|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

गुलमर्गमध्ये खेलो इंडिया हिवाळी खेळांचे उद्घाटन!

गुलमर्गमध्ये खेलो इंडिया हिवाळी खेळांचे उद्घाटन!श्रीनगर, (१० फेब्रुवारी ) – खेलो इंडिया हिवाळी खेळ २०२३ ची सुरुवात शुक्रवारी जगप्रसिद्ध स्की रिसॉर्ट गुलमर्ग येथे झाली. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. खेलो इंडिया हिवाळी खेळ १४ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहेत. यामध्ये देशातील २९ राज्यातील १५०० खेळाडू सहभागी होत आहेत. देशभरातील खेळाडूही पूर्ण उत्साहात कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. खेळात तरुणांचा सक्रिय सहभाग असतो....10 Feb 2023 / No Comment / Read More »

काश्मीर प्रशासनाने केली माजी राज्यमंत्र्यांसह अनेकांची अतिक्रमण जमीनदोस्त !

काश्मीर प्रशासनाने केली माजी राज्यमंत्र्यांसह अनेकांची अतिक्रमण जमीनदोस्त !श्रीनगर, (६ फेब्रुवारी ) – जम्मू-काश्मीरमधील प्रशासनाने काश्मीरमधील सरकारी जमिनींवर अतिक्रमण करणार्‍यांची दुसरी यादी जाहीर केली असून, ती आश्चर्यकारक आहे. या यादीनुसार, श्रीनगरमध्ये केवळ माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांचे नाव नाही, तर जम्मू-काश्मीर बँकेच्या अनेक शाखा आणि श्रीनगरची संपूर्ण रेडिओ कॉलनीही सरकारी ताब्यात असलेल्या जमिनीवर स्थापन करण्यात आली आहे. या यादीनुसार सोनमर्ग आणि गगनगीर भागातील २८ हॉटेल्सही अशाच जमिनीवर बांधण्यात आली आहेत. पोलिसांनी सोमवारी सांगितले की, गेल्या आठवड्यात येथे...6 Feb 2023 / No Comment / Read More »

तोयबाचा कमांडर पर्रेसह दोन अतिरेक्यांचा खात्मा

तोयबाचा कमांडर पर्रेसह दोन अतिरेक्यांचा खात्मापाकिस्तानी हमजाचा समावेश, श्रीनगर, ३ जानेवारी – श्रीनगरमधील शालिमार परिसरात आज सोमवारी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर सलिम पर्रेसह दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. यात पाकिस्तानातील एका वरिष्ठ अतिरेक्याचाही समावेश आहे. चकमकीत ठार झालेल्या दुसर्‍या अतिरेक्याचे नाव हाफिज उर्फ हमजा असून, बांदिपुरा येथे त्याने केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले होते, अशी माहिती काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी दिली. बांदिपुरात अतिरेकी हल्ला केल्यानंतर पळ काढून तो श्रीनगर येथे आला...4 Jan 2022 / No Comment / Read More »

अनंतनागमध्ये ठार झालेला ‘तो’ अतिरेकी समीर दार?

अनंतनागमध्ये ठार झालेला ‘तो’ अतिरेकी समीर दार?पुलवामा हल्ल्याचा होता सूत्रधार, श्रीनगर, १ जानेवारी – अनंतनागमधील चकमकीत सुरक्षा दलाने ठार केलेल्या तीन अतिरेक्यांपैकी एका अतिरेक्याचे छायाचित्र २०१९ मध्ये पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भीषण हल्ल्याचा सूत्रधार समीर दारसोबत जुळले आहे. त्यामुळे या अतिरेक्याच्या मृतदेहाची डीएनए चाचणी केली जाणार असल्याची माहिती काश्मीरचे महानिरीक्षक विजयकुमार यांनी आज शनिवारी दिली. अनंतनाग येथे ३० डिसेंबर रोजी ठार करण्यात आलेल्या तीनपैकी एका अतिरेक्याचे छायाचित्र समीर दारसोबत जुळत आहे. समीर पुलवामा आणि लेथपुरा हल्ल्यातील...2 Jan 2022 / No Comment / Read More »

बसवरील दहशतवादी हल्ला सुनियोजित

बसवरील दहशतवादी हल्ला सुनियोजितविजयकुमार यांची माहिती, श्रीनगर, १४ डिसेंबर – जम्मू-काश्मीर सशस्त्र पोलिस दलाच्या बसवर झालेला दहशतवादी हल्ला सुनियोजित होता. नियमित कर्तव्य पार पाडून तळावर परतत असताना झालेल्या या हल्ल्यात पोलिसांचे तीन जवान हुतात्मा झाले आहेत, अशी माहिती काश्मीरचे पोलिस महासंचालक विजयकुमार यांनी आज मंगळवारी दिली. २५ पोलिस कर्मचार्‍यांना घेऊन ही बस नेहमीप्रमाणे तळावर परतत होती. या वेळी जैश-ए-मोहदम्मदच्या तीन अतिरेक्यांनी बसवर गोळीबार केला. हा एक सुनियोजित हल्ला होता. जवानांची ड्युटी संपल्यावर त्यांना...14 Dec 2021 / No Comment / Read More »

पाकिस्तानच्या विजयानंतर ‘आझादी’चे नारे देणार्‍यांना बदडले

पाकिस्तानच्या विजयानंतर ‘आझादी’चे नारे देणार्‍यांना बदडलेपंजाबच्या दोन शैक्षणिक संस्थांमधील घटना, पाकिस्तानी विजयाच्या जल्लोषावर लोक नाराज का? : मेहबुबा मुफ्ती, चंदीगड, २५ ऑक्टोबर – टी-२० क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात रविवारी पाकिस्तानने विजय मिळवल्यानंतर जल्लोष करीत काश्मीरच्या ‘आझादी’चे नारे देणार्‍या काश्मिरी विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी बदडले आहे. पंजाबच्या संगरूर आणि खरार मोहाली येथील संस्थांमध्ये ही घटना घडली आहे. संगरूर येथील भाई गुरुदास इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी येथील मारहाणीची चित्रफीत समाजमाध्यमावर सामायिक करण्यात आली. क्रिकेट सामना...25 Oct 2021 / No Comment / Read More »

पाकिस्तानपेक्षा काश्मिरींशी चर्चा करू

पाकिस्तानपेक्षा काश्मिरींशी चर्चा करूअमित शाह यांची ठोस भूमिका, श्रीनगर, २५ ऑक्टोबर – कलम ३७० निष्प्रभ करण्यात आल्यापासून आम्हाला टोमणे मारले गेले, अनेकांनी शाप दिला. भारत सरकारने पाकिस्तानशी चर्चा करावी, असा सल्ला देण्यात आला. चर्चा करायचीच असेल, तर आम्ही आमच्या काश्मिरी जनतेशी करू, पाकिस्तानशी नाही, अशी ठाम भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सोमवारी घेतली. जम्मू-काश्मीर दौर्‍याच्या तिसर्‍या आणि शेवटच्या दिवशी अमित शाह यांनी सोमवारी श्रीनगरमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. जम्मू-काश्मीरमध्ये विकासाचे नवे...25 Oct 2021 / No Comment / Read More »

जम्मूतील अन्यायाचे युग संपले : अमित शाह

जम्मूतील अन्यायाचे युग संपले : अमित शाहजम्मू, २४ ऑक्टोबर – कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतर प्रथमच जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावर असलेले केंद्रीय अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हृदयात असल्याचे आज रविवारी सांगितले. जम्मूतील अन्यायाचे युग संपले असल्याचे त्यांनी भगवतीनगर परिसरात नागरिकांशी संवाद साधताना सांगितले. अमित शाह यांच्या सभेसाठी जम्मूतील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. नागरिकांनी टाळ्यांच्या कडकटात त्यांचे स्वागत केले. जम्मूतील नागरिकांकडे दुर्लक्ष करण्याचे दिवस आता संपले आहेत. जम्मू आणि काश्मीरचा आता बरोबरीने विकास होईल, असे शाह यांनी...25 Oct 2021 / No Comment / Read More »

गैरकाश्मिरी स्थलांतरित मजूर परतीच्या वाटेवर

गैरकाश्मिरी स्थलांतरित मजूर परतीच्या वाटेवरप्रचंड दहशत, पुन्हा न परतण्याची घेतली शपथ, जम्मू, १८ ऑक्टोबर – जम्मू-काश्मीरमध्ये लक्ष्यीत हत्येच्या घटना वाढल्या आहेत. काश्मीरच्या कुलगाममध्ये सलग दुसर्‍या दिवशी दहशतवाद्यांनी गैर-काश्मिरी मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली. यात दोन मजूर ठार झाले तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. जीव वाचवण्यासाठी गैर-काश्मिर मजूर स्थलांतर करीत आहेत. आपल्या राज्यात परतणार्‍या मजुरांची जम्मू रेल्वे स्थानकावर गर्दी झाली आहे. अनेकांनी तर काश्मिरात पुन्हा कधीच न येण्याची शपथ घेतली आहे. या महिन्यात...18 Oct 2021 / No Comment / Read More »

काश्मीरच्या ६० टक्के भागात पसरलेय् अतिरेक्यांचे जाळे

काश्मीरच्या ६० टक्के भागात पसरलेय् अतिरेक्यांचे जाळेसुरक्षा दलांपुढे मोठे आव्हान, नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांसाठी काम करणार्‍या सक्रिय अतिरेक्यांचे जाळे सुरक्षा दलांसाठी मोठे आव्हान बनले आहे. दहशतवाद्यांनी काश्मीरमधील अल्पसंख्याकांना लक्ष्य केल्यानंतर दहशतवाद्यांचे हे शेकडो मदतनीस पकडले गेले आहेत. मात्र, त्यांचे जाळे काश्मीरच्या सुमारे ६० टक्के भागात पसरलेले आहे. अशा भूमीगत अतिरेक्यांची संख्या सात हजारांहून अधिक आहे. हे भूमीगत सदस्य केवळ अतिरेक्यांना माहिती पुरवण्याचेच काम करीत नाही, तर त्यांचे संदेश एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी...12 Oct 2021 / No Comment / Read More »

उरीमध्ये ३ पाकिस्तानी दहशतवादी ठार

उरीमध्ये ३ पाकिस्तानी दहशतवादी ठार५ एके-४७, ८ पिस्तुले, ७० ग्रेनेड जप्त, भारतीय लष्कराची दणकेबाज कारवाई, पाच दिवस चालली शोध मोहीम, श्रीनगर, २३ सप्टेंबर – जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये १८ सप्टेंबरपासून सुरू झालेली भारतीय लष्कराची शोधमोहीम आज संपुष्टात आली. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या मोठ्या शोधमोहिमेत लष्कराला मोठे यश मिळाले आहे. लष्कराने तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले आहे. एवढेच नव्हे, तर या शोध मोहिमेत लष्कराने मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली आहेत. भारतीय लष्कराशी संबंधित अधिकार्‍यांनी...23 Sep 2021 / No Comment / Read More »

दहशतवाद्यांशी संबंध; सहा कर्मचारी बरखास्त

दहशतवाद्यांशी संबंध; सहा कर्मचारी बरखास्तजम्मू-काश्मीर प्रशासनाची कारवाई, जम्मू, २२ सप्टेंबर – दहशतवाद्यांसोबत संबंध असलेल्या सहा कर्मचार्‍यांना बरखास्त करण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर प्रशासनाने घेतला आहे. या सहा कर्मचार्‍यांवर दहशतवाद्यांशी, तसेच त्यांच्या हस्तकांसोबत काम करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. बरखास्तीची कारवाई करण्यात आलेल्या सहा जणांत अनंतनागमधील शिक्षक हमीद वाणीचाही समावेश आहे. सरकारी नोकरीत दाखल होण्यापूर्वी हमीद दहशतवादी संघटना ‘अल्लाह टायगर’चा जिल्हा कमांडर म्हणून कार्यरत होता, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. जमात-ए-इस्लामीच्या सहकार्यामुळे त्याला ही सरकारी नोकरी मिळाली...22 Sep 2021 / No Comment / Read More »