किमान तापमान : 27.78° से.
कमाल तापमान : 27.92° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 3.82 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.92° से.
27.65°से. - 30.4°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशगांधीनगर, (०६ फेब्रुवारी) – अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारा ठराव अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुजरातच्या विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. हे ऐतिहासिक सांस्कृतिक कर्तव्य हजारो वर्षे स्मरणात राहील, यासाठी नरेंद्र मोदींचे आभार मानण्यात आले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सादर केलेल्या या प्रस्तावाला भाजपासोबतच काँग्रेस आणि आपच्या आमदारांनीही पाठिंबा दिला.
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८९ मध्ये अयोध्येत जिथे मंदिर उभारले, त्या ठिकाणी पायाभरणीसाठी परवानगी दिली होती, असे या प्रस्तावाला पाठिंबा देताना काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी सांगितले. आपचे आमदार उमेश मकवाना यांनीही भाजपाच्या या निर्णयाचे समर्थन केले आणि सांगितले की, मंदिराच्या परिसरात एक रुग्णालय आणि एक महाविद्यालय बांधले जावे.
या ऐतिहासिक ठरावाबद्दल मला आनंद आणि अभिमान वाटत आहे, असे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे अशा कार्यक्रमाची ५०० वर्षे प्रतीक्षा करणारे हिंदू भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा पाहू शकले, असे पटेल यांनी सांगितले. २२ जानेवारी रोजी गुजरातचे सुपुत्र आणि या सभागृहाचे माजी नेते नरेंद्र मोदी यांनी रामललाची प्राणप्रतिष्ठा केली, तेव्हा गुजरातचे लोक भावुक झाले. हा क्षण गुजरातसाठी अभिमान आणि सन्मानाचा होता. नरेंद्र मोदी हे लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेचे सारथी देखील होते, असे पटेल यांनी भाषणात सांगितले.