|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.48° C

कमाल तापमान : 31.49° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 72 %

वायू वेग : 3.23 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.49° C

Weather Forecast for
Monday, 20 May

28.89°C - 31.99°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.95°C - 32.13°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.77°C - 30.78°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 23 May

29.01°C - 30.43°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.45°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.89°C - 30.42°C

light rain

किरण बेदी, केजरीवाल यांचे अर्ज दाखल

किरण बेदी, केजरीवाल यांचे अर्ज दाखल=हजारावर अर्ज दाखल= नवी दिल्ली, [२१ जानेवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज बुधवारी शेवटच्या दिवशी भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि कॉंग्रेस नेते अजय माकन यांच्यासह ५०० पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले. यामुळे ७० सदस्यीय दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार्‍यांची संख्या एक हजारावर गेली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने सर्वच पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी बुधवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शेवटच्या दिवशी अर्ज भरणार्‍या उमेदवारांमध्ये...21 Jan 2015 / No Comment /

भाजपाच्या यादीत २६ विद्यमान आमदार

भाजपाच्या यादीत २६ विद्यमान आमदार=२० तरुण चेहर्‍यांना संधी= नवी दिल्ली, [२० जानेवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याला दोन दिवसांचा अवधी उरला असताना भाजपाने आपल्या ६२ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. भाजपाने आपल्या यादीत २० तरुण चेहर्‍यांना संधी दिली आहे, तसेच २६ विद्यमान आमदारांवर पुन्हा विश्‍वास टाकला आहे. आम आदमी पार्टीने सर्वात आधी आपले उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर कॉंग्रेसचे उमेदवार जाहीर झाले. भाजपाने आपल्या उमेदवारांची नावाची घोषणा सर्वांत शेवटी केली. आता फक्त भाजपाच्या...21 Jan 2015 / No Comment /

किरण बेदी आज अर्ज भरणार

किरण बेदी आज अर्ज भरणारनवी दिल्ली, [२० जानेवारी] – भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी उद्या बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीकरिता पूर्व दिल्लीतील कृष्णा नगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज सादर करण्यापूर्वी किरण बेदी भव्य रोड शो आयोजित करणार आहेत. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. सकाळी बेदी यांचा रोड शो होईल. त्यानंतर त्या निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयात जाऊन आपला अर्ज भरतील, अशी माहिती सूत्राने दिली. दरम्यान, आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल...21 Jan 2015 / No Comment /

किरण बेदी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार

किरण बेदी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार=अमित शाह यांनी केली घोषणा= नवी दिल्ली, [१९ जानेवारी] – दिल्ली विधानसभेची निवडणूक भारतातील पहिल्या महिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या नेतृत्वात लढविण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने सोमवारी रात्री घेतला. भाजपा संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी एका पत्रपरिषदेत ही घोषणा केली. किरण बेदी याच भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. बेदी यांच्या नेतृत्वात भाजपाला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्‍वासही शाह...20 Jan 2015 / No Comment /

शाजिया इल्मी झाल्या भाजपावासी

शाजिया इल्मी झाल्या भाजपावासी=किरण बेदींचे प्रदेश कार्यालयात जंगी स्वागत= नवी दिल्ली, [१६ जानेवारी] – माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या पाठोपाठ आम आदमी पार्टीच्या माजी नेत्या शाजिया इल्मी यांनीही आज शुक्रवारी भाजपात प्रवेश केला. यामुळे आपमध्ये अस्वस्थता पसरली आहे तर, दुसरीकडे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. शाजिया इल्मी यांनी शुक्रवारी दुपारी प्रदेश भाजपा कार्यालयात भाजपाचे दिल्ली प्रभारी खा. प्रभात झा आणि प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...17 Jan 2015 / No Comment /

केजरीवालांविरुद्ध लढण्यास तयार

केजरीवालांविरुद्ध लढण्यास तयार=आपचे राजकारण नकारात्मक : किरण बेदी यांची भूमिका= नवी दिल्ली, [१६ जानेवारी] – पक्षाने आदेश दिला तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात लढण्यास आपण तयार आहोत, अशी भूमिका भाजपा नेत्या आणि भारतीय पोलिस सेवेतील पहिल्या महिला अधिकारी किरण बेदी यांनी आज शुक्रवारी स्पष्ट केली. केजरीवाल यांचे राजकारण नकारात्मक स्वरूपाचे आहे, असा आरोप त्यांनी केला. राजकारणात आपण कधीच जाणार नाही, अशी माझी भूमिका कधीच नव्हती. याबाबत...17 Jan 2015 / No Comment /

बसपा सर्व जागा लढविणार : मायावती

बसपा सर्व जागा लढविणार : मायावती=दिल्ली विधानसभा निवडणूक= लखनौ, [१५ जानेवारी] – बहुजन समाज पक्ष आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्व ७० जागा लढणार असल्याची घोषणा पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली असून, निवडणुकीच्या प्रचारालाही प्रारंभ केला आहे. बसपा या निवडणुकीत सर्व ७० जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे आणि गुरुवारपासूनच पक्षाचा प्रचारही सुरू झाला आहे, असे मायावती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मायावती यांनी गुरुवारी आपला ५९ वा वाढदिवस जनकल्याण दिन म्हणून साजरा केला. लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे...16 Jan 2015 / No Comment /

दिल्ली कॉंग्रेसमध्ये गटबाजी उफाळली

दिल्ली कॉंग्रेसमध्ये गटबाजी उफाळली=शीला दीक्षित-अजय माकन यांच्यात जुंपली= नवी दिल्ली, [१४ जानेवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच कॉंग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजी उफाळून आली असून, ज्येष्ठ नेत्या व माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि कॉंग्रेस सरचिटणीस व विधानसभा निवडणुकीसाठी गठित प्रचार समितीचे प्रमुख अजय माकन यांनी एकमेकांवर जाहीरपणे आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत.त्यामुळे गेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत तिसर्‍या स्थानावर राहिलेल्या कॉंग्रेसचे या निवडणुकीतील भवितव्यही आणखी अंध:कारमय होण्याची शक्यता बळावली आहे. कधीकाळी सोनिया गांधी यांच्या निकटवर्ती...15 Jan 2015 / No Comment /

दिल्ली विधानसभा निवडणूक ७ फेब्रुवारीला

दिल्ली विधानसभा निवडणूक ७ फेब्रुवारीला=निवडणुकीचा शंखनाद, मतमोजणी १० फेब्रुवारीला= नवी दिल्ली, [१२ जानेवारी] – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेची निवडणूक ७ फेब्रुवारीला तर मतमोजणी १० फेब्रुवारीला होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी आज येथे एका पत्रपरिषदेत केली. निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे ऐन थंडीच्या दिवसात राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. ७० सदस्यीय दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची अधिसूचना संक्रातीच्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला जारी केली जाणार आहे. २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज...13 Jan 2015 / No Comment /

संक्रातीला उडणार मोदी-ओबामा पतंग

संक्रातीला उडणार मोदी-ओबामा पतंगबडोदा, [१२ जानेवारी] – येत्या प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे स्वागत करण्यासाठी भारत देश सज्ज झाला असतानाच, अवघ्या दोन दिवसांवर असलेल्या मकरसंक्रातीनिमित्त आकाशात झेपावण्यासाठी मोदी आणि ओबामा पतंगही सज्ज झाले आहेत. प्रामुख्याने गुजरातच्या बडोदा, सूरत, भरूच, राजकोट, अहमदाबाद आणि राज्यातील अन्य शहरांमधील बाजारपेठा मोदी आणि ओबामांचे छायाचित्र असलेल्या पतंगांनीच सजल्या आहेत. या दोन्ही पतंगांना गुजरातमध्ये प्रचंड मागणी होत आहे, अशी माहिती बडोदा पतंग विक्री आणि मालकी...13 Jan 2015 / No Comment /

‘त्यांना’ धरणे, निदर्शनेच करू द्या : मोदी

‘त्यांना’ धरणे, निदर्शनेच करू द्या : मोदी=२४ तास वीज, प्रत्येक झोपडपट्टीधारकाला पक्क्या घराचे आश्‍वासन= नवी दिल्ली, [१० जानेवारी] – दिल्लीत २४ तास वीज आणि २०२२ पर्यंत प्रत्येक झोपडपट्टीधारकाला पक्के घर देण्याची घोषणा करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत स्थिर, सक्षम आणि बहुमताचे सरकार निवडून देण्याचे आवाहन दिल्लीवासीयांना केले. रामलीला मैदानावर आयोजित विराट सभेत पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. आपल्या भाषणात केजरीवाल यांच्यावर टीका करताना त्यांना धरणे, निदर्शनेच करू द्या, असा...11 Jan 2015 / No Comment /

वढेरांची जमीन ताब्यात घेण्याचे आदेश

वढेरांची जमीन ताब्यात घेण्याचे आदेशरॉबर्ट वढेरांना झटका राजस्थान सरकारची कणखर भूमिका बिकानेर, [४ जानेवारी] – एका पैशाचीही गुंतवणूक न करता जमीन खरेदी करणारे आणि नंतर त्याच जमिनीच्या विक्रीतून कोट्यवधी रुपये कमविणारे कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा चांगलेच अडचणीत आले आहेत. वढेरा यांच्या कंपनीसोबत झालेले सर्वच व्यवहार रद्द करून जमिनी ताब्यात घेण्याचे आदेश राजस्थानमधील भाजपा सरकारने दिले आहेत. बिकानेरच्या कोलायत विभागातील ३६० हेक्टर जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातील...5 Jan 2015 / No Comment /