किमान तापमान : 27.71° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.79°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित,
नवी दिल्ली, (१२ डिसेंबर) – मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नावांची घोषणा झाल्यानंतर आता शपथविधी कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे. या दोन राज्यांच्या शपथविधी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी ११.३० वाजता आधी मध्य प्रदेशात पोहोचतील, जिथे मोहन यादव मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. यानंतर पीएम मोदी दुपारी ४ वाजता छत्तीसगडला पोहोचतील, जिथे विष्णू देव साय मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. गेल्या सोमवारी, भाजप विधिमंडळ पक्षाने चौहान मंत्रिमंडळ सदस्य यादव यांची केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत नेता म्हणून निवड केली आणि पुढील मुख्यमंत्री म्हणून त्यांचा पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला.
१७ नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २३० सदस्यांच्या विधानसभेत १६३ जागा जिंकून मध्य प्रदेशात सत्ता राखली, तर काँग्रेस ६६ जागांसह दुसर्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगू भाई पटेल यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) विधिमंडळ पक्षाचे नेते डॉ. मोहन यादव यांना राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आणि त्यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून नियुक्तीबाबत पत्र दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत, छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि मंत्रिमंडळातील सदस्य बुधवारी, १३ डिसेंबर रोजी शपथ घेतील. अधिकार्यांनी सोमवारी ही माहिती दिली. राजधानी रायपूरमधील सायन्स कॉलेजच्या मैदानावर बुधवारी दुपारी २ वाजता शपथविधी सोहळा होणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया, छत्तीसगडचे राज्य प्रभारी ओम माथूर, सहप्रभारी नितीन नबीन यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यातील भाजपचा प्रमुख आदिवासी चेहरा असलेल्या साई यांची रविवारी येथे झालेल्या ५४ नवनिर्वाचित भाजप आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.