवीन द्रुतगती मार्ग आणि आर्थिक क्षेत्रे तयार करण्यात आली आहेत. त्यातच आता १,३३७ किमीचा असा कॉरिडॉर तयार करण्यात आला, जो देशाचा चेहरामोहरा बदलेलच, शिवाय आर्थिक विकासाचा वेगही अनेक पटींनी वाढविणार आहे. या कॉरिडॉरमुळे देशात नवीन औद्योगिक हब तयार होतील, नवीन शहरे निर्माण होतील आणि लोकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ असे त्याचे नाव असून, तो देशातील दोन प्रमुख बंदर शहर असलेल्या मुंबई आणि कोलकात्याला दिल्ली आणि पंजाब यासारख्या क्षेत्रांशी जोडणार आहे.
काय आहे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर
सध्या देशात एकाच रेल्वे मार्गावर प्रवासी आणि मालगाड्या दोन्ही धावतात. यात प्रवाशांना वेळेत पोहोचविण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मालगाड्या वेळेवर माल घेऊन पोहोचू शकत नाहीत. परिणामी, कंपन्या आणि खरेदीदार ट्रकमधून माल भरण्यास प्राधान्य देतात. सरकारने ही अडचण दूर करण्यासाठी समांतर मालवाहतूक कॉरिडॉर तयार केले आहेत. यासाठी स्वतंत्र रुळांचे जाळे तयार करण्यात आले असून, त्यावर फक्त मालगाड्या धावणार आहेत. यासंदर्भातील वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. रेल्वेने माल वाहतूक करणे रस्त्याच्या तुलनेत नक्कीच स्वस्त आहे. कारण ती डिझेलऐवजी विजेवर चालते तसेच ट्रकच्या तुलनेत मालगाडी एका वेळी जास्त मालाची वाहतूक करू शकते.