किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.97° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.97° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– दिया कुमारी, प्रेमचंद बैरवा यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ,
– पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी सोहळ्याला उपस्थित,
जयपूर, (१५ डिसेंबर) – भाजपाचे वरिष्ठ नेते भजनलाल शर्मा यांनी शुक्रवारी राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, अनेक केंद्रीय मंत्री, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते या सोहळ्याला उपस्थित होते.
येथील अल्बर्ट हॉलच्या भव्य प्रांगणात आयोजित या समारंभात राज्यपाल कलराज मिश्र यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी सोहळ्यापूर्वी शर्मा यांनी गोविंद देवजी मंदिरात जाऊन पूजा केली आणि गाईंना चारा खायला दिला. यानंतर ते आपल्या घरी गेले आणि आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले. तिथून ते शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी आले. यावेळी परिसरात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. शपथविधी सोहळा बघण्यासाठी नागरिक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
अशोक गहलोत-शेखावत यांच्यावर नजरा
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यात रंगलेल्या गप्पा. आतापर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे हे दोन्ही नेते एकमेकांच्या जवळ बसले होते. त्यांच्या गप्पा बघून आता त्यांच्यातील मतभेद बरेच कमी झाले असल्याचे जाणवत होते.