|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.12° C

कमाल तापमान : 29.7° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 72 %

वायू वेग : 4.49 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.7° C

Weather Forecast for
Saturday, 11 May

27.75°C - 29.99°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.53°C - 30.88°C

light rain
Weather Forecast for
Monday, 13 May

28.53°C - 29.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Tuesday, 14 May

28.42°C - 31.01°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

28.56°C - 30.95°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 16 May

28.27°C - 30.81°C

light rain

‘त्या’ १६० जागांसाठी भाजपाचा मास्टर प्लान

‘त्या’ १६० जागांसाठी भाजपाचा मास्टर प्लान-४५ मतदारसंघांमध्ये पंतप्रधान मोदी यांची रॅली, नवी दिल्ली, (१० मार्च) – आगामी लोकसभा निवडणुकीला अद्याप १४ महिने शिल्लक असतानाही अन्य पक्षांच्या तुलनेत भारतीय जनता पार्टीने अप्रत्यक्ष रीत्या प्रचार सुरू केला आहे. यात मागील वेळी विजयापासून निसटलेल्या १६० लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन केले आहे. सूत्रांनुसार, मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाला १६० मतदारसंघांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. आता पक्षाकडून या सर्व जागांवर विजय मिळविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष...10 Mar 2023 / No Comment /

टिकैत यांच्या कुटुंबाला बॉम्बने उडवण्याची धमकी

टिकैत यांच्या कुटुंबाला बॉम्बने उडवण्याची धमकीनवी दिल्ली, (९ मार्च) – भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आणि त्यांच्या कुटुंबीयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिस याप्रकरणी तपास करत आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत यांचा मुलगा गौरव टिकैत यांच्या मोबाईलवर धमकीचे हे फोन आले. सुरुवातीला कोणाचा तरी खोडसाळपणा असेल असे समजून मी त्याकडे दुर्लक्ष केले, पण धमकी देणार्या फोनची संख्या वाढल्यामुळे मी पोलिसात तक्रार दाखल केली, असे...9 Mar 2023 / No Comment /

विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी यंत्रणांचा दुरुपयोग

विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी यंत्रणांचा दुरुपयोग– आठ विरोधी पक्षांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र, नवी दिल्ली, (५ मार्च) – विरोधी पक्षांच्या नेत्यांचा आवाज दडपण्यासाठी केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप आठ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या एका पत्रातून केला आहे. या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारुक अब्दुल्ला, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे चंद्रशेखर...5 Mar 2023 / No Comment /

काँग्रेस आमदारांच्या संख्येत झपाट्याने घसरण

काँग्रेस आमदारांच्या संख्येत झपाट्याने घसरण– ९८९ वरून ६५८वर आली संख्या, नवी दिल्ली, (३ मार्च) – देशाच्या अनेक राज्यांतून काँग्रेसचा प्रभाव कमी होत असताना, या पक्षाच्या आमदारांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश अशा तीन राज्यांत आता काँग्रेसची सरकारे आहेत. ईशान्य भारतातील तीन राज्यांत नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यात नागालॅण्डमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. त्रिपुरात फक्त तीन तर मेघालयात काँग्रेसचे पाच आमदार विजयी झाले. २०१८ मध्ये मेघालयात काँग्रेसचे २१ आमदार...4 Mar 2023 / No Comment /

शाह यांचा आज कर्नाटक दौरा

शाह यांचा आज कर्नाटक दौरानवी दिल्ली, (३ मार्च) – २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. निवडणूक आयोग लवकरच मतदानाच्या तारखा जाहीर करणार आहे. त्याचबरोबर याआधी सर्वच राजकीय पक्षांचे नेते संपर्क साधण्यात गुंतले आहेत. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. यादरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शाह राज्यातील दोन विजय संकल्प रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय अनेक महत्त्वाच्या योजनाही ते सुरू करणार आहेत. गृहमंत्री अमित शहा...4 Mar 2023 / No Comment /

नागालॅण्डमध्ये आठवले गटाचा रालोआला पाठिंबा

नागालॅण्डमध्ये आठवले गटाचा रालोआला पाठिंबानवी दिल्ली, (३ मार्च) – नागालॅण्ड विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे दोन उमेदवार विजयी झाले. आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत असल्यामुळे आम्ही सरकार स्थापण्यासाठी भाजपा आघाडीला पाठिंबा देऊ आणि सरकारमध्येही सामील होऊ, असे रामदास आठवले यांनी सांगितले. नागालॅण्डच्या नोकसेन विधानसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे वाई लिमा ओनन चंग तसेच तुएसांग विधानसभा मतदारसंघातून इम्तिचोबा विजयी झाले. राज्यातील अन्य तीन मतदारसंघात आठवले गटाचे उमेदवार दुसर्या...4 Mar 2023 / No Comment /

ईशान्येतील चांगल्या कामगिरीचा भाजपला अभिमान: रिजिजू

ईशान्येतील चांगल्या कामगिरीचा भाजपला अभिमान: रिजिजूनवी दिल्ली, (२ मार्च) – त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकीत त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपचे पुनरागमन झाले आहे. मात्र, मेघालयातील परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्रिपुरातील बहुतांश जागांवर भाजप आघाडीवर आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, या प्रदेशात शांतता आणि विकास आणण्यासाठी केंद्राने किती जवळून आणि प्रामाणिकपणे काम केले आहे, हे तेथील जनतेने प्रत्यक्ष पाहिले आहे, मग ते मोठे प्रकल्प असोत, महामार्ग बांधणे किंवा पिण्याचे पाणी, मोफत रेशन आणि...2 Mar 2023 / No Comment /

भारत जोडो यात्रेमुळे नव्या काँग्रेसचा युगारंभ : खरगे

भारत जोडो यात्रेमुळे नव्या काँग्रेसचा युगारंभ : खरगेकार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप, रायपूर, (२६ फेब्रुवारी ) – काँग्रेस पक्ष अनेक आव्हानांचा सामना करीत आहे. यावर मात करणे शक्य आहे. यासाठी आवश्यकता आहे पक्षात एकता, शिस्त आणि निर्धाराची. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे नव्या काँग्रेसचा युगारंभ झाला आहे, असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी येथे केले. नवा रायपूर येथे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीचा आज समारोप झाला. यावेळी समारोपीय भाषणात खरगे बोलत होते....26 Feb 2023 / No Comment /

मी कधीही राजकारणातून निवृत्ती घेणार नाही: सोनिया

मी कधीही राजकारणातून निवृत्ती घेणार नाही: सोनियानवी दिल्ली, (२६ फेब्रुवारी ) – गेल्या काही दिवसपासून बातम्या समोर येत होत्या की, सोनिया गांधी राजकारणातून निवृत्ती घेणार आहेत. मात्र , काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्तीचे वृत्त फेटाळून लावले आहे. त्या म्हणाल्या मी कधीच निवृत्त झाली नव्हती आणि कधीच होणार नाही. सोनिया गांधींचे हे विधान आले आहे कारण त्यांच्या रायपूरमधील भावनिक भाषणानंतर सोनिया आता राजकारणातून निवृत्त होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. या अटकळांना पूर्णविराम...26 Feb 2023 / No Comment /

नितीश कुमार यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद: अमित शहा

नितीश कुमार यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद: अमित शहानवी दिल्ली, (२५ फेब्रुवारी ) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारमधील पश्चिम चंपारणमधील लॉरिया येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अमित शहा म्हणाले की, बिहारमध्ये आज जंगलराज सुरू आहे. नितीशकुमार विकासवादीतून संधीसाधू झाले. तसेच नितीश पंतप्रधान होण्याच्या इच्छेने बदलले आहेत, असेही ते म्हणाले. गृहमंत्री म्हणाले, दर तीन वर्षांनी नितीश पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहतात. बिहारमधील पक्षांतर करणार्‍यांना शांत करावे लागेल. तसेच नितीश यांच्यासाठी...25 Feb 2023 / No Comment /

माझी ‘इनिंग’ संपली; सोनिया गांधींनी दिले निवृत्तीचे संकेत

माझी ‘इनिंग’ संपली; सोनिया गांधींनी दिले निवृत्तीचे संकेत– भारत जोडो यात्रा माझा शेवटचा टप्पा, रायपूर, (२५ फेब्रुवारी ) – येथे सुरू असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. भारत जोडो यात्रा माझ्यासाठी शेवटचा टप्पा होता. या यात्रेमुळे देशातील जनता पुन्हा एकदा काँग्रेसच्या जवळ आली, त्यांच्यामुळे माझा पक्ष जिवंत झाला, असे सोनिया गांधी यांनी या बैठकीत नमूद केले. यावेळी त्यांनी भाजपावर हल्ला चढविला. भाजपा सरकार घटनात्मक मूल्य पायदळी...25 Feb 2023 / No Comment /

काँग्रेसने कार्यकारिणीच्या नियमात केले मोठे बदल

काँग्रेसने कार्यकारिणीच्या नियमात केले मोठे बदल-आता २५ ऐवजी ३५ सदस्य असणार, नवी दिल्ली, (२५ फेब्रुवारी ) – काँग्रेस पक्षाने आपल्या घटनेत बदल करून पक्षाच्या कार्यकारिणीच्या स्थायी सदस्यांची संख्या ३५ पर्यंत वाढवली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये सुरू असलेल्या पक्षाच्या ८५व्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी स्थायी सदस्यांची संख्या २५ होती. संघटनेच्या सर्व पदांवर अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाच्या ८५ व्या काँग्रेसमध्ये ८५ किरकोळ आणि मोठ्या...25 Feb 2023 / No Comment /