|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.74° से.

कमाल तापमान : 24.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.63°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

मांझी वेगळा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत?

मांझी वेगळा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत?पाटणा, [१२ फेब्रुवारी] – बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी येत्या २० फेब्रुवारी रोजी आपले बहुमत सिद्ध करावे, असे निर्देश राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात आणखी काही नाट्यमय घडामोडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २० फेब्रुवारीपासून बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांझी यांनी आपले बहुमत सिद्ध करावे, असे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. त्यादिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर लगेचच विश्‍वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. दरम्यान, राजीनामा...13 Feb 2015 / No Comment / Read More »

विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड अवैध

विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड अवैध=हायकोर्टाचा नितीशकुमारांना झटका= पाटणा, [११ फेब्रुवारी] – बिहारचे मुख्यमंत्री होण्यासाठी आपल्याला १३० आमदारांचा पाठिंबा आहे हे दाखविण्यासाठी या आमदारांना घेऊन राष्ट्रपतिभवनाकडे कूच करणारे जदयु नेते नितीशकुमार यांना पाटणा उच्च न्यायालयाने आज बुधवारी जोरदार झटका दिला. जदयु विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांची झालेली निवड अमान्य करून न्यायालयाने या निवड प्रक्रियेलाच स्थगिती दिली आहे. नितीशकुमार यांच्या निवडीला मान्यता देणार्‍या राज्य विधानसभेच्या प्रभारी सचिवांच्या पत्राचे कायदेशीर परिणाम काय होऊ शकतात, याचा आम्हाला अभ्यास करायचा आहे....12 Feb 2015 / No Comment / Read More »

नितीशकुमार, मांझींचा बहुमताचा दावा

नितीशकुमार, मांझींचा बहुमताचा दावा=बिहारात सत्तासंघर्ष शिगेला= पाटणा, [९ फेब्रुवारी] – जदयुने पक्षातून हकालपट्टी केल्यानंतरही बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी राजीनामा देण्यास ठाम नकार दिल्याने बिहारमध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. नितीशकुमार यांनी १३० समर्थक आमदारांच्या चिठ्ठीसह राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला, तर मांझी यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी २० ते २३ फेब्रुवारीपर्यंतची मुदत मागितल्यामुळे आता राज्यपाल कोणता निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज्यपालांनी...10 Feb 2015 / No Comment / Read More »

मांझी जदयुमधून बडतर्फ

मांझी जदयुमधून बडतर्फ=४८ तासात बहुमत सिद्ध करण्याची पक्षाची मागणी= नवी दिल्ली/पाटणा, [९ फेब्रुवारी] – पक्षादेश झुगारणारे बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्यावर विश्‍वासघात आणि बेशिस्तीचा आरोप करीत जदयुने आज सोमवारी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. सोबतच, मांझी यांना आपले बहुमत अवघ्या ४८ तासात सिद्ध करण्याची सूचना राज्यपालांनी करावी, अशी मागणीही जदयुने केली. मांझी हे पक्षविरोधी कारवाया करीत असल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे, अशा आशयाचा आदेश जदयु अध्यक्ष शरद यादव यांनी जारी केला. बेशिस्तीकरिता...10 Feb 2015 / No Comment / Read More »

नितीशकुमार मला ‘रबर स्टॅम्प’ समजले

नितीशकुमार मला ‘रबर स्टॅम्प’ समजले=मांझी यांचा आरोप= नवी दिल्ली/पाटणा, [९ फेब्रुवारी] – जदयु नेते नितीशकुमार मला ‘रबर स्टॅम्प’ मुख्यमंत्री समजून बसले होते. सत्तेसाठी त्यांनी जे केले, त्यामुळे त्यांचा खरा चेहरा बिहारवासीयांसमोर उघड झाला आहे. माझ्यावर कितीही दबाव आला तरी मी राजीनामा देणार नाही. विधानसभेत मी आपले बहुमत सिद्ध करणारच आहे, अशी भूमिका सध्या संकटात सापडलेले बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी आज रविवारी दिल्लीत विशद केली. नीती आयोगाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर मांझी...10 Feb 2015 / No Comment / Read More »

नितीशकुमार पुन्हा नेते

नितीशकुमार पुन्हा नेते=बिहारमधील सत्तासंघर्षाला नवे वळण, जीतन राम मांझी यांची हकालपट्टी= पाटणा, [७ फेब्रुवारी] – गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बिहारमधील सत्तासंघर्षाला आज शनिवारी वेगळेच वळण मिळाले. मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस केली असतानाच, जदयुने मात्र मांझी यांचीच मुख्यमंत्रिपदावरून तडकाफडकी हकालपट्टी केली. यानंतर झालेल्या जदयु विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवे नेते अर्थातच बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून पक्षाचे वरिष्ठ नेते नितीशकुमार यांची एकमताने निवड करण्यात आली. लोकशाहीची अक्षरश: खिल्ली...8 Feb 2015 / No Comment / Read More »

जदयु फुटीच्या उंबरठ्यावर

जदयु फुटीच्या उंबरठ्यावरमुख्यमंत्री मांझींचाच बंडाचा झेंडा २० ला बोलावली विधिमंडळ पक्षाची बैठक पाटणा, [६ फेब्रुवारी] – विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या बिहारमधील सत्तारूढ जदयुमध्ये उभी फूट पडणे आता अटळ आहे. मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी स्वत:च पक्षनेतृत्वाविरुद्ध बंडाचा झेंडा हाती घेतल्याने जदयुमध्ये घमासान सुरू झाले आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांनी उद्या शनिवारी बोलावलेली जदयु विधिमंडळ पक्षाची बैठक अनधिकृत असल्याचे जाहीर केले आणि सभागृहाचा नेता या अधिकार्‍याने मांझी यांनी येत्या २० तारखेला विधिमंडळ...7 Feb 2015 / No Comment / Read More »

बिहार निवडणूक मोदींच्याच नेतृत्वात

बिहार निवडणूक मोदींच्याच नेतृत्वात=रामविलास पासवान यांची माहिती= पाटणा, [२८ जानेवारी] – रालोआतील मुख्य घटक असलेला भाजपा हा आम्हाला मोठ्या भावासारखा आहे आणि बिहारमध्ये याचवर्षी होणारी विधानसभेची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात लढणार आहोत, अशी माहिती लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी बुधवारी येथे दिली. बिहार निवडणुकीत रालोआतील घटक पक्षांमध्ये जागावाटप हा फार मोठा मुद्दा राहणार नाही. लोजपाला किती जागा मिळतील, हादेखील आमच्यासाठी चिंतेचा विषय नाही. आपल्या पक्षाला इतक्याच...29 Jan 2015 / No Comment / Read More »

बिहारच्या न्यायालय परिसरात आत्मघाती हल्ला

बिहारच्या न्यायालय परिसरात आत्मघाती हल्ला=तीन ठार, १६ जखमी, दोन कैदी फरार= आरा, [२३ जानेवारी] – बिहारच्या आरा येथील दिवाणी न्यायालयाच्या संकुलात झालेल्या मानवी बॉम्ब स्फोटात एका पोलिसासह तिघांचा मृत्यू झाला असून, अन्य १६ जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर दोन कैदी पळाले असल्याची माहिती आहे. या न्यायालयात काही कुख्यात कैद्यांना हजर करण्यासाठी आणले असता, मानवी बॉम्ब बनलेल्या एका महिलेने सकाळी साडेअकराच्या सुमारास हा स्फोट घडवून आणला. तिने आपल्या बॅगमध्ये शक्तिशाली स्फोटके पेरून ठेवली होती....24 Jan 2015 / No Comment / Read More »

बिहारसाठी भाजपाचे ‘मिशन १८५’

बिहारसाठी भाजपाचे ‘मिशन १८५’=पंतप्रधान होण्यासाठीच कॉंगे्रसशी हातमिळवणी : अमित शाहंचा नितीशकुमारांवर हल्ला= पाटणा, [२३ जानेवारी] – याचवर्षी विधानसभेची निवडणूक होणार असलेल्या बिहारमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शुक्रवारी ‘मिशन १८५’ अर्थातच १८५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. भाजपाध्यक्षांनी यावेळी माजी मुख्यमंत्री आणि जदयु नेते नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला केला. पंतप्रधान होण्याची आपली व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नितीश कुमार यांनी कॉंगे्रससोबत हातमिळवणी केली. प्रख्यात समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांच्या तत्त्वांचा हा...24 Jan 2015 / No Comment / Read More »