Posted by वृत्तभारती
Monday, February 5th, 2024
– जीतनराम मांझी यांची खंत, पाटणा, (०३ फेब्रुवारी) – बिहारमधील राजकारण पुन्हा एकददा तापू लागले आहे. नितीश सरकारला समर्थन देणा्या एचएएमचे प्रमुख जीतनराम मांझी यांचे नाराजीनाट्य सुरू झाले आहे. अद्याप नितीश सरकारचे विधानसभेत बहुमत सिद्ध व्हायचे आहे. अशा परिस्थितीत हिंदुस्थान आवाम मोर्चा अर्थात एचएएमचे प्रमुख जीतनराम मांझी यांच्या नाराजीनाट्याचा पहिला अंक सुरू झाला आहे. मांझी यांचा मुलगा संतोष सुमन यांनी बिहार कॅबिनेटमध्ये शपथ घेतली असून, त्यांना एससी- एसटी मंत्रालय देण्यात...
5 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, February 2nd, 2024
रांची, (०२ फेब्रुवारी) – झामुमो विधिमंडळ पक्षाचे नेते चंपेई सोरेन यांनी शुक‘वारी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात आज दुपारी पार पडलेल्या समारंभात राज्यपाल सी. पी. जोशी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. चंपेई सोरेन यांच्यासोबत आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँगे‘सचे वरिष्ठ नेते आलमगिर आलम आणि राजदचे नेते सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. दरबार हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक‘मात आघाडीतील सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. चंपेई...
2 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 1st, 2024
– हेमंत सोरेन यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रांची, (०१ फेब्रुवारी) – झारखंडमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईनंतर संपूर्ण यंत्रणाच बदलून गेली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर चंपाई सोरेन नवे मुख्यमंत्री होणार आहेत. बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना साडेसात तासांच्या चौकशीनंतर अटक केली आणि त्यांना प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली नाहीत. अटकेनंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्यांनी हेमंत सोरेन यांना रात्री राजभवनात नेले आणि त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. तर...
1 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 1st, 2024
नवी दिल्ली, (०१ फेब्रुवारी) – झारखंड मुक्ती मोर्चाकडे ४८-४९ आमदार आहेत, पण ते फक्त ४२-४३ आमदारांच्या सह्या गोळा करू शकले आहेत. सीता सोरेन, रामदास सोरेन या बैठकीत नव्हते. काँग्रेसचे अनेक नेते बैठकीला नव्हते. मला वाटते त्यांच्याकडे आमदार नाही, चंपाई सोरेन यांच्याकडे बहुमत नसल्याचे गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे. झामुमोसोबत सरकार स्थापन करण्याबाबत भाजप खासदार म्हणाले की, भाजप कधीही भ्रष्टाचार्यांसोबत सरकार स्थापन करणार नाही. झामुमोचे हात पूर्णपणे...
1 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, January 21st, 2024
पाटणा, (२० जानेवारी) – बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीशकुमार यांच्याबाबत सध्या राजकारण जोरात सुरू आहे. ते पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या आघाडीतील एनडीएमध्ये परत येऊ शकतात, असा दावा केला जात आहे. ते काँग्रेस आणि आरजेडीवर पूर्णपणे नाराज असल्याचा दावाही केला जात आहे. नुकतेच नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा जेडीयू अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या प्रकरणाची चर्चा जोरात सुरू आहे. या सगळ्यात आज नितीश कुमार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकार्यांच्या नव्या टीमची घोषणा...
21 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 2nd, 2024
– आज बोलाविली झामुमो विधिमंडळ पक्षाची बैठक, रांची, (०२ जानेवारी) – जमीन घोटाळा प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. सोरेन यांच्या विरोधात ईडीकडे ठोस पुरावे असल्याने, त्यांना अटक होण्याची शक्यता जास्त आहे. अशा स्थितीत सत्तेची किल्ली आपल्याकडेच राहावी, याची ठोस योजना हेमंत सोरेन यांनी तयार केली आहे. आपल्या खुर्चीवर पत्नी कल्पना सोरेन यांना बसविण्याची त्यांची योजना आहे....
2 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 27th, 2023
– न्यायालयात स्थगिती देण्याची मागणी, पाटणा, (२७ नोव्हेंबर) – मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारमधील ६५ टक्क्यांपर्यंत वाढवलेल्या आरक्षण मर्यादेला पाटणा उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. गौरवकुमार आणि नमन श्रेष्ठ या दोन याचिकार्त्यांनी जनहित याचिका दाखल करीत बिहारमधील आरक्षण कायदा, बिहार (शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश) आरक्षण आणि आरक्षण सुधारित कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिले. या आरक्षणाला तत्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली. बिहार विधानसभेत १० नोव्हेंबर रोजी विधेयक पारित...
27 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 8th, 2023
– वादग्रस्त टिप्पणी नितीश कुमार यांनी मागे घेतली, पाटणा, (०८ नोव्हेंबर) – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी महिला शिक्षणाच्या महत्त्वावरील वादग्रस्त टिप्पणी बुधवारी मागे घेतली आणि त्यांनी सांगितले की, त्यांच्या बोलण्याने कोणाचे मन दुखावले गेले असते, तर त्याबद्दल मी माफी मागितली असती आणि खेद व्यक्त केला. बिहार विधानसभेच्या संकुलात आणि नंतर सभागृहात पत्रकारांशी बोलताना नितीश म्हणाले, मला काही समस्या असल्यास, मी माझे विधान मागे घेतो आणि मी त्याचा...
8 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, October 11th, 2023
पूर्णिया, (११ ऑक्टोबर) – आयकर विभागाच्या पथकाने आज मिलिया एज्युकेशनल ट्रस्टच्या वीस ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत प्रामुख्याने मिलिया एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक डॉ. असद इमाम यांचे निवासस्थान, त्यांचे कायदेशीर सल्लागार अधिवक्ता कैसर इमाम यांचे निवासस्थान आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांच्या निवासस्थानावर आयकर विभागाच्या पथकाने छापे टाकले. यापैकी मिलिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मिलिया डिग्री कॉलेज, मिलिया बीएड कॉलेज, मिलिया इंटरनॅशनल गर्ल्स स्कूल, मिलिया कॉन्व्हेंट पूर्णिया येथे छापे टाकण्यात आले आहेत. याशिवाय...
11 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, October 9th, 2023
हजारीबाग, (०९ ऑक्टोबर) – झारखंडच्या हजारीबागमधून हिंदूंवर दगडफेकीच्या बातम्या येत आहेत. पेलावल भागात राज्याची राजधानी रांचीमध्ये आयोजित ’शौर्य जागरण यात्रे’वरून परतणार्या हिंदू कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये एका महिलेसह १० जण जखमी झाले आहेत. एका मशिदीजवळ ही घटना घडली. स्थानिक पोलीस अधीक्षक (एसपी) म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून या आधारे अटक करण्यात येईल. तेथे मिळालेल्या बातमीत असे म्हटले आहे की, दगडफेक करणार्या समुदायाच्या लोकांनी सांगितले की हिंदू भाविकांची...
9 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, October 2nd, 2023
पाटणा, (०२ ऑक्टोबर) – बिहारमध्ये जात जनगणनेची आकडेवारी जाहीर झाली आहे. प्रभारी मुख्य सचिव विवेक कुमार सिंह यांनी सोमवारी पाटणा येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विभागीय माहितीनुसार २१५ जातींची आकडेवारी जारी केले आहे. सरकारी अहवालानुसार, बिहार ३६ टक्के अत्यंत मागास, २७ टक्के मागासवर्गीय, १९ टक्के अनुसूचित जाती आणि १.६८ टक्के अनुसूचित जमाती म्हणून घोषित करण्यात आला आहे. जात जनगणनेची आकडेवारी जाहीर: प्रभारी मुख्य सचिव विवेक कुमार सिंह यांनी सोमवारी...
2 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, October 2nd, 2023
– खाण लीज प्रकरणी झारखंडच्या राज्यपालांचे मत, रांची, (०२ ऑक्टोबर) – मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा समावेश असलेल्या बेकायदेशीर खाण लीज प्रकरणाचा संदर्भ देत, एखाद्याच्या कृतीचे परिणाम भोगावेच लागतात, असे वक्तव्य झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांनी रविवारी वृत्तसंस्थेशी बोलताना केले. राज्यातील संघटित गुन्हेगारी आणि नक्षलवादाच्या विरोधात कठोर कारवाईच्या गरजेवर त्यांनी भर दिला. ज्या प्रकारे गुन्हेगारी टोळ्या तुरुंगातून कार्यरत आहेत आणि नक्षलवाद्यांकडून सुरक्षा कर्मचारी मारले जात आहेत, त्याबद्दल राधाकृष्णन् यांनी तीव‘...
2 Oct 2023 / No Comment / Read More »