किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.82°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसवर हल्ला,
नवी दिल्ली, (०६ डिसेंबर) – स्वतःच्या पराभवाचे विश्लेषण करण्याऐवजी काँग्रेसने भारतीय संस्कृती आणि अस्मितेचा अपमान करण्याचा डाव काँग्रेसने रचला असल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी उत्तर-दक्षिण विभाजनाच्या केलेल्या वक्तव्यावरून केला. या मुद्यावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मौन का धारण केले आहे तसेच उत्तर-दक्षिण भारताची विभागणी, उत्तर भारताला गौमूत्र राज्य संबोधणे आणि सनातन धर्म तसेच देवतांवर झालेल्या अभद्र टीकेच्या विरोधात त्यांनी टीका केली का, असा सवाल त्यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा संदेश देत आहेत. मात्र, विरोधकांनी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या पराभवाचे खापर इव्हीएम आणि प्रादेशिकतेवर फोडत चुकीची भाषा वापरणे सुरू केले आहे, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
काँग्रेसला घटनात्मक संस्थांमध्ये विश्वास नाही. पराभवानंतर त्यांनी त्याचे कधीच विश्लेषण केले नाही. ते इव्हीएमवर खापर फोडतात आणि सनातन धर्म, हिंदू आणि हिंदू संस्कृतीचा अपमान करतात, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसने जात आणि धर्माचे मुद्दे काढले आणि त्याचा कोणताही परिणाम न झाल्यामुळे आता विरोधक उत्तर-दक्षिण असे विभाजन करीत आहे, असे ठाकूर म्हणाले. काँग्रेसच्या नेतृत्वातील घमंडिया आघाडी हिंदू, हिंदू आणि सनातन धर्माचा अपमान करण्यात कोणतीही कसर ठेवत नाही, असा आरोप ठाकूर यांनी केला.