किमान तापमान : 27.71° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.79°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – भारतीय अर्थव्यवस्थेने रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी ४० लाख डॉलर्सवर अर्थात् चार ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. यासह जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वांत मोठी भारतीय अर्थव्यवस्था बनली आहे. जीडीपीच्या बाबतीत जगात अमेरिका प्रथम स्थानावर आहे, तर चीन दुसर्या, जपान तिसर्या आणि जर्मनी चौथ्या स्थानावर आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या वाढीचा वेग पाहता, अर्थशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, भारत पुढील चार वर्षांत म्हणजे २०२७ पर्यंत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल. येत्या काही वर्षांत अमेरिका, चीन आणि भारत या जगातील तीन सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्था असतील. जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमॅस्टिक प्रॉडक्ट अर्थात् सकल राष्ट्रीय उत्पादन आहे. हे दिलेल्या कालावधीत देशात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण आर्थिक मूल्य आहे. सामान्यत: एका वर्षाचा कालावधी देशाचा जीडीपी मोजण्यासाठी वापरला जातो. जीडीपी हे देशाच्या आर्थिक आरोग्याचे सर्वसमावेशक स्कोअरकार्ड आहे. ते देशाचा विकास आणि आर्थिक प्रगती ओळखते. जीडीपी वाढीचा दर हा देशाच्या आर्थिक कामगिरीचा एक महत्त्वाचा सूचक आहे. देशाच्या राष्ट्रीय सांख्यिकी एजन्सीद्वारे सामान्यतः आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करून जीडीपीची गणना केली जाते. खर्च, उत्पादन कींवा उत्पन्न वापरून जीडीपीची गणना तीन प्रकारे केली जाते.
अमेरिकेची अर्थव्यवस्था सर्वांत मोठी
अमेरिका हा जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. अमेरिकेचा जीडीपी हा २५.५ ट्रिलियन डॉलर्स आहे. तर १८ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसह चीन दुसर्या क्रमांकावर आहे. जपानचा ४.२ ट्रिलियन डॉलर्स आणि जर्मनीची अर्थव्यवस्था ही ४ ट्रिलियन डॉलर्सची आहे. दरम्यान, ग्लोबल मार्केट व्यतिरिक्त इतर अनेक जागतिक संस्थांनी देखील असे दावे केले आहेत. सध्याच्या काळात भारताचा जीडीपी २०२२ मध्ये ३.५ ट्रिलियन डॉलर्स होता, जो २०३० पर्यंत वाढून ७.३ ट्रिलियन डॉलर्स होईल. जपान व्यतिरिक्त भारत २०३० पर्यंत जर्मनीलाही मागे टाकेल. सध्याच्या काळात भारताचा जीडीपी २०२२ मध्ये ४ ट्रिलियन डॉलर्स होता, जो २०३०पर्यंत वाढून ७.३ ट्रिलियन डॉलर्स होईल. या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेतील तेजीसाठी वाढत्या देशांतर्गत मागणीला जबाबदार धरण्यात आले आहे.