Posted by वृत्तभारती
Tuesday, December 15th, 2020
नवी दिल्ली, १४ डिसेंबर – लडाखच्या पूर्व सीमेवर आपल्या जवानांनी अतिशय आक्रमक होत, चिनी सैनिकांचा सामना केला. त्यांच्या अभूतपूर्व शौर्यामुळेच चिनी सैनिकांना आपल्या सीमेवरून माघारी फिरणे भाग पडले होते, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज सोमवारी लष्करी जवानांची प्रशंसा केली. फिक्कीच्या सर्वसाधारण सभेला आभासी माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते. भारताच्या हिमालयीन भागात चीनच्या सैनिकांनी अचानक आक्रमण केले. यावरून जग किती झपाट्याने बदलत आहे आणि सीमावादावर अस्तित्वात असलेल्या करारांचे...
15 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 11th, 2020
धोरणात्मक संबंध मजबूत करण्यावर भर : जनरल रावत, नवी दिल्ली, ११ डिसेंबर – भारतीय समुद्रात विविध देशांच्या १२० युद्धनौका सध्या वेगवेगळ्या मोहिमांसाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत. भारतासोबत धोरणात्मक सागरी संबंध मजबूत करण्यावर अनेक देश भर देत असल्याचेच हे संकेत आहेत, असे प्रतिपादन तिन्ही सशस्त्र दलांचे सेनापती (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी आज शुक्रवारी केले. जागतिक सुरक्षा परिषदेला आभासी माध्यमातून संबोधित करताना रावत बोलत होते. अनेक देशांना भारतासोबत चांगले आणि मैत्रिपूर्ण...
11 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 7th, 2020
आत्मनिर्भर भारत अभियानाचे आणखी एक यश, नवी दिल्ली, ७ डिसेंबर – चीन आणि पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पृष्ठभूमीवर भारताला लवकरच २०० हॉवित्झर तोफा मिळणार आहेत. विशेष म्हणजे, या तोफांची निर्मिती आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत होणार असून, या अत्याधुनिक तोफांमुळे भारतीय लष्कराची ताकद कितीतरी पटीने वाढणार आहे. सध्या भारतीय लष्कराला ४०० आर्टिलरी तोफांची आवश्यकता आहे. भारताने इस्रायलकडे काही तोफांची मागणी केली होती. त्यानंतर देशातच स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हॉवित्झर तोफांच्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात...
7 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 4th, 2020
नवी दिल्ली, ४ डिसेंबर – भारतीय नौदल अद्वितीय आहे, अशी स्तुती संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज शुक्रवारी नौदल दिनानिमित्त शुभेच्छा देताना केली. त्यांनी टि्वट करीत भारतीय नौदलाच्या व्यावसायिकतेचे आणि ज्या पद्धतीने भारतीय सामुद्री क्षेत्र सुरक्षित ठेवले जात आहे, त्याचे कौतुक केले. भारतीय नौदलातील सर्व कर्मचार्यांना नौदल दिनाच्या शुभेच्छा. सामुद्री सुरक्षेसाठी भारतीय नौदल डोळ्यात तेल घालून कार्य करते. नौदलातील कर्मचार्यांचा पराक्रम, धैर्य आणि व्यावसायिकतेला माझा सलाम, असे टि्वट त्यांनी केले. लष्करप्रमुख...
4 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 4th, 2020
ऍडमिरल करमबीरसिंह यांची ग्वाही, लष्कर, हवाई दलाशी योग्य समन्वय, नवी दिल्ली, ३ डिसेंबर – कोणत्याही सागरी धोक्याचा सामना करण्यासाठी नौदल पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीरसिंह यांनी आज गुरुवारी दिली. दक्षिण चीन समद्रात चीन आपले वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न करीत असला, तरी त्यांचे वर्चस्व झुगारून लावण्याची क्षमता आमच्यात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नौदल दिनानिमित्त ते पत्रपरिषदेला संबोधित होते. भारतीय समुद्रात अलिकडील काळात काही धोके पाहायला मिळाले आहेत. ते हाताळण्यासाठी...
4 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 29th, 2020
नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर – हल्लेखोर नवनवीन उपकरणांचा वापर करत असताना, सुरक्षा संस्थादेखील सज्ज होत आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ड्रोन हल्ल्याचा धोका लक्षात घेता ड्रोन विध्वंसक तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा वापर सीमाभागात शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठीही ते तैनात करण्यात येणार आहे. या नवीन तंत्रज्ञान प्रणालीद्वारे ड्रोेन्सचे सिग्नल बंद पाडले जाऊ शकतात, त्याचबरोबर लेजरने लक्ष्य निश्चित करत त्याचा ठावठिकाणाही हे तंत्रज्ञान देऊ...
29 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 25th, 2020
तस्करीत पाकिस्तानचा हात, चेन्नई, २५ नोव्हेंबर – श्रीलंकेतील एका नौकेतून भारतीय तटरक्षक दलाने १०० किलो हेरॉईनसह मोठ्या प्रमाणात मादकपदार्थांचा साठा जप्त केला आहे. १७ नोव्हेंबरपासून ९ दिवस मोहीम राबवत तुतीकोडी सामुद्रीधुनीत ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी आज बुधवारी दिली. या प्रकरणी श्रीलंकेचे नागरिकत्व असलेल्या चालक दलाच्या ६ सदस्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू करण्यात आली. भर समुद्रात कराचीमधील एका गलबतातून हे मादकपदार्थ नौकेत चढविण्यात आले होते, अशी कबुली...
25 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 24th, 2020
लडाख, २४ नोव्हेंबर – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील लडाखच्या पूर्व सीमेवर दोन्ही देशांमध्ये तणाव असतानाच, चीन आता पश्चिम सीमेवर आणखी काही लढाऊ विमाने तैनात करण्याच्या तयारीत आहे. एकाचवेळी अनेक ठिकाणी मारा करण्याची या विमानांची क्षमता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चीनच्या प्रसारमाध्यमांनी आज मंगळवारी याबाबतचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित केले आहे. जे-१६ जातीच्या लढाऊ विमानांचा यासाठी वापर केला जाणार असून, पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न कमांडने या विमानांच्या तैनातीची तयारी सुरू केली असल्याचे...
24 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 14th, 2020
भारताचे चार जवान शहीद, श्रीनगर, १३ नोव्हेंबर – पाकिस्तानच्या सैनिकांनी आज शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या गुरेझ आणि उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी बेछूट गोळीबार आणि तोफांचा मारा केला. भारतीय जवानांनी दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरात पाकिस्तानचे १० सैनिक ठार झाले असून, काही जण जखमीही झाले आहेत. परंतु, यात सुरक्षा दलाचे चार जवान शहीद झाले असून, सहा नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. पाच जवान जखमीही झाले आहेत. पाकी सैनिकांच्या बंदुका व तोफा आज सकाळपासूनच आग...
14 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 12th, 2020
नवी दिल्ली/१२ नोव्हेंबर – उल्फाचा (आय) डेप्युटी कमांडर-इन-चीफ दृष्टी राजखोवाने लष्करासमोर शरणागती पत्करल्याने ईशान्येतील बंडखोरांना मोठा झटका बसला आहे. त्याने चार अंगरक्षकांसह शरणागती पत्करली. लष्करी गुप्तचर विभागातील एका तरुण अधिकार्याने सतत नऊ वर्षांपासून घेतलेल्या प्रयत्नांमुळे त्याची शरणागती शक्य झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. मेजर राभा किंवा दृष्टी असोम नावाने ओळखल्या जाणार्या दृष्टी खोवाने बुधवारी रात्री उशिरा भारतीय लष्कराच्या रेड हॉर्न डिव्हिजनमध्ये शरणागती पत्करली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. तो रॉकेट...
12 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 11th, 2020
१० श्वान, २० घोड्यांचा समावेश, ढाका, ११ नोव्हेंबर – भारत आणि बांगलादेशमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ व्हावे म्हणून भारतीय सैन्याने बांगलादेशला २० पूर्ण प्रशिक्षित लष्करी घोडे आणि १० खाण-तपासणी श्वान भेट दिले. घोड्यांना प्रशिक्षण देणार्या भारतीय सैन्य दलाच्या अधिकार्यांनी आणि पशुवैद्यकीय वाहिनीद्वारे या घोड्यांना आणि श्वानांना प्रशिक्षण देण्यात आले होते, असे एका निवेदनात म्हटले आहे. हे प्रशिक्षित श्वान आणि घोडे हाताळण्यासाठी भारतीय सैन्य दलाद्वारे बांगलादेशच्या सैन्य जवानांना प्रशिक्षण देण्यात येणार...
11 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 11th, 2020
जनरल बिपीन रावत यांचा इशारा, नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर – सध्याचा काळ अनिश्चिततेने भरलेला आणि अतिशय कठीण आहे. जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी युद्धस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थिती आपले तिन्ही सशस्त्र दल मजबूत राहिले नाही, तर शत्रू आपला नक्कीच फायदा घेतील, असा सावधतेचा इशारा स्टॉफ ऑफ डिफेन्स (तिन्ही सशस्त्र दलांचे सेनापती) जनरल बिपीन रावत यांनी आज मंगळवारी दिला. भारताच्या लष्करी सामर्थ्यांविषयीची माहिती मित्रराष्ट्रांनाही आहे. अनेक देश आज भारतासोबत आले आहेत....
11 Nov 2020 / No Comment / Read More »