किमान तापमान : ° से.
कमाल तापमान : ° से.
तापमान विवरण :
आद्रता : %
वायू वेग : मी. प्रतिसेकंद
स्थळ : ,
° से.
– शाह-नड्डा बैठकीत नवीन कोअर कमिटीची स्थापना,
कोलकाता, (२६ डिसेंबर) – पश्चिम बंगालमध्ये भाजपने संघटनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपने २०२२ मध्ये स्थापन केलेली २४ सदस्यांची कोअर कमिटी रद्द केली आहे. त्यांच्या जागी १४ सदस्यांची नवी कोअर कमिटी आणि १५ सदस्यांची निवडणूक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचाही नव्या कोअर कमिटीमध्ये समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा एक दिवसीय भेटीसाठी कोलकाता येथे पोहोचले आहेत. एमजी रोड गुरुद्वारा आणि कालीघाट मंदिराला भेट दिल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी राज्यातील भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीतच जुनी कोअर कमिटी बरखास्त करून त्या जागी नवीन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या निवडणूक समितीच्या सदस्यांमध्ये अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्या नावांचाही समावेश आहे. याशिवाय सुकांता मजुमदार, सुभेन्दू अधिकारी, राहुल सिन्हा, आशा लाक्रा, सतीश धन, मंगल पांडे, अमित मालवीय, लॉकेट चटर्जी, दिलीप घोष, अमितव चक्रवर्ती आणि चार सरचिटणीसांना स्थान देण्यात आले आहे.
जेपी नड्डा आणि अमित शहा यांच्या भेटीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी-
– २०२२ मध्ये स्थापन करण्यात आलेली २४ सदस्यीय कोअर कमिटी संपली.
– नवीन २०२४ लोकसभा निवडणूक समितीची स्थापना.
– नवीन कोअर कमिटीची स्थापना.
– जॉन बार्ला, निसिथ प्रामाणिक, देबोश्री चौधरी, शंतनू ठाकूर, सुभाष सरकार, मिथुन चक्रवर्ती, अनुपम हाजरा, अनिर्बन गांगुली, स्वपन दासगुप्ता, मोनोज तिग्गा, यांसारखे नेते आणि खासदार निमंत्रित नसल्याने बैठकीला अनुपस्थित राहिले.
– मिथुन चक्रवर्ती यांनी काल रात्री सुकांत मजुमदार यांना फोन करून सांगितले की, प्रकृतीच्या समस्येमुळे ते अमेरिकेत आहेत आणि मीटिंगला उपस्थित राहू शकणार नाहीत.
– दिलीप घोष अनुभवी असल्याने अमित शाह यांनी सुकांता मजुमदार यांना त्यांची कदर करून त्यांच्या अनुभवाचा उपयोग करण्यास सांगितले.
– स्रोत: लोकसभा निवडणुकीसाठी ६-७ स्थायी खासदारांना तिकीट मिळू शकत नाही, तर १५-२० स्थायी आमदारांना तिकीट मिळू शकते. सरकार घोष, अग्निमित्र पॉल यांना तिकीट मिळू शकते.
– प्रत्येक ५-६ विधानसभा जागा क्लस्टर म्हणून घेतल्या जातील आणि या क्लस्टर्समध्ये समन्वय असेल. अमित शहा, जेपी नड्डा, पीएम मोदी क्लस्टरमध्ये या ठिकाणांना भेट देतील.
– मुंबई स्थित २ सेफोलॉजी इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत अहवालात बंगाल भाजपची स्थिती उत्साहवर्धक नसल्याचे दिसून येते. – त्यामुळे नवीन समिती स्थापन करण्यात आली असून त्यात सुनील बन्सल, आशा लाक्रा, अमित मालवीय यांना स्थान देण्यात आले आहे.
– भाजपच्या अंतर्गत भांडणामुळे भाजपला चांगलीच चिंता आहे. सुकांत मजुमदार यांना सुभेन्दू अधिकारी आणि दिलीप घोष यांच्यासोबत काम करण्यास सांगितले आहे.