|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.74° से.

कमाल तापमान : 24.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.63°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

उच्च कर संकलन, राज्यांच्या कमी वाट्यामुळे केंद्राचा महसूल वाढला

उच्च कर संकलन, राज्यांच्या कमी वाट्यामुळे केंद्राचा महसूल वाढलानवी दिल्ली, ७ डिसेंबर – उच्च कर संकलन आणि राज्यांचा कमी झालेल्या वाट्यामुळे ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्ती झाली आहे. देशात टाळेबंदी लागू झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये प्रथमच केंद्र सरकारचे कर्जबाह्य उत्पन्न देखील वाढल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत केंद्राचा महसूल ४६.७ टक्क्यांनी वाढून तो १.४ लाख कोटी रुपये झाला आहे. ऑक्टोबरमध्ये कर आणि करबाह्य उत्पन्नात ५० टक्के वाढ...7 Dec 2020 / No Comment / Read More »

कर्जहप्ता कमी होणार नाही : रिझर्व्ह बँक

कर्जहप्ता कमी होणार नाही : रिझर्व्ह बँकमुंबई, ४ डिसेंबर – कोरोनाचे संकट कायम असतानाही, अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारत आहे. दुसर्‍या सहामाहीत आर्थिक विकासाचा दर चांगला राहील, असा अंदाज व्यक्त करीत, भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जावरील व्याजाचे दर ‘जैस थे’ ठेवण्याचा निर्णय आज शुक्रवारी घेतला. यामुळे विविध कर्जांवरील हप्ता कमी होण्याची शक्यता मावळली आहे. रेपो दर ४ टक्क्यांवरच स्थिर ठेवण्यात आला आहे. सलग तिसर्‍या पतधोरणात व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पत्रपरिषदेत...5 Dec 2020 / No Comment / Read More »

आभासी चुकार्‍यांच्या सुरक्षेसाठी लवकरच नियम: शक्तिकांत दास

आभासी चुकार्‍यांच्या सुरक्षेसाठी लवकरच नियम: शक्तिकांत दासमुंबई, ४ डिसेंबर – आभासी चुकार्‍यांच्या सुरक्षेसाठी भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच नियम आणणार असल्याची माहिती गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज शुक्रवारी दिली. या नियमांमुळे आभासी (ऑनलाईन) पद्धतीने केले जाणारे व्यवहार सुरक्षित होतील आणि वापरकर्त्यांसाठी सुविधाजनक असतील, असे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनात दास यांनी म्हटले आहे. या दिशानिर्देशांमध्ये इंटरनेट, मोबाईल बँकिंग, कार्ड्सच्या माध्यमातून होणार्‍या चुकार्‍यांसाठी सामान्य सुरक्षा नियंत्रणावरील काही किमान मापदंड मजबूत करण्याची तसेच शासन व्यवस्था, अंमलबजावणी आणि देखरेखीची आवश्यकता...4 Dec 2020 / No Comment / Read More »

५.४३ लाख करदात्यांची जीएसटी नोंदणी रद्द होणार?

५.४३ लाख करदात्यांची जीएसटी नोंदणी रद्द होणार?गेल्या सहा महिन्यांपासून विवरण भरले नाही, नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर – गेल्या सहा किंवा त्याहून अधिक महिन्यांपासून परतावा न भरणार्‍या सुमारे ५.४३ लाख करदात्यांची जीएसटी नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय महसूल विभाग अधिकार्‍यांच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर घेण्यात आला. आतापर्यंत सुमारे ८० लाख विक्री परतावा किंवा जीएसटीआर -३ बी दाखल केले गेले आहेत. जीएसटी अधिकार्‍यांनी गेल्या महिन्यात जीएसटी विवरण दाखल करणार्‍या शीर्षस्थ २५ हजार करदात्यांची ओळख पटविली आहे. परंतु...30 Nov 2020 / No Comment / Read More »

आजपासून ‘व्याजावरील व्याज’ परत करण्यास प्रारंभ

आजपासून ‘व्याजावरील व्याज’ परत करण्यास प्रारंभनवी दिल्ली, ५ नोव्हेंबर – देशातील सर्व बँका ‘कर्ज स्थगिती’ (लोन मोरेटोरियम) योजनेचा फायदा घेणार्‍या कर्जदारांकडून घेतेलेले ‘व्याजावरील व्याज’ परत करण्यास सुरुवात करत आहेत. बँका आणि वित्तीय संस्थांकडून २ कोटीपर्यंतचे कर्ज घेणारे वैयक्तिक कर्जदार ते छोटे व्यापारी सर्वांना ‘कॅशबॅक’ देण्यास सुरुवात होत आहे. ज्यांनी कर्जस्थगिती योजनेसाठी अर्ज केले नव्हते अशा कर्जदारांना देखील बँकांकडून पैसे परत मिळत आहेत. २ कोटींपर्यंतचे कर्ज घेणारे आणि कोरोना काळातही कर्जाचा ईएमआय नियमतिपणे भरणार्‍या कर्जदारांना व्याजावरील...5 Nov 2020 / No Comment / Read More »

सीतारामन् जाहीर करणार आणखी एक पॅकेज

सीतारामन् जाहीर करणार आणखी एक पॅकेजआर्थिक व्यवहारविषयक सचिवाची माहिती, नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर – कोरोना महामारीमुळे फटका बसलेली अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् लवकरच आणखी एक प्रोत्साहन पॅकेज जाहीर करणार आहेत, अशी माहिती आर्थिक व्यवहारविषयक विभागाचे सचिव तरुण बजाज यांनी आज मंगळवारी दिली. अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांकडून आलेल्या सूचना आणि विनंत्यांचे परीक्षण सध्या अर्थमंत्रालयाकडून केले जात आहे, असे त्यांनी आभासी स्वरूपात झालेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितले. आणखी एक प्रोत्साहन पॅकेज जाहीर करण्याबाबत सध्या आम्ही...4 Nov 2020 / No Comment / Read More »

ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन एक लाख कोटींवर

ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन एक लाख कोटींवरनवी दिल्ली, १ नोव्हेंबर – फेब्रुवारीपासून आणि मार्चमध्ये झालेल्या टाळेबंदीनंतर प्रथमच ऑक्टोबर महिन्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले. ऑक्टोबर महिन्यात १,०५,१५५ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. सप्टेंबरमध्ये ९५,४८० कोटी रुपये जीसएटी संकलन झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात १९,१९३ कोटी रुपयांचा केंद्रीय जीएसटी, तर २५,४११ कोटी रुपयांचा राज्य जीएसटी वसूल करण्यात आला. या कालावधीत ५२,५४० कोटी रुपयांचे एकीकृत जीएसटी संकलन...2 Nov 2020 / No Comment / Read More »