Posted by वृत्तभारती
Sunday, December 27th, 2020
जैशच्या चौघांसह आठ अतिरेक्यांना अटक, जम्मू, २७ डिसेंबर – उत्तर काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील एक हिंदू मंदिर बॉम्बस्फोट करून उडविण्याचा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला. या प्रकरणी चार अतिरेक्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याजवळून दोन रायफली आणि सहा हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. अन्य एका घटनेत जैशच्या ४ अतिरेक्यांना अटक करण्यात आली. मंदिर उडवण्याच्या कटात अटक करण्यात आलेल्यांची नावे मुश्तफा इक्बाल आणि मूर्तझा इक्बाल अशी असून, उर्वरित दोघांची ओळख अद्याप जाहीर करण्यात...
27 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, December 26th, 2020
जम्मू, २६ डिसेंबर – लष्कर-ए-तोयबाचीच एक शाखा असलेल्या द रेसिस्टन्स फोस या गटाच्या दोन अतिरेक्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी आज शनिवारी सकाळी अटक केली. त्यांच्याजवळून दोन एके रायफल्स आणि काही स्फोटके जप्त करण्यात आली आहे. रईस अहमद दार आणि सुबझार अहमद शेख अशी या अतिरेक्यांची नावे असून, दोघेही कारने श्रीनगरकडे जात असताना, जवान आणि पोलिसांनी पाठलाग करून, नरवाल पासजवळ त्यांना बेड्या ठोकल्या, अशी माहिती पोलिस प्रवक्त्याने दिली. काही अतिरेकी कारने श्रीनगरकडे...
26 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 23rd, 2020
जम्मूत स्पष्ट बहुमतासह भाजपाचाच अध्यक्ष, श्रीनगर, २३ डिसेंबर – जम्मू-काश्मीर जिल्हा विकास परिषद निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर करण्यात आले असून, यात सात पक्षांच्या गुपकार आघाडीने बाजी मारल्याचे दिसत असले तरी, भाजपा स्वबळावर ७४ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. जिल्हा विकास परिषद निवडणुकीत भाजपाविरुद्ध सात दलांनी एकत्र येत गुपकार आघाडी स्थापन केली. यात नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, आवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट, माकप, भाकप या...
23 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 22nd, 2020
जिल्हा विकास परिषदेत जोरदार मुसंडी; ७३ जागांवर मिळविला विजय; काश्मीर खोर्यात प्रथमच जिंकल्या जागा, श्रीनगर, २२ डिसेंबर – जम्मू-काश्मीर जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत गुपकार आघाडीने सर्वाधिक ११२ जागा जिंकल्या असल्या, तरी स्वबळावर निवडणूक लढत असलेल्या भाजपाने जोरदार मुसंडी मारताना, जम्मूत सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. गुपकारवाल्यांनी काश्मीर खोर्यात मोठा विजय मिळविला असून, भाजपानेही येथे प्रथमच काही जागा जिंकल्या आहेत. आतापर्यंत जाहीर निकालांपैकी गुपकार आघाडीने ८२ जागा जिंकल्या असून,...
22 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 24th, 2020
रोशनी जमीन घोटाळेबाजांची यादी संकेतस्थळावर, जम्मू, २४ नोव्हेंबर – शेकडो कोटींच्या रोशनी जमीन घोटाळ्यातील आरोपींच्या नावांची यादी जम्मू-काश्मीर प्रशासनाने आज मंगळवारी जारी केली. मोठ्या भूखंडांवर अतिक्रमण करून फारूख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला या पिता-पुत्राने बंगले बांधले आहेत, असा स्पष्ट उल्लेख यात आहे. ही जमीन वितरित करण्यावर आम्ही निर्बंध लादले असतानाही, तिथे योजना राबवून, भूखंड ज्या लोकांना देण्यात आले, त्या सर्व लाभार्थ्यांची यादी संकेतस्थळावर टाकण्याचे निर्देश जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिल्यानंतर, प्रशासनाने...
24 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 23rd, 2020
श्रीनगर, २२ नोव्हेंबर – जम्मू-काश्मीरच्या नागरोटा परिसरात गुरुवारी जैश-ए-मोहम्मदच्या चार अतिरेक्यांचा खातमा केल्यानंतर चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नव्या माहितीनुसार, हे सर्व अतिरेकी कमांडो प्रशिक्षण घेऊन भारतात आले होते आणि सुमारे ३० किलोमीटरचे अंतर त्यांनी पायी तुडवले होते. पठाणकोट येथे २०१६ च्या हवाई हल्ल्यातील एक सूत्रधार असलेला जैश-ए-मोहम्मद कमांडर कासिम जान हा देखील या घुसखोरीच्या कटात सहभागी होता, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. दक्षिण काश्मीरमध्ये कासिमचे बरेच...
23 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 9th, 2020
जम्मू, ९ नोव्हेंबर – जम्मू-काश्मीरचे कलम ३७० पुन्हा प्राप्त केल्याशिवाय तिरंगा हातात घेणार नाही, अशी देशद्रोही भाषा वापरणार्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आता वठणीवर आल्या आहेत. तिरंग्यासोबतच मी जम्मू-काश्मीरचा झेंडाही हाती घेणार आहे. एक आमदार या नात्याने केंद्रशासित प्रदेश आणि देशाच्या सार्वभौमत्व व एकात्मतेचा सन्मान करणार आहे, असे त्यांनी आज सोमवारी सांगितले. आम्ही काश्मिरी नागरिकांनीच या देशाचा तिरंगा सदैव अबाधित राखला आहे. आमच्यापैकी अनेकांनी तिरंग्यासाठी प्राणाहुती दिली आहे, असे त्यांनी...
9 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 1st, 2019
युरोपियन युनियनच्या खासदारांची स्पष्टोक्ती, श्रीनगर, ३० ऑक्टोबर – कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे आणि युरोपियन युनियन दहशतवादाच्या मुद्यावर भारतासोबत आहे, असे युरोपियन युनियनच्या खासदारांनी आज बुधवारी येथे स्पष्ट केले. काश्मीर खोर्याच्या दोन दिवसीय दौर्यावर आलेल्या युरोपियन संसदेच्या २३ सदस्यांनी येथे पत्रकार परिषदेत संवाद साधताना, कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी मंगळवारी सायंकाळी केलेल्या परप्रांतीय मजुरांच्या हत्येचा निषेध केला. आम्ही कलम ३७० बाबत मत व्यक्त केले, तर हा निश्चितपणे भारताचा अंतर्गत मुद्दा...
1 Nov 2019 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, April 23rd, 2016
नवी दिल्ली, [२३ एप्रिल] – सूफी संत ख्वाजा साहेब यांच्या श्रीनगरमधील दर्ग्यात मुस्लीम धर्मगुरू तब्बल एक हजार तिरंगे फडकवणार आहेत. दर्ग्याचे प्रमुख बादिम पीर नसीम मिया चिश्ती यांनी तिरंगे फडकण्याबाबतची घोषणा केली आहे. ख्वाजा साहेबांच्या दर्ग्याशी निगडीत हिंदू आणि मुस्लिमांमध्ये देशभक्तीची भावना आहे. त्यामुळे दर्गाह दिवान जेव्हा जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवतील त्यावेळी समर्थक एक हजार तिरंगा फडकवतील अशी माहिती चिश्ती यांनी दिली. दरम्यान, काश्मीरमधील शांततेच्या प्रश्नी १० एप्रिल रोजी...
23 Apr 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, April 7th, 2016
एनआयटीमध्ये तणाव केंद्रीय पथक विद्यार्थ्यांना भेटले स्मृती इराणींची मेहबुबांसोबत चर्चा कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन श्रीनगर, [६ एप्रिल] – येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत (एनआयटी) गेल्या महिन्यात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांचे तीव्र पडसाद अजूनही कायम असताना, अशा घोषणा देणार्या विद्यार्थ्यांना बाहेर हाकलणार्या गैरकाश्मिरी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानूष लाठीमार केला. यामुळे एनआयटी कॅम्पसमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना...
7 Apr 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, April 5th, 2016
श्रीनगर, [४ एप्रिल] – पीडीपी पक्षाच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी सकाळी जम्मू – काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ५६ वर्षीय मेहबूबा या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मेहबूबा मुफ्ती यांच्यासह आघाडीचे १६ कॅबिनेट व ८ राज्यमंत्र्यानी पदाची शपथ घेतली. भाजपचे डॉ. निर्मल सिंह यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यातील भाजपाच्या दोन मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. पीडीपीच्या...
5 Apr 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 27th, 2016
=भाजपाला धन्यवाद= श्रीनगर, [२६ मार्च] – पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि भाजपाचे निर्मल सिंह यांनी आज शनिवारी राजभवनात राज्यपाल एन. एन. व्होरा यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा आपला दावा सादर केला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातील राजकीय अनिश्चिततेला यामुळे पूर्णविराम मिळणार आहे. राज्यात ८ जानेवारीपासून राज्यपाल राजवट लावण्यात आली होती. जम्मू-काश्मीरला पुन्हा भाजपा-पीडीपीचे सरकार स्थापन होत असून, युतीच्या या नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद मेहबुबा मुफ्ती, तर उपमुख्यमंत्रिपद निर्मलसिंह...
27 Mar 2016 / No Comment / Read More »