किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.87°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशहैदराबाद, (०७ डिसेंबर) – तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हैदराबादमध्ये झालेल्या या शपथविधी सोहळ्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वाड्रा यांच्यासह अनेक बडे नेते सहभागी झाले होते. रेवंत रेड्डी यांच्यासोबत भट्टी विक्रमार्का मल्लू यांनीही शपथ घेतली. त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. याशिवाय उत्तर कुमार रेड्डी यांनीही शपथ घेतली. एकंदरीत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्यतिरिक्त, इतर ११ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
रेवंत रेड्डी यांची कॅबिनेट
भट्टी विक्रमार्क मल्लू (उपमुख्यमंत्री)
गद्दम प्रसाद कुमार (उपसभापती)
नालमदा उत्तम कुमार रेड्डी
सी दामाडोर राजनरसिंह
कोमातीरेड्डी व्यंकट रेड्डी
दुडिला श्रीधर बाबू
पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी
पूनम प्रभाकर
कोंडा सुरेखा
डी अनसूया सिथक्का
तुम्माला नागेश्वर राव
जुपल्ली कृष्ण राव
पीएम मोदींनी रेवंत रेड्डीना दिल्या शुभेच्छा
काँग्रेस नेते रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. रेवंत रेड्डी यांनी एलबी स्टेडियमवर तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी रेवंत रेड्डी यांचे अभिनंदन केले आहे. पीएम मोदींनी ट्विटरवर लिहिले, ’श्री रेवंत रेड्डी यांचे तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन. मी राज्याच्या प्रगतीसाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देतो.
रेवंत रेड्डी यांच्याशिवाय आणखी १० आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापैकी भट्टी विक्रमार्क यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते.