Posted by वृत्तभारती
Saturday, December 20th, 2014
लामजना, [१९ डिसेंबर] – लातूर – उस्मानाबाद जिल्हयांतील सीमेवरील किल्लारीसह लामजना, खरोसा, मंगरूळ, गुबाळ,लिंबाळा बाणेगावसह परिसरातील अनेक गावांना गुरूवारी रात्री ९.४२ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. भूकंपाच्या भीतीने आणि घरातील भांडयांच्या आवाजामुळे घरांतील लोक रस्त्यावर धावत आले,सर्वत्र धावपळ सुरू झाली. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाक्षी संपर्क साधला असता, भूकंप मापक यंत्रावर नोंद झाली नसल्यामुळे हा भूकंप नसून गूढ आवाज असल्याचे उपजिल्हाधिकारी सुनील यादव यांनी सांगितले. दरम्यान, उमरगा तालुक्यातील अनेक...
20 Dec 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 12th, 2014
=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती= परळी, [१२ डिसेंबर] – दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त पांगरी येथील बैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात गोपीनाथगड स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी ३ वाजता होणार आहे. के्रंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे समाधिस्थळ परळी तालुक्यातील पांगरी येथील बैद्यनाथ सहकारी साखर परिसरात आहे. याचठिकाणी गोपीनाथगड स्मारक उभारले जाणार आहे. यावेळी भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री महाराज व राष्ट्रसंत भय्यू महाराज...
12 Dec 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 21st, 2014
=मुलींनी राखला वडिलांचा गड= मुंबई, [१९ ऑक्टोबर] – दिवंगत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या दोन्ही कन्यांनी आपल्या वडिलांचा अनुक्रमे बीड आणि परळी हा गड यशस्वीपणे कायम राखला आहे. विशेषत: प्रीतम मुंडे यांनी तर बीड लोकसभेची जागा विक्रमी ६.९२ लाखांच्या फरकाने जिंकली आहे. पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभेची जागा आणि प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभेची जागा लढविली. पंकजा यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात उभा असलेला आपला चुलत भाऊ...
21 Oct 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, October 15th, 2014
परभणी, [१४ ऑक्टोबर] – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास उरलेले असतानाच, परभणी मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार ऍड. विनोद दुधगांवकर यांनी सोमवारी संध्याकाळी अचानक शिवसेनेच्या उमेदवाराला आपले समर्थन जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सेना-मनसेतील मतविभाजनाचा फायदा ओवैसीच्या मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन म्हणजे एमआयएमच्या उमेदवाराला होऊ नये, म्हणूनच हा निर्णय घेतल्याचे मनसे उमेदवाराने स्पष्ट केले आहे. मनसेचे परभणीचे उमेदवार विनोद दुधगावकर शिवसेना कार्यालयात पोहोचताच सर्वजण अवाक् झाले. आपण शिवसेना उमेदवार डॉ....
15 Oct 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, October 13th, 2014
लातूर, उदगीर, [१२ ऑक्टोबर] – नरेंद्र मोदी यांनी क्षुद्र राजकारणाला मूठमाती देऊन विकासाच्या राजकारणाची देशात सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील जातीपातीचे राजकारण संपवून विकासाचे राजकारण सुरू करण्यासाठी भाजपाला साथ द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.लातूर येथे भाजपा उमेदवार शैलेश लाहोटी व उदगीर येथे भाजपा उमेदवार सुधाकर भालेराव यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर उमेदवार आ. सुधाकर भालेराव, जिल्हाध्यक्ष प्रा. नागनाथ निडवदे, खा. सुनील गायकवाड, रूपाताई पाटील...
13 Oct 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, September 16th, 2014
=मुलाखती अर्धवट सोडून परतले हॉटेलात= औरंगाबाद, [१५ सप्टेंबर] – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज दुपारी अस्वस्थ वाटू लागले. यामुळे मुलाखती थांबवून राज ठाकरे विश्रांतीसाठी हॉटेलात निघून गेले. यामुळे आज आणि उद्याच्या मुलाखती होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. मराठवड्यातील विधानसभेच्या ४६ जागांसाठी आज राज ठाकरे इच्छूकांच्या मुलाखती घेत होते. जालना रोडवरील सागर लॉन येथे सकाळी ९ वाजतापासून मुलाखतींना...
16 Sep 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, August 11th, 2014
औरंगाबाद, [१० ऑगस्ट] – न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्यातील १८ हजार अंशकालीन शिक्षकांना सेवेत कायम करुन घेण्याऐवजी टोलवा टोलवी करणारे राज्यसरकार या आदेशाचे पालन करीत नाहीत, युतीची सत्ता येताच तुम्हाला कायम करु अशी ग्वाही विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून उपोषणास बसलेल्या राज्य अंशकालीन शिक्षकांना रविवारी दिली. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात असलेल्या कार्यक्रमानिमित्त विनोद तावडे हे शहरात आले होते. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गेल्या सात...
11 Aug 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, June 3rd, 2014
परळी वैजनाथ, [३ जून] – गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच, मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथजवळ असलेले नाथ्रा हे त्यांचे गाव दु:खाच्या सागरात बुडाले. आपला लाडका नेता आता आपल्याला कधीच दिसणार नाही, या विचारानेच गावातील प्रत्येक व्यक्ती हळहळली होती. मुंडे यांच्या निधनाचे वृत्त वार्यासारखे पसरले. आणि लोक समुहा-समुहाने रस्त्यावर येत होते. या वृत्तावर नाथ्रा आणि परळी वैजनाथमधील कुणाचाही विश्वास बसत नव्हता. पण, अखेर वास्तव त्यांना स्वीकारावे लागले. प्रत्येकाच्याच घरातील...
3 Jun 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, June 3rd, 2014
औरंगाबाद, [३ जून] – महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात भाजपाची पाळेमुळे मजबूत करणारे आणि लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर महाराष्ट्राचा गड सर करण्याचा जणू निर्धारच व्यक्त करणारे भाजपाचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे आज सकाळी अचानक झालेले निधन महाराष्ट्राला आणि समाजमनाला धक्का देऊन गेले आहे. भाजपाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात रुजवणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. प्रमोद महाजन हे युतीचे, तर मुंडे महायुतीचे शिल्पकार आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना एक आठवड्यापूर्वीच केंद्र सरकारमध्ये ग्रामीण...
3 Jun 2014 / No Comment / Read More »